Powered By Blogger

Tuesday, July 31, 2012

प्रायश्चित्त....!

क्षण... !

प्रायश्चित्त....!

काही दिवसांपासून पाऊस माझ्याशी खेळ करत आहे, मी कुठे अडकला असतो तेव्हा बाहेर मनसोक्त बरसत आहे, त्याची माझी हल्ली चूकामुकच होत आहे, मला भेटायची ओढ त्यालाही नसेल का?? मी भेटत नाही म्हणून कदाचीत एकटाच रडत नसेल का?
त्याची चाहूल लागून भेटायला येईल मी अशी खुळी अशा तो ठेवत नसेल का? जसे पावसासाठी आपण तरसतो आपल्यासाठी तो तरसत नसेल का? खुळ्या मनाचे खुळेच विचार... माणसांसारखा तोही स्वार्थी झाला असेल... आपापल यायचं बरसायच अन निघून जायचं... जेव्हढे आपल्या थेंबात एकवटले तेव्हढे क्षण एकवटून घेऊन जायचं... आणि जेव्हढे निसटले त्याचं प्रायश्चित्त कधीतरी कुठल्याश्या क्षणात करत बसायचं...

बरसत असतो मी तेव्हा प्रत्येकाला कोणी ना कोणी आठवत राहतो... बहुतांश रोमॅन्स, शाळा, कॉलेजची कॅंटीन, चौपाटीवरची भेळ...आणि काय काय...

बाहेर रिपरिप सुरु असते तेव्हा माझ्या मनात खूप राग येतो... एकदाचा मुसळधार कोसळ आणि बंद हो... पण नंतर एक विचार मनात येतो आपल्याला आपल डोक लपवायला निदान घर तरी आहे अथवा ऑफिसचे छत... पण रोडवर राहणार्‍या गरिबांच काय... मुंबई सारख्या धारावी झोपडपट्टीत राहणार्‍या लोकांच काय... एक मुंबईतच झोपडपट्टी आहे अस नाही... प्रत्येक गावाचा, शहराचा, जिल्ह्याचा एक अविभाज्य घटक आहे झोपडपट्टी... ज्या छिद्र पडलेल्या कौलांच्या झोपडीत दोन वेळच जेवण शिजनही कठीण असत त्या घरात रिपरिपणारा पाऊसही किती थैमान घालत असेल...

कौलांच्या छिद्रातून घरात येणार्‍या पावसाच्या थेंबांना एकवटायला घरातल एक जर्मनच भांड लावलं जात... भांड भरलं का ते पाणी बाहेर फेकून पुन्हा त्याच छीद्राखाली लावलं जात... पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही... थांबेल थांबेल म्हणत संध्याकाळच्या जेवणाची वेळ होते आणि जेवण शिजवायच भांड त्या छिद्रखाली सापडलं असत... दुसर पर्यायी भांड त्या गरीब घरात कोणतच नसत... आणि आपण बस... पडतोय पड रे बाबा पड खूप गरम होतंय तेव्हढाच गारवा तरी मिळेल या अनुषंगाने पावसाचे कृत्यार्थ होऊन जातो...

अन पाऊस न बरसता प्रायश्चित्त करत राहतो... एक दिवस तरी विना पावसाचा दिलासाच त्या झोपडीतल्या नाट्याला देत राहतो... पाऊसही कधीकधी आपल्या थेंबांना आवर घालत असतो... अन कुठेतरी क्षणभरचा दिलासा देत राहतो... पुन्हा नवीन दिवस... नवा पाऊस जुनेच नाट्य अन जुनेच श्रोते.... नव्याने....
.
मृदुंग
३१.०७.२०१२

No comments:

Post a Comment