Powered By Blogger

Sunday, September 9, 2012

ऑक्सिजन :- शुक्रवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध अंकावरील प्रतिक्रिया

लेख वाचण्या आधी पुण्यात उघडकीस आलेल्या चिल्लर पार्टीचा लोकमत ऑक्सिजन मधील वृत्तांत वाचवा...

लिंक :- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=OxygenEdition-57-1-07-09-2012-d5b23&ndate=2012-09-07&editionname=oxygen

ऑक्सिजन

शुक्रवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध अंकावरील प्रतिक्रिया


***मी माझे वयक्तिक आणि काल्पणिक मत मांडत आहे, याचा वास्तवाशी मेळ आढळल्यास निव्वळ योगा-योग समजावा.

खरं तर प्रतिक्रियेला कशी सुरुवात करु तेचं कळत नाही आहे. ९वी १०वी ची कोवळी चिल्लर पार्टी पुण्यात उघडकीस आली.

वाचुन अगदी सुन्नचं झालो, काय करावं काय नाही असं झालंय, पण जे झालं ते झालं म्हणुन सोडूनही देता येत नाही आहे.

साने गुरुजी म्हणतात "मुलं ही देवा घरची फ़ुलं", पण हीच मुलं हल्ली अशी का वागत आहेत खरंच कळत नाही. एक वेळ अशीही होती जेव्हा शिक्षक शिक्षा कठोर करतात म्हणुन पालक तक्रार करायचे त्यांचा उद्देशही तसा योग्यच होता. ज्या गोष्टी समजवून सांगता येतात त्या गोष्टींसाठी शिक्षा कशाला हवी...?

तरी पण नाही म्हंटलं तरी विषय चुक कुणाची असा आहे, पण यात चुक प्रत्येकाची आहे असं मला तरी वाटत ते कसं काय म्हणाल तर....

आई-वडिलांशी मुलांचा संवाद असतो पण त्यांच्या वयातून विचार केल्यास अशा पार्टी बाबद घरी मुलं तरी सर्रास लपवतात हे होणं सहाजीकच आहे कुठलाच मुलगा अथवा मुलगी आम्ही पार्टीला जातोय, आणि तिथे काय करणार, काय खाणार, काय पिणार हे सांगुन जाणार नाहीच, याची वच्यता केल्यास प्रवेश बंद अशी ताकीद पार्टी अरेंजर्स कडून सुरुवातीलाच मिळाली असेल मुलांना त्यामुळे हे लपवायच आणि जायच असही असू शकते पण ते काय सांगुन जातात घरी हाही प्रश्न नाही आहे.

मुळ प्रश्न आहे या मुलांना दारु सिगरेट या व्यसनांची चटक लागली कशी...? याचे मुळ खुप खोलवर असण्याची शक्यता आहे अस मला तरी वाटत, कारण पार्टीसाठी उपलब्ध झालेली दारु यांनी आणली कुठून...? मान्य अरेंजर वयाच्या अटीत आहेत. एकदा ठीक पण दिड ते दोन महिन्यात सहा ते सात पार्ट्यांसाठी लागणार्‍या मद्याचा पुरवठा यांना केला कोणी...? आपल्या भारतात दारु बंदी खाते आहे यांच्या अंतर्गत प्रत्येक वाईन शॉप, बिअर बार यांना ठरावीक मर्यादे पर्यंत साठा करुण ठेवता येतो आणि जरी पार्टीसाठी ऑरडर असेल तर यांची आगवू बुकिंग करावी लागते अशा बुकिंगवर दारु बंदी खाते अथवा विक्रेते शहानिशा का करत नाहीत...? की, ऑरडर स्विकारुन आणि त्या पुर्ण करुण कंपनी कडून मिळनारा फ़क्त फ़ायदा पाहीला जातो...? हे प्रश्न खुप महत्वाचे आहेत. १८ वर्षा खालील मुलांना तंबाखू आणि तत्सम पदार्थ विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे... मग त्याच कायद्यात १८ वर्षा खालील मुलांना हे पदार्थ सेवन करण्यासाठी उपलब्ध करुण देण्यार्‍यास काय शिक्षा आहे...??

मध्यंतरी मागील जुण्या अंकात ड्रग्स सम्बंधीत एक लेख वाचनात आला होता नक्की आठवत नाही कधी ते पण त्यात दिले होते की शाळेतील विद्यार्थ्यांना शाळे बाहेर असलेल्या आइस्क्रिमवाल्या कडून आइस्क्रिम मधे ड्रग्स एकत्र करुण अशा आमली पदार्थाची चटक लावली जायची. या मुलांच्या बाबतितही तसच घडलं असण्याची दाट शक्यता आहे. कारण कुठलेही आई-वडिल मुलांना या पदार्थांची सवय नाही लावत, ना शिक्षक लावत पण कुठेतरी कोणी ना कोणी या मुलांना आपल्या जाळ्यात ओढत आहे आणि मुलं ओढली जात आहेत अगदी खोर्‍याने म्हणाल तरी चालेल कारण ते वास्तविक आहे...

