Powered By Blogger

Tuesday, July 31, 2012

प्रायश्चित्त....!

क्षण... !

प्रायश्चित्त....!

काही दिवसांपासून पाऊस माझ्याशी खेळ करत आहे, मी कुठे अडकला असतो तेव्हा बाहेर मनसोक्त बरसत आहे, त्याची माझी हल्ली चूकामुकच होत आहे, मला भेटायची ओढ त्यालाही नसेल का?? मी भेटत नाही म्हणून कदाचीत एकटाच रडत नसेल का?
त्याची चाहूल लागून भेटायला येईल मी अशी खुळी अशा तो ठेवत नसेल का? जसे पावसासाठी आपण तरसतो आपल्यासाठी तो तरसत नसेल का? खुळ्या मनाचे खुळेच विचार... माणसांसारखा तोही स्वार्थी झाला असेल... आपापल यायचं बरसायच अन निघून जायचं... जेव्हढे आपल्या थेंबात एकवटले तेव्हढे क्षण एकवटून घेऊन जायचं... आणि जेव्हढे निसटले त्याचं प्रायश्चित्त कधीतरी कुठल्याश्या क्षणात करत बसायचं...

बरसत असतो मी तेव्हा प्रत्येकाला कोणी ना कोणी आठवत राहतो... बहुतांश रोमॅन्स, शाळा, कॉलेजची कॅंटीन, चौपाटीवरची भेळ...आणि काय काय...

बाहेर रिपरिप सुरु असते तेव्हा माझ्या मनात खूप राग येतो... एकदाचा मुसळधार कोसळ आणि बंद हो... पण नंतर एक विचार मनात येतो आपल्याला आपल डोक लपवायला निदान घर तरी आहे अथवा ऑफिसचे छत... पण रोडवर राहणार्‍या गरिबांच काय... मुंबई सारख्या धारावी झोपडपट्टीत राहणार्‍या लोकांच काय... एक मुंबईतच झोपडपट्टी आहे अस नाही... प्रत्येक गावाचा, शहराचा, जिल्ह्याचा एक अविभाज्य घटक आहे झोपडपट्टी... ज्या छिद्र पडलेल्या कौलांच्या झोपडीत दोन वेळच जेवण शिजनही कठीण असत त्या घरात रिपरिपणारा पाऊसही किती थैमान घालत असेल...

कौलांच्या छिद्रातून घरात येणार्‍या पावसाच्या थेंबांना एकवटायला घरातल एक जर्मनच भांड लावलं जात... भांड भरलं का ते पाणी बाहेर फेकून पुन्हा त्याच छीद्राखाली लावलं जात... पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही... थांबेल थांबेल म्हणत संध्याकाळच्या जेवणाची वेळ होते आणि जेवण शिजवायच भांड त्या छिद्रखाली सापडलं असत... दुसर पर्यायी भांड त्या गरीब घरात कोणतच नसत... आणि आपण बस... पडतोय पड रे बाबा पड खूप गरम होतंय तेव्हढाच गारवा तरी मिळेल या अनुषंगाने पावसाचे कृत्यार्थ होऊन जातो...

अन पाऊस न बरसता प्रायश्चित्त करत राहतो... एक दिवस तरी विना पावसाचा दिलासाच त्या झोपडीतल्या नाट्याला देत राहतो... पाऊसही कधीकधी आपल्या थेंबांना आवर घालत असतो... अन कुठेतरी क्षणभरचा दिलासा देत राहतो... पुन्हा नवीन दिवस... नवा पाऊस जुनेच नाट्य अन जुनेच श्रोते.... नव्याने....
.
मृदुंग
३१.०७.२०१२

Thursday, July 26, 2012

तुमच्या आयुष्यात प्रभाव टाकणारी व्यक्ती कोण ??

क्षण...!


तुमच्या आयुष्यात प्रभाव टाकणारी व्यक्ती कोण ??

प्रभाव टाकणारा व्यक्ती म्हणन खर तर चुकच ठरेल माझ्या दृष्टीकोनातून पण "प्रभावित" करणारा योग्य ठरेल....


