Powered By Blogger

Friday, June 28, 2019

आई - बाप..! :-)

जे खूप चांगले असतात त्यांचा वारंवार उल्लेख होतो. मग ते 'आई-बाप' का असेना. उल्लेखनीय असतील तर निश्चित उद्धार होतोच माणसांचा. फरक काही असेल तर परतफेड करतांना 'शालजोडे युक्त अपमान' वाटतो. अर्थ काढण्यात पटाईत असलेली माणसे चांगला व शुद्ध अर्थ कधीच काढू शकत नाहीत. कसेही असोत किंवा कुणाचेही असोत 'आई-बाप' चांगलेच असतात कायम..!
#वाईट_पोरगा
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#writer #author #life #struggle #relationship #coffee #rain

Read my thoughts on @YourQuoteApp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

Wednesday, June 19, 2019

भ्रमनिरास..! :-)

नात्यांच्या सुरुवातीला सगळच गोड वाटतं. घरी येण्याचं न येण्याचं आग्रहाने कारण विचारलं जातं. नंतर काही दिवसांनी हा अति गोडवा सगळच कडवट करायला लागतो. ते म्हणतात ना जास्त गोड खाऊनसुद्धा तोंड कडू होत. त्यामुळे प्रमाण ठरवली जातात. मर्यादा या आखल्या जातात. लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा प्रसंग ओढवलाच तर जळाव ते रावणाने आणि विद्रूप व्हावं ते शूर्पणखेने. अशा दुतोंडी व्यवस्थेत सभ्य व साध्या माणसाने पायातली पायतानेसुद्धा काढून घरात यायची काळजी घेऊ नये. वाजवीपेक्षा जास्त भ्रमनिरास होतो..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#writer #author #books #thoughts #giverespectgetrespect #attitude #coffee #smile

Read my thoughts on @YourQuoteApp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

Thursday, June 13, 2019

पहिला पाऊस..! :-)

मला कुठलीही पूर्व कल्पना न देता
आज अंधारात तो अचानक आला..
तशी नित्यानुसार गळा भेट झालीच
पण एकदम येऊनही वेगळा वागला..
म्हटल असेल काही बिनसल सांगेल
खांदा घेऊन माझा तिर्डीवर झोपला..
क्षणभराची ओल न् लपंडाव विजेचा
उगाच जणू हळदीचे बोट वैधव्याला..
येऊन जातांना काही वाटलं नसेलच
पाठीमागे उरलेलं दिसलं पण थेंबाला..
मग भिजलो, त्याच्यासह एकत्र अन्
तो भेटून, खेटून गेला आज रात्रीला..
पाऊस आज माझ्या स्मशानातल्या-
वाळवंटावर माती ओली करुन गेला..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#rain #nature #sand #time #love #she #fistrain #coffee

Read my thoughts on @YourQuoteApp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

Monday, June 10, 2019

फाट्यावर..! :-)

माणुसकीला मर्यादेची चौकट असते. त्यामुळे स्वतःची मर्यादा स्वतः जपायची असते. त्याचप्रकारे नाण्याला दोन बाजू असतात. अर्ध नाण झाकल की, बाजारपेठेत व्यवसाय होतात, हा गैरसमज आहे. आणि टाळीसुद्धा दोन्ही हातांनी वाजते. एकाहातानी मलाही फाट्यावर मारता येतं. म्हणून वाजवीपेक्षा जास्त मला गृहीत धरनाऱ्यांनी "मला स्पष्पणे नाहीसुद्धा म्हणता येतं" एवढं लक्षात ठेवावं. परिणामांची चिंता आणि काळजी मी कालही केली नाही. आजही करत नाही..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#life #experience #lesson #moral #giverespectgetrespect #slap #writer #author

Read my thoughts on @YourQuoteApp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

Friday, June 7, 2019

भडाग्नी..! :-)

.."माझ्यासारखा वादळ मग, अजून एका उध्वस्त वादळाची वाट बघतो.. काहीच जाणवू नये, मागे उरुही नये अन् देहाच्या भडाग्नीतून अस्तित्वाचे परतावे मिळूही नयेत.. तेव्हापासून आभाळ मनाचा पाऊस! दरवेळी नवा हिरवाशालू घेऊन येतोय.. तिच्यासाठी..!"
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#rain #story #writer #author #books #coffee #night #blacksky

Read my thoughts on @YourQuoteApp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

Sunday, June 2, 2019

नातेवाईक..! :-)

भांडणे लग्नाआधीची किंवा नंतरची, सोडवायला दोघांना तिसऱ्या उंबरठ्यावर जावं लागलं तर ते नातं तिथेच संपून जातं! एकानी काहीच अपेक्षा करू नयेत व दुसऱ्याने अपेक्षांची यादी वाचत फिरावं यावर नातं निव्वळ व्यवहारिक जुळत. त्यातही तंटे व अपेक्षाभंग अशी क्रियाविशेषण लागू झाली तर मात्र नात्याला पूर्णविराम देणं इष्ट असते! कारण इथे अपेक्षित व्यक्तीचं असते. उपेक्षित अन् अपेक्षाशून्य मतलबांना "नातेवाईक" म्हटले जाते..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#writer #life #story #new #eraser #struggle #coffee #latenightthoughts