Powered By Blogger

Wednesday, November 17, 2021

ललना..! :-)

 


गालबोट घेऊन हळदीचे

सौभाग्याचे धनी झालेत,

आतुर कामातुर ललनेचे 

काजळही ऋणी झालेत..!

- ✍ मृदुंग®

#kshan #writer #author 

 


Monday, July 26, 2021

राजा आणि रंक..! :-)

 ..आपल्या घरात आपण राजा आणि आपणच रंक असतो. त्यामुळे आलेल्या राजाचे राजासारखे आणि रंकाचे रंकासारखेच आदरातिथ्य करावे. कारण घर आपल्या कष्टाचं, संस्कारांच आणि पिढीचं वडिलोपार्जित आहे. त्यात हुकूमशाही पण आपलीच आणि राज्यही आपलेच असते. कारण चौकटीत आलेली शूर्पणखा आणि रावण आपला मृत्यू सोबत घेऊन गेले होते. दान मागितले म्हणूनच मिळते हे विधीलिखित दानपत्रात खोडले जाऊन मृत्यूने अधोरेखित केले जाते. त्यामुळे एखाद्याच्या घरात पायतानासकट वावरण्यास मुभा मिळाली याचा अर्थ त्यांच्या घराची दार बाहेर जाण्यासाठी उघडे आणि पायातली पायताने चिखलाने भरलेला रस्ता तुडवण्यासाठी सुसज्ज असावी असे सुचवितात. कारण काही मनावरची लक्तरे रुतलेल्या खिळ्यासारखी आयुष्यभर वागवावी लागतात. ती प्रवासात थांबून काढताही येत नाही आणि पुढे चालताही येत नाही. जे थांबले ती जोडपी एकटी होतात आणि जी चालत राहतात ती सोबत असतात एकमेकांकडे विरुद्ध तोंड करुन..!

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#writer #author #books #stories #attitude #igo #culture #doublestandard 

 



Wednesday, July 21, 2021

डास..! :-)

 डास..!


..शिक्षण जास्त असणाऱ्यांच्या पदरात परिस्थितीने कायम काही ना काही कमी पडत असते. त्यांची भूक प्रत्येक बाबतीत अधाशी बकासुरासारखी असते. अन् त्यांना हेवा कायम दुसऱ्याचा वाटत राहतो. अशी लोक आरशासमोर जात नाहीत. कायम दुसऱ्याच्या नजरेतून स्वतःच आयुष्य आणि स्वतःच्या नजरेतून इतरांचे आयुष्य बघत राहतात. त्यामूळे ना परिस्थिती बदलते ना समाज घडतो. निव्वळ डासांसारखी त्यांची भूनभून करणारी पैदास वाढत राहते..!

(मॉस्किटो किलर)

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#writer #mosquitohunter #killer #shayar #lifelessons #struggle #writersblock #coffee 

 



Saturday, July 17, 2021

लॉटरी..! :-)

 लॉटरी..!


..आपली परिस्थिती बदलण्यासाठी लग्नाचा आधार घेतल्यावर; बदललेल्या आणि सध्या असलेल्या परिस्थितीबद्दल असूया व्यक्तीच्या मनात खरचं असू शकते का? नाते औपचारिक झाल्यावर माणूस यंत्र होतो अन् त्याच्या कृती यांत्रिक! आपली परिस्थिती बदलण्यासाठी लग्न एकमेव पर्याय ज्यांना वाटतो; ते लॉटरीच्या तिकीटासारखे आयुष्य जगतात. ज्यांचं नाण खणखणीत असते त्यांचे हरवलेले नाणेही भरभराट करत असते. पण! परिस्थितीने आणि परिस्थितीमुळे लाचार बनलेल्या किंवा झालेल्यांना हे कळत नाही..!

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#lottery #writer #author #books #stories #writersblock #thoughts #sympathy 

 



Saturday, July 3, 2021

शोकांतिका..! :-)

 ..ज्याप्रकारे लग्न लादलं जातं त्याचप्रकारे आईपण आणि बापपण होणंही समाजातून लादलंच जातं. त्यामुळे आजचे आई-वडिल हे मुलांचे निव्वळ पालक होतात. मुलांचे संगोपन करणारे सामाजिक घटक दुसरेच बनतात. आणि मुलं हाताबाहेर गेलेली केस बनतात ही शोकांतिका आहे..!

- ✍ मृदुंग®


#writer #author #books #thoughts #life #parents #partner 

 



Thursday, July 1, 2021

अघोर..! :-)

 .. तंत्रविद्येत तेवणाऱ्या दिव्यावर फुंकलेल्या हळदीचेही दुष्परिणाम होतात.. जखम भरणारी हळद जीव घेणारी कशी होऊन जाते? थांगपत्ताही लागत नाही.. अघोरी सत्य एवढं विद्रूप असतं.. दिवंगत असतं आणि शाश्वतही..!

(अघोर)

- ✍ मृदुंग®


#aghora #writer #club #author #mystery #midnight #scared #scary 

 



Sunday, June 27, 2021

नैराश्य..!

 .. बितनाऱ्या परिस्थितीतून आणि घटनांमधून आत्महत्येचे पर्याय माणसाच्या समोर येऊन निर्णय होत असावेत. असून चिंता आणि नसून काळजी यात माणसाची जिंदगी घासली जात असल्यावर कुणाचा विचार आणि परिणामांची फिकीर करण्याची इच्छा माणसाला होत नाही एवढं नैराश्य त्याला घट्ट चिकटले असते..!