तस तर एक पानठेल्यावाला आहे वय जवळपास १६ नाव सागर

मुळचा राहणार सावद्याचा जळगाव जिल्ह्यातल्या येणार्‍या काही गावांमधले एक... वडील लहानपणीच वारलेले कारण शेती थोडक्यात कर्ज, शेतकर्‍याच्या मृत्यूच कारण थोडक्यात आता आपण सर्वेच गृहीत धरतो तसच याच्या घरचं ही तेच कारण... राहत घर आहे तेव्हड बर तेपण गहाण होत त्याचा काका धावून आला म्हणून कसबस वाचलं... त्याच्या काकाच्या पान टपर्‍या आहेत इथे जळगावात त्याने नुकतीच १०वि ची परीक्षा पास केली फर्स्ट क्लास मध्ये कुठल्याही प्रकारची शिकवणी न लावता...

काकांच्या कृपेने एक टपरी तो सांभाळतो, नेमकी त्याची टपरी देशी गुत्त्याजवळच आहे त्यामुळे परिस्थितीने खालावलेले अन व्यसनाच्या आधीन गेलेल्या खेडूत अन शहरी दारूड्यांना हा पोरगा उपदेशाचे डोस पाजतो ते पण व्यसन करू नका म्हणून... माझ आपल कॉफी काही सुटत नाही म्हणून मी सहजच कुतूहल म्हणून त्याच बोलन ऐकत होतो अन विचारात पडत होतो, ताणून झोपायच्या काळात हा पोरगा पोटापाण्याचा व्यवसायही करतोय आणि कधी उपाशी राहिला तरी उद्या मोठे होण्याची स्वप्नही बघतोय त्याच्या त्या कोवळ्या वयातील प्रौढ विचारांनी मी खूप प्रभावित झालो न राहवून त्याची थोडी चौकशी पण केली त्याला खूप शिकायचं म्हणतो पण कुणाचे उपकार घेऊन नाही स्वताच्या स्वाभिमानाने आणि इमानदारीने कमवून शिकेल पण शिकेल. त्याच वय आणि व्यावहारिक बोलन एकूण एकदम प्रभावितच झालो...

बाकी पोरगा नावासारखाच मनानी आहे... अन मनात घर करून राहणारा आहे सध्या ११वि कॉमर्सला आहे.....
.
मृदुंग

♥ कधी कधी वाटत...! ♥

क्षण...!

कधी कधी वाटत...!

कधी कधी वाटत देवाने उगाचच मन दिले नको तितके हजारो आपल्या काहीही कामाचे नसलेले विचार मनात येत राहतात कधी जुन्या आठवणी मनात दाटून येतात तर त्याच त्याच रटाळ जगण्याची सवय ओठंना उगीचच हसायला लावतात

मनाची एकग्रता करावी तरी कशी सालं! कळतच नाही आपल्याच तंद्रीत असलेले आपण पाठीमागून कधी कुणाची थाप पडते आणि एखाद श्वान गाडीखाली सापडल्यावर त्याची जशी केवीलवाणी अवस्था होते तशी कधी कधी आपलीही होते कुठे हरवत हे मन तिच्या विचारात.... ???

छे कहीतरीच काय ती कुठे तू कुठे काही ताळ मेळ तरी आहे काय?? तिचा अस विचार करण्या इतपत तू तिला ओळखतोस काय?? काय माहिती आहे तुला तिच्या बद्दल?? जे माहिती आहे ते खरच आहे कशावरून ती खोट बोलत असेल तर ?? तू तरी कुठे खर खर तुझ्या बद्दल सांगितले आहेस तुझे ही अफेअर होते ते.... मी सांगितले आहे तिला माझ्या बद्दल सगळे खरे खरे !! अगदी सुरुवाती पासून आता पर्यंत जे काही झाले ते सगळ सांगितलंय मी तिला....यात माझ मन थोड स्वार्थी झालंय मला मान्य आहे, मी माझ मन माझ्या मनातली घुटमळ कुणाला तरी सांगायची होती अगदी एकटा किती रे सहन करणार किती काळ मनातच ठेवणार होतो मी ते सगळ असह्य झालंय अजिबात सहन नाही होत आता खूप झाल ज्याला पाहव तेव्हा तेव्हा माझ घर ठोठावणार नाही ठोठावणार सरळ आत येणार आणि काय सगळच लुटून जाणार ?? माझ जन्म काय देण्यासाठीच झालाय का मला नसेल का वाटत कुणाला दोन क्षण माझ मन काळाव मला समजून घ्याव !! मला नाही का हक्क माझ मन हलक करायचा माझ टेंशन कुणाला देयाचा ?? मी किती ऐकून घेणार किती समजावणार अजून किती त्यांच्या अडचणी माझ्या मनात कोंबणार ....?

