Powered By Blogger

Friday, March 22, 2019

आयुष्य जगतांना..!



थोडा थोडका म्हणत आता आठवणींच्या पुलाखालून भरमसाठ पाणी वाहत गेलंय. त्यामुळे कुठल्या एका पावसाळ्यात नदीला पुर येऊन, डोळ्यासमोर असलेला पुल, दिसेनासा झाला तरी वावग असं काही वाटत नाही. तेवढं आपण सराईत झालोय जगायलाही आणि स्वतःच मन मारायलाही. मग खंत कशाची किंवा कसली? बुडता आलं तेवढच सावरताही जमलंय आयुष्य जगतांना..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#writersblock #writer #author #books #love #coffee #faith #nature

Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/piyush-khandekar-snfs/quotes/thoddaa-thoddkaa-mhnnt-aataa-aatthvnniincyaa-pulaakhaaluun-r-nxpfp

Thursday, March 21, 2019

सल..! :-)


सल..!
कस्तुरी गंधाच्या
मोहासारखी उग्र..
बेबंद तेवढीच बेधुंद..
सलीच्या पायात
चांदण उभ्या रातीच..
तेवढाच काळोखही
अंधाऱ्या खोलीतला..
रुतत आत खोलवर
प्रत्येक स्पंदनाला..
कधी येतं ओठावर
कधी अगदी समोर
अबोल, घुमं..
अलिप्त तितकं आर्त
गुणगुणलेलं मनातलं
सल.. ती.. सलत राहते..
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#सल #मराठी #writer #author #coffee #tea #story #life

Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/piyush-khandekar-snfs/quotes/sl-ksturii-gndhaacyaa-mohaasaarkhii-ugr-bebnd-tevddhiic-rutt-nvuas

Wednesday, March 13, 2019

काही ठरावीक..!








Saturday, March 9, 2019

असे झाले..! :-)



♥ क्षण..! ♥

असे झाले..!

कितीतरी स्वप्नांचे आधार झाले,
माझ्यावर वेदनांचे संस्कार झाले..

डगमगलो अगदी कोसळून पडलो,
कागदाने सावरून शब्द उभे झाले..

नव्हते फार असे सुख अन् दुःखही,
जखमांचे व्रण एवढे बोलके झाले..

बाहेर उजेड शोधत होतो सारखा,
आत उजेडाचे दिवे मंद करुन झाले..

उधार श्वास उसणे घेत राहिलो मी,
निसर्गाचे देणे असे मातीमोल झाले..

कळलं तेव्हा आयुष्य समजले होते,
गोष्ट लिहितांना मात्र मन उपरे झाले..

बंद दाराशी घुटमळत थांबलो एकदा,
कसे येणे केले आपलेच विचारते झाले..

नाही वाटलं मग पुन्हा जगावसं मला,
कागदावर मृत्यूचे दाखले लिहिते झाले..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#writer #author #books #stories #coffee #tea #she #life

Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/piyush-khandekar-snfs/quotes/ase-jhaale-mrdung-r-kshanatch-gmail-com-91-73879-22843-nec2g