♥
♥ क्षण..! ♥
मुसाफिर कॅफे..
अवस्था आयुष्याची..!
मानसाला स्वतःच्या मनावर नियंत्रण फार उशिराने मिळते.. काही वेळा असे जाणवून जाते की, फार लवकर घटना घडल्यात..तर काही वेळा जाणवते वेळ झालीये पण हवं ते घडतंच नाही..काळाच्या पुढे आणि वेगाच्या दरम्यान हरवतात ती स्वप्ने आणि जपून ठेवलेले क्षण..
पावले चालतात, घड्याळाची काटेही टिक-टिक करत पुढे सरकू लागतात..मन तेव्हाही अस्वस्थचं..जणू आता एखाद्या स्वप्नातून खऱ्या अर्थाने जाग येईल आणि आपण पून्हा त्या उंबरठ्यावर उभे राहू जिथून आपल्याला मागे किंवा पुढे चालायचेच नाही..
तुटलेल्या स्वप्नांची आणि हरवलेल्या क्षणांची सांगड घालतांना जोरात जागेवरच तुटतं ते हृदय.. अन् या तुटलेल्या हृदयाची कळ निघते ती मनातून शरिरापर्यंत जी वास्तव हेलावून सोडते..तेव्हा घेतला गेलेला श्वासही मग जड झालेला असतो तो अंतःकर्णातून..ज्यावर अधिराज्य गाजते ते वेदनेचे..सत्ता कोसळते ती प्रेमाची..राज्य येते ते एकांताचे..अन् अवस्था होते ती आयुष्याची..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#musafircafe #kshan #coffee #writerblock #path #waytoexpress