त्यांनी याव भडाभडा मनातले सगळे गार्‍हाणे सांगावे आणि काय करू आता विचारावे ?? मी का सांगू तू अस कर---तस कर हे करून बघ सगळ ठीक होईल??

त्यांना आलेल्या अडचणी साठी माझ्याकडे उत्तरे आहेत पण माझ्या अडचणींना मी का म्हणून लपून ठेऊ का मी नको सांगू कुणाला?? का ?? का हे माझ्या सोबतच होत??

का??
.
मृदुंग

♥ ♥ मैत्री ♥ ♥

क्षण... !

♥ ♥ मैत्री  ♥ ♥

ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार आपण मैत्री दिवस म्हणून साजरा करतो, खर म्हणजे पाश्चात्य संस्कृतीतील डे'झ आपण डे बाय डे अंगवळणीच पाडून घेतले आहे
पण खरच छान दिवस असतात हे अगदी कधी नव्हे तो एक दिवस मित्र मैत्रिणींसोबत एनजॉय करायला आणि जमलंच तर तो दिवस आपल्या मनातल्या आठवणींच्या पानात जपून ठेवायला... नाही नाही ते कल्पना मनात घर करू लागतात कुठे जायचं कस जायचं तरुण मन सळसळत रक्त धाडसी प्रवृत्ती कसलीच तमा बाळगत नाही... आणि हो या दिवसासाठी घरी बरंच काही खोट बोललं जाते बर का रात्रीचा आऊटिंग आणि स्टे असेल तर... मित्राच्या बहिणीच लग्न, बर्थडे पार्टी आणि काय काय... पण ते दिवस असतात पुढे कधी येणारे नसतात वडिलांशी एक वेळ आपण खोटे बोलतो पण बाहेर जातांना आईला नाही तर मोठ्या भावाला बहिणीला खर काय ते सांगून जा कारण कमी जास्त काही झाले तर निदान ते तुम्हाला पाठीशी घालू शकतात अथवा मदतीला तरी येऊ शकतात... पण मैत्रीचा दिवस म्हणून ड्रिंक्स घेतलीच पाहिजे असे नाही या शिवायही मैत्रीचा दिवस वेगळ्या पद्धतीने आपण सेलेब्रेट करू शकतोच ना... असो तुम्हाला कितीही काही सांगितले तरी तुम्ही ऐकणार थोडी "मेरी मर्जी" नुसार करा काहीपण पण प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते तिथपर्यंतच आणि तेव्हडच.....! :-)

