क्षण...!
तुला आठवून चूक केली...!
माहित नाही हल्ली कुणाची साधी आठवण काढणेही गुन्हा केल्यासारखेच का होऊन जाते, एक तर आठवण नाही काढली तिकडूनही समोरचा मारतो आणि काढली तरीही, दोन्ही कडून जर मरणारच असणार आहे तर मग या आठवणी तरी का म्हणून जपायच्या तेच कळत नाही, शेवटी मानसही एक आठवणच आहेत, त्यांच्या सवई, ढेकर देण्यापासून ते शिंकन्या पर्यंत, त्यांच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट कुणाची तरी आठवणच आहे तर मग त्यांना असा का समज होतो की समोरचा व्यक्ती आपल्याला विसरला असेल, बराच काळ झाला आता तो ओळखही नाही दाखवणार, असे गैरसमज का होतात तेही आपल्यांनाच, ज्यांच्या कडून कशाचीही अपेक्षा करत नाही सध्या स्वर्थाचीही नाही, मग आधार तर दूरच, कशी हेकेखोर वागतात ही मानस मला खरच कळत नाही, कधी नव्हे ते आठवण आली आठवण आली म्हणून फोन, मॅसेज ऑनलाईन पिंग केल तर त्या बदल्यात काय मिळत एक स्वस्थ शांत रिप्लाय "माझी आठवण येते हे तू खोट बोलतोस" अरे आठवण आली म्हणून सांगितलं आणि तसाही टाईम पास करायला बर्याच दिवसांनी मुद्दाम कुणाला फोन, मॅसेज ऑनलाईन पिंग करायला मला ती वेड लागलं नाहीये, तरी आज हा मूर्खपणाच झाला माझा अस वाटत, किती सहज बोलून जातात लोकं पण समोरच्याला त्या बोलण्याच कधी विचारच करत नाही, असो झालं गेलं होतंच राहत, माझ्या सोबत तरी आज हे झालं तुमचाही कधी कुणासोबत झालं असेल आणि स्वतालाच दोष दिला असेल सालं उगाचंच फोन, मॅसेज ऑनलाईन पिंग केलं अन चांगल्या दिवसाच खोबरं झालं, मी आता ठरवूनच टाकलंय स्वताहून आता कुणालाच फोन, मॅसेज ऑनलाईन पिंग नाही करायला आपल आपण ऍव्हेलेबल स्टेटस ठेवायचा जेव्हढा वेळ मिळेल तेव्हढा अन् नंतर लपून बसायचं अथवा आपल्याला खरच आलेल्या कामात गुंतून जायचं पण स्वताहून कुणाची आठवण आली कितीही अनावर झालं तरी आठवून घेयच रडून घेयच पण त्या व्यक्तीला चुकूनही तोंडावर सांगायचं नाही आज तुझी खूप आठवण आली... तुझी आठवण काढली हीच माझी चूक झाली...
.
© मृदुंग
२२.०३.२०१३

No comments:
Post a Comment