Powered By Blogger

Monday, August 10, 2026

अवस्था आयुष्याची..!


♥ क्षण..! ♥

मुसाफिर कॅफे..

अवस्था आयुष्याची..!

मानसाला स्वतःच्या मनावर नियंत्रण फार उशिराने मिळते.. काही वेळा असे जाणवून जाते की, फार लवकर घटना घडल्यात..तर काही वेळा जाणवते वेळ झालीये पण हवं ते घडतंच नाही..काळाच्या पुढे आणि वेगाच्या दरम्यान हरवतात ती स्वप्ने आणि जपून ठेवलेले क्षण..
पावले चालतात, घड्याळाची काटेही टिक-टिक करत पुढे सरकू लागतात..मन तेव्हाही अस्वस्थचं..जणू आता एखाद्या स्वप्नातून खऱ्या अर्थाने जाग येईल आणि आपण पून्हा त्या उंबरठ्यावर उभे राहू जिथून आपल्याला मागे किंवा पुढे चालायचेच नाही..
तुटलेल्या स्वप्नांची आणि हरवलेल्या क्षणांची सांगड घालतांना जोरात जागेवरच तुटतं ते हृदय.. अन्  या तुटलेल्या हृदयाची कळ निघते ती मनातून शरिरापर्यंत जी वास्तव हेलावून सोडते..तेव्हा घेतला गेलेला श्वासही मग जड झालेला असतो तो अंतःकर्णातून..ज्यावर अधिराज्य गाजते ते वेदनेचे..सत्ता कोसळते ती प्रेमाची..राज्य येते ते एकांताचे..अन् अवस्था होते ती आयुष्याची..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#musafircafe #kshan #coffee #writerblock #path #waytoexpress


मुसाफिर कॅफे..!

♥ क्षण..! ♥

मुसाफिर कॅफे..!

सिरिज पाहता-पाहता मनाला स्पर्शून गेलं की, मीही जी गोष्ट.. बहुतेक अनेक गोष्टी ज्या जिथे अर्धवट सोडल्या तिथून त्या पूर्ण करुन घेऊन माझ्यातल्या लेखकाला जाग करावं आणि माझं अर्धवट लिखान वारंवार वाचून पूर्ण करण्यासाठी सपाटा लावणाऱ्या वाचकांना उपलब्ध करुन द्यावं..
 पण.. काही गोष्टी ह्या अर्ध्यातच परिपूर्ण असतात.. त्यांना पूर्ण करण्याचा घाट घालने हे त्या क्षणांचे महत्त्व आणि त्यांचे अस्तित्व पूसण्यासारखेच..
तरी वाटतं, आताच नाही प्रत्येक क्षणी वाटतं..करुन द्याव्यात सगळ्याच गोष्टी पूर्ण.. या अपूर्णत्त्वाचेही लेणं आता बरे नव्हे..
..करुन द्यावी पून्हा प्रवासाला सूरुवात.. जिथे माझ्यातला तो प्रत्येक क्षण मनमोकळा होईल..!

- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#kshan #coffee #writersblock #travel #thinking #about