तस पहिले तर मित्र आणि मैत्रिणींची संकल्पना शाळेपासून सुरु होते... आणि असे बरेच उदाहरण आहेत जे शाळेपासून ते कॉलेज, कॉलेज पासून ते आपल्या आयुष्यात मैत्रीचे अग्रगण्य स्थान ठेवून असतात, जोडलेली नाती टिकवून ठेऊन असतात शाळे नंतर वाटा वेगळ्या होयच्या कारण कॉलेजसाठी प्रत्तेक जन वेगळी शाखा निवडायचा... मग सेक्शन वेगळे मित्रांसाठी मैत्रिणींसाठी वेळ जमणे अशक्यच त्यातही मग एखादी मैत्रीण एखादा मित्र आयुष्यात आला अथवा आली तर सगळ दूरदूरच होऊन जात.... मित्र मैत्रिणी आठवतात तेव्हा जेव्हा एखाद पाऊल चुकत, एखादी व्यक्ती चुकीची जोडली जाते सर्वे सुज्ञ आहेत चुकीचे काही पण आपल्या जागेवर ते व्यवस्थित असतात... पण आपल कस सगळ चांगलं-चांगलं हवे असा अट्टाहास थोडक्यात अपेक्षा असते... पण एखादा निर्णय चुकला अथवा व्यक्तीही निवडण्यास चुका झाली तरी आयुष्यात असेही प्रसंग असावेत मी तर म्हणतो आवर्जून यावेत... काय प्रत्येक चुकीची वेळ आपल्याला त्याचं खर प्रतिबिंब दाखवून जात असते अस मला तरी वाटत... पण एक मैत्री अशी असावी, ज्यात कसलीच अपेक्षा नसावी, एक नात जोडलं जावं आणि आयुष्यभर जपलं जावं... हल्ली माझ्या मैत्रिणी म्हणतात मैत्रिणीपेक्षा एक मित्र असलेला कधीही चांगला...आणि मित्र म्हणतात मित्रांपेक्षा एक मैत्रीण असलेली कधीही चांगली... मान्य पण सगळेच नशीब घेऊन येत नाही हे ही तितकेच खरे ना... मित्र मैत्रिणी असावेत एकसमान असावेत त्यात हेवे-दावे नसावेत... न स्वताचा स्वार्थ असावा... आयुष्य खूप सुंदर आहे मैत्रीच्या दिवस ५ तारखेला आहे पण त्या आधी २ तारखेला राखी आहे रेशमी बंध.... दरवर्षी राखी नंतर मैत्रीचा दिवस येतो हे मात्र खरय... कारण माहित नाही पण रेशमी धाग्या नंतर आपलेपणाचे धागे अधिक घट्ट होत जावं अशीच त्या निसर्गाचीही इच्छा असेल... अजून वेळ आहे या दिवसांना पण मी मात्र माझे आता पासूनच प्लॅन करायला सुरु केलंय... राखीला ताईला काय देयच.... आणि मित्रांना मैत्रिणींना आयुष्यभर लक्षात राहील अस एखाद गिफ्ट काय देयच.... तुम्हिही बघा ठरवलं नसेल अजून तर ठरवा.... कारण वेळ भुर्कन निघून जाते... बघा काही सुचतंय का नवीन आणि वेगळे काही....

एक जुने गाणे सतत ओठांवर येते,

"ये दोसती हम नाही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे..."

आणि शेवटी येत...

"दिल चाहता है, हम ना रहे कभी, यारो के बिन..." :-))
.
मृदुंग
२५.०७.२०१२

♥ शेवटची फुले पाठवली....! ♥

क्षण....!

शेवटची फुले पाठवली....!

मला कधी नव्हे ते आज तूच आठवली म्हणून काही आठवणींचे फुले पाठवली...
गंध त्या फुलांचा हरवण्या आधी तू घेऊन घे, गंधित फुलांना मनातच साठवून घे...
आठवेल ना कधीतरी तुला मीपण ? कोमेजलेले हीच फुले तेव्हा तू जवळ घेशील...
माझी एक आठवण म्हणून फुलांवर अश्रूंचा सडा पडेल, येव्हाडी तू हमसून रडशील...

प्रकर्षाने तुला माझी ओंजळ आठवेल पण, तेव्हा तुझ्या आयुष्यात मी कधीच नसेल...
क्षणात जवळ असतील हीच फुले तुझ्या, पण त्यांचा गंध मी त्या फुलांत कधीच नसेल...
जातोय असा आज तुझ्यापासून दूर, एकटीच तू अनवाणी शोधात माझ्या फिरू नकोस...
तुझं एक तुटलेलंच स्वप्न आहे मी, पुन्हा कधीच मला तुझ्या पापण्यात ठेऊ नकोस...
.
मृदुंग
२६.०७.२०१२

Monday, July 23, 2012

!! गंध गुलाबाचा प्रवास क्षणांचा !!



!! गंध गुलाबाचा प्रवास क्षणांचा !!
कधी कधी वाटत उगाचंच माणसाच्या जन्माला आलो, नाही त्या रोजच्याच कटकटीत अडकलो... तेच तेच रोज कंटाळवाण जीन जगायचापण कधी कंटाळा येतोच,
मनात थैमान मांडलेल्या विचारांचा काहूर, नाही नाही त्या शंका-कुशंका मनात फेर धरून नाचत असतात, प्रेत्तेकजण असाच का वागतो, कशाला दुस-याच्या जीवनात घुटमळतो?? त्यापेक्षा एखादी शोभेची वस्तू म्हणून जन्माला आलो असतो तर... काही दिवसाच्या चमक-ढम
क नंतर अडगळीच्या खोलीत तरी राहीलो असतो, पुन्हा उपयोगात न येणारी वस्तू म्हणून...एक माणूस म्हणून अडगळीत आता जावू पण शकत नाही... वस्तू दुर्लक्षित होतात पण एक आपलं माणूस... कसा दुर्लक्षित होईल... नाही म्हंटल तरी जास्त काळासाठी अजिबात नाही त्या माणसाच्या नसण्याचा रितेपणा थोड्याच अवधीत जाणवू लागतो...

