Powered By Blogger

Saturday, August 4, 2012

♥ मित्र vs मैत्रीण ♥


क्षण....!


मित्र vs मैत्रीण

मित्र := चल यार एक एक कटिंग पियू...!
मैत्रीण := ये तो बघ तुझ्याकडे बघतोय...!

मित्र := सोड एक मुलगी गेली तर जाऊ दे दुसरी भेटेल...!


मैत्रीण := तो नालायकच होता मी तुला आधीच सांगितलंय...!

मित्र:= साल्या ती तुझी वाहिनी निट बघ...!

मैत्रीण := सगळे मुल चावटच असतात मेले...!

मित्र := आज पार्टी करू या का कॉकटेल ?

मैत्रीण:= मी तुझ्या कडे येते अस सांगते घरी !

मित्र := मुडद्या जिवंत आहेस का अजून ?

मैत्रीण := काय गं किती उशीर ?

मित्र := साल्या भेटायला चाललो घडी घडी फोन नको करू....!

मैत्रीण := दर पाच मिनटांनी मला फोन कर........!

मित्र := माझी गाडी घेऊन जा....!

मैत्रीण := माझी वस्तू नाही नेयची...!

असे काहीसे मित्र / मैत्रिणी आपल्या सर्वांचेच असतात.... पण एक, ते लाखात एक असतात...


मैत्री दिनाच्या आभाळभर शुभेच्छा....!
.
मृदुंग
०५.०८.२०१२

♥ मैत्री दिनाच्या आभाळभर शुभेच्छा...! {एक दिवस आधी....!} ♥





क्षण.... !

मैत्री दिनाच्या आभाळभर शुभेच्छा...! {एक दिवस आधी....!}

तस तुझ्या माझ्या मैत्रीला आता जवळपास ४ वर्ष होतील... माझ्यासारख्या नालायका कडून तुझ्यासारखी गुणाची एक मैत्रीण टिकू शकते याचंच मला आश्चर्य वाटत आहे... तेही सोशल साईटवर भेटलेली तू...

अस म्हणतात की, जे आपण उघड उघड बोलू शकत नाही ते शब्दांनी लिहून बोलून घेतो... पण उघड उघड तुझ्यासाठी मनातल खरच अजून तरी काही लिहिले नाही...

तरी खास तुझ्यासाठी म्हणून लिहिलेली कविता मला आठवते "मैत्री एक सोनेरी पहाट" अजूनही
ओठांवर रेंगाळत राहते माझ्या... तस तुझ्या माझ्यात वयाच बरच अंतर तरी तुझ्याशी एकेरीच बोलायचो, आयुष्यात येत राहणार्‍या चढ उतारीचे क्षण आपण एकमेकांसोबत वाटून घेयचो... अगदी बेधडक, निसंकोच, बिनधास्त...



तुला अजून कधी भेटलो नाही पण भेटायचं आहे... तुला माहित आहे ना माझ कस आहे...ठरवून भेटायला मला आवडत नाही... योगा-योगाने योगायोग झाला कधी तर... नक्कीच तुला भेटेल... मागील दोन वर्षापासून लग्नाच्या चिंतेत होतीस... पण आत्ताच दोन दिवसाआधी मला मेल केलास फोन कर अर्जंट काम आहे... आधी तर नाही ते विचार मनात आलेत की, काही प्रॉब्लेम तर नसेल... म्हणून जरा बिचकतच तुला फोनवल... आवाज इतका प्रसन्न वाटला तुझा की माझ्या मनातल्या विचारांचं जाळ गाळूनच पडल... मग म्हणालीस एक गुड न्युझ देयची आहे... ओळख काय आहे ती खूप मागे लागलो तुझ्या सांग सांग... पण नाहीच सांगितलस म्हणून शेवटी विचार करायचं नाटक करत खडा मारलाच... लग्न ठरले का...?


आणि काय तुझी अपेक्षित प्रतिक्रिया " तुला कस रे कळत........?"


खूप खूप छान वाटल तुझ लग्न ठरत आहे, त्यातही विशेष लव्ह कंव्हरटेड टू अरेंज मॅरेज एकदम आकाश ठेंगण झालंय... बस आता वेध कधी एकदाची तारीख निघते आणि कधी एकदाची तू पिवळी होते याचेच... पण खरच तू मला कधी विसरणार नाही आणि  मी तुला... सोशल साईट वरची माझी तू पहिली मैत्रीण आहेस.... आणि हो जस आपलं ठरलं आहे, तुझ्या होणार्‍या नवर्‍याची उलट तपासणी करणार आहे बर का... शिकवून चांगला ट्रेन करून ठेव तू... कारण मी किती नालायक आहे तुला माहित
आहे...


अरे हा राहिलंच तुझ्या "नालायक" हा टोनिंग खूप मिस करतो...माहित नाही वाचून तुला कस वाटेल...? पण हो आता लग्नाच्या बिदाई पर्यंत तरी अश्रूंना त्रास देऊ नको...!


काळजी घे... माझ्या शुभेच्छा आहेतच आणि राहतीलच....!



मैत्री दिनाच्या आभाळभर शुभेच्छा...!
.
मृदुंग
०४.०७.२०१२