मारझोड करुण, अबोला धरुण, येता जाता या गोष्टीवरुन टोमना मारुन मुलांच चुकलय याची सतत जाणीव करुण देणं चुकीच आहे. याचा बाल मनावर परिणाम लवकर होतो. मुलं या हिनवण्या मुळे चिडकी होतात त्यांना एन-जॉय करायचयं आणि पालकांनाही मुलांनी एन-जॉय करावं अस वाटत असतच पण योग्य रितिने त्यांच्या वयात त्यांनी एन-जॉय खरं कस कराव आणि काय करावं हे बहूतेक प्रत्येक पालकाला/ शिक्षकाला माहीत आहे. या वयात मुलांना परिस्थिति लवकर कळते आपल्या घरचीही आणि म्युनसिपालटीच्या शाळेत शिकणार्‍याचीही त्यांना फ़क्त जाणीव करुण देयची आहे. फ़रक समजवायचा आहे. प्रत्येक विषयाच्या शिकवण्या, चांगल्या शाळा यांच्या बाहेरही मुलं आहेत ती कशी आहेत, कशी शिकतात याची फ़क्त "जाणीव" करुण दिली तरी पुरेसे आहे *तुलणा* नव्हे. दुसरी मुलं बघ म्हणुन आपण आपल्या मुलाला / मुलीला कमी लेखतो, बिंधास्त दुसर्‍या मुलांच उदाहरण देऊन मुलांवर तोंड सुख घेऊन घेतो, पण या मुलांच्या मनात या गोष्टी घर करूण राहतात आपण कितिही चांगलं वागलो तरी आई-बाबांना आपलं कौतुकच नाही, मग कशाला उगाच चांगल वागावं इतक्या थरा पर्यंत ही मुल विचार करतात. रागाच्या भरात पालकांना भान राहात नाही आपण काय बोलतोय आणि किती बोलतोय संयमाने घेणे आवश्यक आहे आणि प्रशासनाने याच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे कारण ही मुलं उद्याच भविष्य आहेत. कुठल्या गोष्टीच्या किती आहारी जाणं आणि जाऊ देणं हे पालकांनी ठरवायच.

आजकालची पालक सोशल आहेत त्यामुळे पार्टीला सह कुटुंब सह परिवार उपस्थित राहतात पालक मंडळी मद्यपान करतात हे लहानपणापासून मुलांच्या दृष्टीत आलेले असते त्यामुळे एन-जॉय करायला हे पेय आवश्यक आहे असे त्यांना वाटत असते, बरीच पालक घरीही मद्य सेवन करत असतात पण ते प्रमाणात असते पण नशेचा आधार घेऊन मुलांशी साधलेला संवाद हा चुकीचा असतो त्यामुळे शक्य झाल्यास नशेत मुलांशी काही ण बोललेलं योग्य कारण बराचसा चुकीचा शब्द प्रयोग करून पालक मुलांना कमी लेखात असतात त्यातून मुलांमध्ये बंड करण्याची इच्छा मनात जन्म घेत असते. आयुष्य एन-जॉय करायला मद्यपान आवश्यक नाही आहे. नाही आपण सोशल आहोत याची प्रचीती देयला मद्यपान करावं अत्यावश्यक नाही. आजच्या लहान मुलांसोबतच पालकही समजूतदार आहेत. फक्त थोड सामंजस्याने घेण्याचे आवश्यक आहे.

मुलांना पालकांनी समजून घेण्याची आणि पालकांनी समजवून सांगण्याची गरज आहे त्यांच्या चुकीची शिक्षा म्हणून घरात डांबून ठेवण, शिक्षण बंद करण, बाहेर यायला जायला बंदी करण सध्यातरी आवश्यक असाल तरी कायमस्वरूपी अशा बंधनात अडकवण चुकीच आहे एकतर मुलं एकलकोंडी असतात आणि मनातल ते चुकीच्या मित्र मंडळीत बोलतात आणि मोकळे होतात, पण या मित्रमंडळी कडून यांना योग्य मार्ग दाखवण्यापेक्षा चुकीचाच मार्ग दाखवला जातो यामुळे पालकांनी सतर्क आणि संयमित वागायला हवे. आपल्या मुलांना पालकच योग्य मार्ग दाखऊ शकतात बाकी कोणीही नाही.


© मृदुंग

                 http://kshanatch.blogspot.in
facebook :- https://www.facebook.com/Kshanatla.ek.kshan

No comments:

Post a Comment