नकळत त्या माणसाची उणीव भासू लागते, असते ते तर... नेहमीच दूर केलेल्या माणसाजवळ जावून परत येण्यास किती वेळा साकड घालायचं?? काही दिवस नेटाने वागवून, आपल्या कामाचं ओझं हलक करून झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करायची सोडून... हिणवायचे?? उगाचं परत आणलं, होतात आश्रमात तेच बर होत, काहीच उपयोगाचे नाही, एक साध काम, धड करता येत नाही, अपमान करून अक्षरशः शेवटी हाकलण्या पर्यंत मजल जाते... पण मनात साधा विचार येत नाही ते स्वत: नव्हते आले आपण बोलावलं होत, येण्याच औचीत्य आपण साधलं, आपलं काम झालं नेटाने आपण बोलुही शकत होतो या आता... येव्हडा घृणास्पद अपमान कशाला ?? पुन्हा गरज पडली तर दोन वेळच अर्धच जेवण, दुपारी एकदाच मिळणा-या दोन घोट चहा मध्ये दुसर कोण काम करणार आता?? स्वार्थ स्वताचा फक्त स्वार्थ साधतात इथली माणस...

कधीच दुस-याच्या मनाचा, भावनांचा विचारच करत नाही, काही बोलत नाही आपली व्यक्ती म्हणून किती वेळा छळणार ?? कधी-ना-कधी सहनशीलतेचाही अंत होणारच ना?? चार भिंतीत, चार माणसात गुप्त असलेलं स्वभावाचं नागड रूप जर कुणाला कळलं तर... कापर भरत ना नुसता विचारही करून, पण नाही ती व्यक्ती अस करूच शकत नाही एव्हडा ठाम विश्वास असतो, कितीही आपण चुकीची वागणूक दिली तरी ती व्यक्ती आपलं वाईट कधीच करूच शकत नाही, मग आपण त्या व्यक्तीला असे तुच्छतेने का वागवतो?? यंदा चूक झाली पुढच्या वेळेस अस नाही होणार म्हणून वापस आणलं होत आता फक्त माफी मागायची आहे... पिकलेलं पान आहे गळून पडायच्या आधी सर्व चुकंना कबूल करायचं आहे... पण केव्हा आत्ता लगेच होय असतील कुठे ते माहीत आहेच पण माफी देतील?? देतीलच माझी माणस आहेत... पण ते आता तुला आपलं समजतीलच कशावरून..? नाही ते अस वागूच शकत नाही खात्री आहे मला, आत्ता अजून उशीर नको जायला हवं आश्रमात... हे काय सगळे पांढ-या पोशाखात, शिणलेला चेहरा, पाण्यात बरबटलेले डोळे.. हातात एक गुलाबच फुल कशाला?? काय चालू आहे आज नेमक आश्रमात?? प्रत्तेकाच्या नजरेत काही समजतंय का शोधत तो साहेबरावांच्या खोली कडे चालू लागला... खोली बाहेर गर्दी जमली होती, साहेबरावांच्या आवडीच्या गुलाब अगरबत्तीचा मंद गंध पसरला होता.. त्याच गंधात धुंद होवून त्याने साहेबरावांच्या खोली प्रवेश केला, साहेबराव त्यांच्या कॉटवर शांत झोपले होते, चेह-यावर समाधान होते, आलेल्या मृत्यूचे संतुष्टीचे भाव चेह-यावर होते, काहीच बाकी राहिले नाही सगळे संपले...

"आयुष्यभर माझ्या माणसांनी येथेच्च हेटाळले, हिणवले, अगदी हाकललेही, पण त्यांच्या या वर्तुनिकीचा मला राग कधीच आला नाही, दाखवत नसले कधी तरी, मनातून मला जपत होते, सांभाळत होते, माझ्यापासून दूर कधीच नव्हते एका माणसाला अजून काय पाहीजे? माझ्या मृत्युच्या दिवशी जन्मभर माझा राग करणारी व्यक्ती, माझा गतप्राण देह पाहून, दुखाच्या वादळात माझ्या इतक्या जवळ असेल या पेक्षा सुखाची गोष्ट दुसरी कोणती? राग, द्वेष पैशांचे मिजास करावे पण मनात असलेल्या प्रेमाची तुलना कशाशीच होत नाही..." मी कधी कुणाचा राग केला नाही अन द्वेषही मी प्रेम करत होतो त्यांच्या प्रत्तेक वागण्यावर... कसलीच अपेक्षा न ठेवता !

