Powered By Blogger

Sunday, September 13, 2015

आपण..! (सिंगल आफ्टर मॅरेज) :-)


♥ क्षण..! ♥

आपण..! (सिंगल आफ्टर मॅरेज)

आपण, तसा तर तीन अक्षरांचा एक शब्द आहे. तू तुझ्या टोकावर आणि मी माझ्या टोकावर या दोन टोकांना एकत्र आणणारे बेट म्हणजे आपण. आता विभक्त झाल्यावर स्पष्ट भाषेत फारकत झाल्यावर संबंधांना सोप्या शब्दात नात्याला पुन्हा बेटावरच्या आपण या नौकेत वल्ल्हवण्यासारख कारण काय असतं? पटत नाही- सुर जुळत नाही- एखादा स्वर बेसुर लागला झालोत वेगळे! मनात असलेल्या गोष्टी दडवल्या भुतकाळाची कल्पना दिली नाही याची फसगत केल्याचा पुरावा उभा वर्तमान असल्यावर आणि ताणलं म्हणून तुटलचं! अर्धवट अपेक्षेवर उपेक्षा करुन फरफटत असण्यापेक्षा तुटेल एवढं मी ताणतोच..!
हो! कोंडामारा स्वतःसोबत तुझा कशाला म्हणून करावा? अधिकार होते तेव्हा त्रास आणि अधिकार संपुष्टात आणूनही जाच वाटतोच! माझ्याकडून तुला काही नको होतं आणि तुझ्याकडे माझं असं काहीच नव्हतं. ते अजूनही तुझं तुझ्याकडे माझं माझ्याकडे व्यवस्थितच आहे. अगदी बरोबर शिल-आब्रू-इभ्रत अगदी तशीच पवित्र आहे स्पर्श करुन नासवलं आणि उष्ट केलं असा फसवणुकीचा व्यवहार मी केलाच नाही. तू स्वतः जवळ आलीस तरीही! त्या क्षणाला कसबीनं लाथाडलेच आहे. कारण ती फक्त नात्यातल्या व्यवहाराची गुंतवणूक होती. नात्याची गुंफन करणं तुला? नको, मलाच जमले नाही..!
मी अंतर ठेवलं बऱ्याच मैलांची उंची सुद्धा गाठली. जाणारी-येणारी वाटं मोकळी राहू दिली. तुझे तुला भेटणे आवश्यक होते आणि मला माझे! एकमेकांना भेटून सर्रास होणारा व्यवहार अपहार असतो. त्याला टाळून एकत्रित येणं हे 'आपण'मध्ये समाविष्ट उगाच कसं करायचं? का करायचं? तू जोडते जोड म्हणालो, तोडते तोड म्हणालो! पण आपण जपू या नात्याला असं माझं म्हणन सहज विसरुन जायचं..!
बरं केलस! हो, खरंच बरं केलस. आज आठवलं ना तुला ते सगळे? अगदी नातं तुटल्यावरच सर्व कळले. इथेही तुझी अपेक्षा होतीच मी पुन्हा एक संधी द्यावी आणि तुटलेल नातं पुन्हा जुळवून घ्यावं! पण याची खात्री काय? की पुन्हा असे होणारच नाही? नात्यातून एकदा विश्वास उडाल्यावर पुन्हा तो मिळवणं शक्यच नसतं. मग कितीही चांगुलपणा जपला आणि कितीही तोंड गोड केलं तरी नात्यातला कडवटपणा आयुष्यभर जात नाही तो रेंगाळत राहतो अपमानासारखा..!
सन्मान करता येत नाही म्हणून अपमान करायचा नसतो! हे जरी बरोबर वाटत असले तरी व्यक्तिसापेक्ष स्वभावाच्या आणि अनुभवाच्या चौकटीत बसवल्यावर प्रत्येकाला माझंच खरं करायची सवय असते. साध्या सुध्या जखमासुद्धा जीवघेण्या होऊन त्यांना हसत सहन केल्यावर सहजतेने मनात नसतांना 'इगो' हा दुखावला जातोच कारण कोसळल्यावर पुन्हा सावरणे शक्य नसते. ज्या वाटेला पुन्हा चालायचेच नाही त्या वाटेला पुन्हा पावला खाली आणून लाजवायचेही नसते..!
एकदा चढलेल्या चौकटीत मी माझा प्रामाणिक राहू शकतो. पण एकदा सोडलेल्या चौकटीत परत येऊन अपमानाने तुंबलेल्या नजरांना सामोरे जाणे आणि स्वतःमुळे लाजीरवाणे जातवले जाते हे कळने असह्य होते. नातं तोडण्याआधी नातं शाबूत असायला एक नव्हे, शांतपणे कळत-नकळत हजार संध्या दिल्या जाऊ शकतात पण एकाने देत राहायच न दुसऱ्याने स्वैर असायच कण भराचा स्वार्थीपणा जपायचासुद्धा नाही ही कदर रुपी अपेक्षा आपल्या 'आपण' वेगवेगळ्या तू आणि मी मध्ये हास्यास्पद उरली आहे. दोन टोकं एकत्र आणून गाठ बांधता येते. ती बांधलेली गाठ जपण्यासाठी टोकावर यायचे की सोडण्यासाठी टोक गाठायचे हे नात्यात पडणाऱ्या गाठीच्या नकळत ठरवायचे असते. तेव्हा तू मी बरोबर आपण म्हणू शकतो अन्यथा "सिंगल आफ्टर मॅरेज" याची उद्या होणारी मोठी संकल्पना मला नाही वाटत विशेष काही महत्त्व ठेवेल नात्याचे..!
------------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Monday, September 7, 2015