- ✍ मृदुंग®

 

 



Friday, June 25, 2021

अधिकार..! :-)

 आज गोष्ट अधिकारांची..!


नाण खरं असेल तर त्याच्या दोन्ही बाजूंना किंमतही असते आणि महत्त्वही. खोटं असलेल्या आणि चलनातून बाद झालेल्या नाण्याची अवस्था काय झालीय हे मागील नोटबांदित पहिलेच आहे. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वाचे अधिकार प्रत्येकाला असतात. जे अधिकार गाजवतात त्यांना वाटत सगळे अधिकार आपल्याला आहेत. पण जे गप्प राहतात त्यांच्याकडे दिलेले आणि बहाल केलेलं अधिकार काढून घेण्याचे स्वामित्त्व असते. त्यामुळे आपण नात्यांच्या बाजारात आहोत हे लक्षात ठेवायला हवं..!

- ✍ मृदुंग®

 



Wednesday, June 23, 2021

व्याज..! :-)

 प्रत्येक समाजात विविध पद्धती असतात. पण त्या पद्धतींना पद्धतशीरपणा तेव्हाच येतो जेव्हा स्वतःच्या ऐपतीनुसार औदार्य, मान, सन्मान करण्याची इच्छा जाणीव म्हणून निर्माण होते. यथा औकात नसणारे आणि नात्यांना निव्वळ व्यवहार समजणारे व्यापारी पद्धत सांगून "आमच्याकडे अशी पद्धत नाही", घोकत राहतात. त्यांच्यासोबत नातं जुळत ते व्यवहार म्हणून! अपेक्षा, आपुलकी आणि माणुसकी व्यवहारात नसते. अशा व्यवहारात काही असते तर ते परतफेड होणारे व्याज..!

- ✍ मृदुंग®


#lifelessons #relationships #maturity #immunity #tonic #titfortat 

 



Wednesday, May 26, 2021

बुद्ध पूर्णिमा..!

 ♥

मनुष्य की हर कृत्य का 

अच्छा और बुरा परिणाम होता हैं,

इसलिए मनुष्य का हित और अहित 

उसके कृत्य पर ही निर्भर हैं..!


।। बुद्ध पूर्णिमा की शुभ कामनाएं ।।

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#buddhapurnima #सिख #writer #author #stories #life #struggle #blessings 

 



Friday, May 14, 2021

निशित..! :)

 ♥

अक्षय्य स्मित तुझे,

भान विस्मित माझे;

असे हृदय स्तिमित,

हसे निखळ "निशित..!"

- ✍ मृदुंग®


#myson #Nishit #love #life #happiness #joy 

 



Friday, April 9, 2021

निर्बंध..!

 


निर्बंध लादले गेले की माणसाची नैसर्गिक बंडखोर वृत्ती जागृत होते. स्वतंत्र आणि स्वतंत्र हा मूलभूत हक्क व्यक्तीसापेक्ष असला तरी अपवाद बोटावर मोजण्या एवढेच निदर्शनास येत असतात. काळ कठीण असो किंवा दैनंदिन वृत्तीचे संस्कार जन्मजात अभिप्रेत असतात. अथवा सामाजिक मूल्यांचे भान ज्ञात झाल्यावर तरी. पण प्रत्येकात निर्बंधाची कठोरता आणि शिथलीकरण स्वभावतः असेलच याची अपेक्षा कुणीही करु नये. कारण सगळ्यातआधी काही भंग होत असेल तर त्या अपेक्षा. इच्छा वगैरे नात्यांच्या कोणत्याही आकडेमोडित नसतात..!

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#coffee #author #writer #struggle #covid19 #blankpage #writersblock #inkandpaper          

 



Saturday, February 6, 2021

शायराना..! :-)

 ♥

ज़िंदगी के अफ़सोस कई हैं..

दर्द से रिश्ता काफी पुराना हैं,

मेरा इश्क़-ए-दिल नुराना हैं..

मेरी अश्क-ए-मौत शायराना हैं..!

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#dil #ashq #ishq #writer #author #life #shayar #coffee




Friday, February 5, 2021

पंछी..! :-)

 ♥

मैं फिर उस पंछी को तलाश रहा हूं..

जिसके परों ने जीने की उम्मीद दी हैं,

बादलों से उपर तक छानबीन की मैंने

पर वो नादान पंछी दिल-ए-कैद में है..!

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#पंछी #क्षण #कैद #shayar #writer #author #stories #coffee  

 



Wednesday, January 27, 2021

परिस्थिती..!

 ♥

परिस्थिती..


एक असा रस्ता आहे ज्यावर शहाणा मूर्ख व मूर्ख शहाणा होतो. हा रस्ता ज्याच्यावर बितला त्याचा यथेच्छ अपमान होतो. या रस्त्यावरून जो सावरला त्याला मग झालेल्या अपमानाची आयुष्यभर क'सर काढण्याची मुभा मिळते. ओघवता प्रवाह मुकं वादळ असतं. ज्याला कधी वादळ समजला नाही तो बरबाद झाला. तो पुन्हा नव्याने कुठच वसला नाही. परिस्थितीने केलेली अवहेलना समजायला पुन्हा मग जन्म घ्यायचा तो परिस्थीचा. वादळं बनायला मोहताज व्हावं लागत नाही. वादळं व्हायला आतून बाहेरून फक्त उध्वस्त व्हावं लागतं आणि परिस्थितीला निमित्त बनावं लागतं..!

- ✍ मृदुंग®

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३


#क्षण #writer #author #books #stories #life #struggle #coffee