थोरले सरकार साहेबरावांची शेवटची इच्छा होती त्यांचा "वैकुंठ धामाचा" पुढचा प्रवास तुम्ही आरंभवावा, मी फक्त होकारार्थी मान हलवली...
मी इथे आलो कशासाठी होतो, तब्बेतीने धड-धाकट असलेला माणूस इतकं सहज कसा सोडून जावू शकतो...?

साहेबरावांना गुलाब खूप आवडायचे एकदा म्हणाले होते.. मृत्यू नंतर एक जन्म गुलाबाचं फुल म्हणून घेईल, प्रेमाचा धुंद लाल रंग माझ्या पाकळ्यांना मिळेल, माझ्या उमलण्याची आतुरतेने वाट कोणी बघत असेल,एका रम्य सकाळी जेव्हा मी सोनेरी किरणांसोबत हसेल, मोहक रुपात माझ्या काही क्षण तोही स्वताला हरवेल, नाजूक हातांनी अलगत मला तोडून जेव्हा तो प्रियसिला मला नजर करेल माझ्या लाल गुलाबाची गुलाबी लाली तिच्या गालांवर त्याला दिसेल, त्याला होकार देतांना ओठ थोडे थरथरतील, हातात हात घेईल तेव्हा बोटांतून अलगत मी निसटेल, तू दिलेला पहीलाच गुलाब हा म्हणून ती सतत मला जपत राहील, कधी चिडून मला पायाखाली तुडवूनही जाईल, कधी तू नसतांना तुझ्या आठवांत माझ्याशी गुजगोष्टी करत राहील, माझ्या पाकळ्यांना नाजूक बोटांनी कुरवाळत राहील, कारण फुलं आपलेपणा जपतात, म्हणून मला एक गुलाबाचं फुलं बनायचं आहे...!


मृदुंग
०६.०४.२०१२

Thursday, July 12, 2012

चारोळ्या........!







शाळा.....!


आपल्या लाईनलाही कळले नाही पाहिजे आपण तिच्याकडे पाहतोय........ चूकीचा डायलॉग होता शाळा चित्रपटातला...

कुणाला नाही पण आपल्या लाईन ला कळतंच आपण तिच्याकडे पाहतोय...
आयुष्याच्या एकट्या पावूल वाटेवर एक हक्काची लाईन मागतोय ....


एका सरळ रेषेच चालूनही लाईन, आपल्यावरच अडखळली असते...
सुखद स्वप्नांचं छोटस विश्व लाईनच्या रुपात आपल्याला मिळाले असते ...

लाईनला जेव्हा कळत आपण तिला लाईन देतोय...
तेव्हा लाईन नकळतच मधले अडथळे दूर करते...

कुठे नाही ते लाईन चे महत्व शाळेत कळते...
शेवटी पहिली लाईन वर्गात असते...

आपल्या लाईनची ती पहिली सरळ रेष, आपल्या आयुष्याच्या वर्तुळात नकळत उमटली असते...
लाईनला जेव्हा कळत आपण तिला लाईन देतोय...तेव्हा लाईन नकळतच मधले अडथळे दूर करते...

लाईनच्या मागे मागे आपली पावले चालत राहतात, डोळ्या समोर न दिसता लाईनचे डोळे पाणावतात...

शाळेत शिकलेला प्रेमाचा धडा आयुष्यभरासाठी लक्षात राहतो, आपल्या लाईनलापण आपण आवडायचो हे आयुष्यभर लक्षात राहते...
आयुष्याची खरी खुरी लाईन लग्ना नंतर लागते....शाळेतली लाईन बायकोला सांगितली तर बायको हसते...

बायकोपेक्षा लाईनची जास्त तारीफ केली तर बायको जळते... हल्ली.म्हणून कधी कधी भाजी तिखट आणि खारट होते.....

.
मृदुंग