♥ नाते...! ♥
♥ क्षण...! ♥
♥ नाते...! ♥
नाते मनाचे असतात की स्वप्नांचे....मनातून मनाशी नकळत गुंतली जातात...
जितका प्रयत्न केला सोडवायचा तितकी अधिकच गुंतली जातात... अस का होत कळत
नाही... आपलं एक स्वप्न म्हणावं की अजून काय समजत नाही...बस त्या आभासी
नात्या भोवती, सावली भोवती आपल्या मनाच वलय वाढत जात...हे ही नसे थोडके
म्हणत एक वर्तुळच बनून जात... रोज त्या वर्तुळात आपली एन्ट्री होते... हाय
कस काय म्हणत अच्छा चल बाय म्हणून एक्झिट ही होते... पण न चुकता हे वर्तुळ
सतत फिरत राहते... शेवटी उरतो आपण एकटेच आपल्या एकांतासोबत जिथे आपले
अश्रूच आपल्याशी प्रामाणिक असतात, आपल्या हृदयातल्या वेदनांना अलगत
गोंजारतात, प्रेमाने जवळ घेणारी मानस तुटलेली असतात त्यांच्या आठवणीच मग
आपल्याला जवळ घेतात... का कशासाठी माहित नाही...बस आपण आपल्या मनाची समजूत
काढत बसतो... खोटीच...स्वप्ने झोप येण्यासाठी पाहत राहतो... अन पुन्हा दिवस
उजाडतो कसा बसा कासवाच्या गतीने पुढे पुढे वेळ नेत राहतो, अन पुन्हा तीच
रात्र वैरण म्हणून दारात उभी राहते अन पुन्हा अश्रूंची तीच साथ तोच आभास
तेच स्वप्न अन त्याच आठवणी... तुटणारी नाती इतकी जुळली की नवे नाती जोडणेही
नकोसे वाटणारी, आनंद होता कधीतरी किंवा असता कधीतरी पण वास्तवात दुखःच
पदरात अन एकांत आयुष्यभरचा... कुणी कितीही सांगितले तरी आता मनही स्वताच
ऐकत नाही ऐकणारही नाही इतक बंडखोर झालेले असते आपल्या स्वताशीच, एकटेपणाची
सवयच झालेली असते इथे सोबत कुणी असलं काय अन नसलं तरी काय चेह-यावर
कोरडेपणाच असतो, हृदयाला वेदना सहन करण्याची सवयच होऊन जाते... थोड्या
थोड्या सुखासाठी अगदी तरसावे, विनवावे, मागावे आणि मरावेही लागते... एकदम
जीव देत येत नाही, थोड थोड आपल रोज मरण कुणाच सुखही असू शकत किंवा मागणेही
सो कॉल्ड देवाकडे... बदलेल सगळ काही आशेवर असतो आपण पण बदल फक्त निसर्गात
होतो आयुष्यात जगण्यात अन वेदनांत नाही, कधीच नाही फक्त सहन करा... कितीही
असह्य झाले बाकी काही नाही पण सहनशीलता वाढत जाते अन आपण बनतो एक दगड जो
साधा विचारलाही जात नाही पुजलाही जात नाही अन रागाच्या भरात भिरकावलाही जात
नाही...
मृदुंग
१८.०२.२०१३
No comments:
Post a Comment