Powered By Blogger

Wednesday, December 31, 2025

नव्याने..!


नव्याने..!

जगला जो-तो ज्याचं-त्यांच आयुष्य,
मन मारुन किंवा...... आनंदाने..
मिळालंय ज्याचं-त्याला भरभरुन,
हवं तेही-नको तेही.... अनिच्छेने..
गमावलं ज्याने-त्याने बरंच काही,
तुटपुंजी उरली आहे.... नैतिकतेने..
शिल्लक-बाकी-एकाकी निर्ढावलेली,
काळजातली कळ बोलली.. वेदनेने..
सरल्या वर्षाला देऊन दे निरोप,
पुन्हा तेच जगणे-मरणे.... नव्याने..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३


#kshan #writer #author #newyear2026 #newstart #dairy #coffee #writersblock