♥
♥ क्षण..! ♥
सखी..!
गेल्या सात साडेसात वर्षातला दोन अडीच वर्षाचा हस्त खेळता सहवास. नंतरची 5 वर्ष तडीपार व्हावं तसं सगळं बंद आणि बंधनात. मग उगाच जरा पाच एक वर्षांनी निवांत वेळ मिळातो आणि माझा आहे तोच नंबर डायल होतो.
सखी - हॅलो..
सखा(मी) - हॅलो
सखी - पियुष, बोलतोय का?
मी - हो, आपण कोण?
सखी - ओळख!
मी - आता ओळखू आलं असत तर विचारलं नसत, तुम्हाला!
सखी - मी अनु बोलतेय.
मी - कोण? अनु! सखी म्हण तीच तुझी ओळख.
अनु - हो, सखीच बोलतेय.
मी - आता कस आपलं वाटलं. कशियेस?
अनु - मस्त, तू कासयेस? लग्न बिग्न केलस?
मी - कुठं पाप करायला लावते. एकटाच बराय
अनु - चल बे! शोभत नाही तुला.
मी - जराही बदलली नाहीस.
अनु - तू पण तसाच आहेस कुचका!
मी - माझा नंबर कोणी दिला तुला?
अनु - सेव्ह होता माझ्याकडे.
मी - मग आज आठवण आली तुला?
अनु - अशीच बसले होते निवांत
मी - अच्छा! निवांत वेळेत अजूनपण छळतो तर मी तुला?
अनु - नाहीतर काय थोडही विसरता येत नाही तुला.
मी - मग स्वतःचे नंबर का बदललेस?
अनु - या नंबरवरुन फोन केला होता एकदा. तुला सेव्ह नाही करता आला का?
मी - तू कुठं म्हणालीस सेव्ह करुन ठेव?
अनु - म्हणावं लागत का?
मी - सांगावं लागत!
अनु - नालायक!
मी - अरे, तारीफ का शुक्रिया, किती दिवसांचे आतुरलेले कान तृप्त झालेत बघ माझे.
अनु - तू नाही सुधारत नालायका, शिव्याच खातो.
मी - ज्याची जी भूक तो तेच खाणार. काही लोक शेण खातात. मी तरी शिव्या उच्च दर्जाच्या निवडल्या.
अनु - लय मार खाणार तू.
मी - हो, उपाशी मी असतोच आणि खायलाही तयार.
अनु - आहे तसाच आहेस खडूस!
मी - बदलायला मी ऋतू नाही...
अनु - पुरे डायलॉगबाजी
मी - बाकी घरी कसे सगळे?
अनु - मजेत, तुझ्या तीच काय झालं? ब्राम्हण पटवली होतीस ना?
मी - दिल सोडून
अनु - बरं केलंस, मला ब्राम्हण नाही आवडत अजिबात. नासवतात सगळं. तळव्याखाली ठेवायचं त्यांना.
मी - हम्म, तळवे तरी घाण होतात गं!
अनु - आपल्या जातीत आहेत बऱ्याच चांगल्या बोल शोधू का?
मी - शोध, शोध
अनु - गोवा जायचा बेत आहे येतोस का? मजा करू
मी - कपलसाठी गोव्यात मजा, मी सिंगल काय करू येऊन?
अनु - येतोस का बोल करते तुझी सोय. आणते चार पाच जणी. पटेल ती घे!
मी - एकच पूरे चार पाच जास्त होतात.
अनु - दोन दिवस दिले काय ते सांग, बुकिंग करते!
मी, अनु, मी अनु तास दीड तास गप्पा आता घसा कोकलतोय. किती बडबडतात या बायका. आई गं! मला बोलायची सवय नाही राहिली आता फार. दमलोय..! सेव्ह केला नंबर आणि बाकीच बघू अजून विचार करतोय..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843