कागदावर शब्द नाचले..! :-)


♥ क्षण..! ♥

कागदावर शब्द नाचले..!

कळ निघावी काळजातून जमावे सर्व आपले
माझ्याही कागदावर अगदी तसेच शब्द नाचले,

भान होते की नव्हते जगाला मला ठावूक नाही
लेखणीच्या टोकावरुन कागदावर शब्द नाचले,

घृणा वाटली स्वतचीच एकदा मलाही अशीच
उघड होते सत्य तरी उपहासाने शब्द साचले,

इच्छा होती फार नव्हती कुणा इतकी माझीच
चुरगाळून आयुष्याला कागदावर शब्द वाचले,

काय सांगावे मी तरी मलाच माझे हाल आता
ओंजळ बंद करुन मरणास माझे शब्द याचले,

झुकणार नाही वाकणार नाही लाजवेल मला
कसला वेगळा आणणार रे तू शब्द जाs चले,

कागदाला स्मरून अखेरीस मी माझे सरण
तुला शब्दाने दिलेल्या वचनाला शब्द टाचले..!
------------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

Saturday, September 5, 2015

नाना पाटेकर इश्टाईल..! ^_^


♥ क्षण..! ♥

नाना पाटेकर इश्टाईल..!

जमलात पुन्हा सगळे या या
तुमच्यासाठीच तमाशा मांडलाय
नाही कंबर नाही हलणार आणि
ढोलकी सुद्धा नाही वाजणार पण
तमाशा होणार एक तुझा तरी
अन्यथा माझा तरी, तमाशाच का?
एक हाच प्रकार आहे जो प्रत्येक
पुरुषाच्या इच्छेने होतो व अगदी
फुरसतीने होतो, ती येईल ठुमकत
आणि डोळे मिचकवत अधाशीपणा
तुझा काय सुटणार आहे? बसशील
वाट बघत, छेड काढत, इज्जत
नसतेच, उपभोग असतो तुला कसं
पक्क ठाऊक झालेलं आहे. नाही का?
बाटली काढशील, प्याला भरशील
सेज सजवायला फुलंही उधळशील
ती नाही म्हणेल, तू पुरुषार्थ गाजवशील
गरम माथ्याने मुस्काटात लावून देशील
ती तुझी तहान भागवेल, मात्र ती...
तहानलेली, अपूर्ण तशीच राहिल...
तुला हवे तसे तिला कुस्कारीत राहाशील
पण ती इच्छे विरुद्ध तुझ्या मिठीत येईल
तू प्याला भरत राहाशिल रिता करशील
पण प्रेमाची तहान, सन्मानाने भागवशील?
हे तुझ्या रक्तात नाही, घराण्यात आणशील?
नासवशील, लुटशील, वापरशील आणि
विकशीलही... एकदा जपून पाहशील?
छे! जमणार नाही! चप्पल पायात शोभते,
मिरवायला ठिक असते पण गळ्यात सोनेच
शोभते. असल्या छपन्न बाजूला काढशील
आणि एकदिवस तुझाच अंश असेच करेल
तेव्हा कुठल्या अधिकाराने थांबवशील?
घराणे पुढे चालवून तुझे हे सुख मिळवशील?
वळण लागायला वेळ लागतो. अनुकरण
करायला अवधिसुद्धा लागत नाही.
आधी विचार स्वतःचा कर स्वार्थी झालास
तरी चालेल पण हिंस्त्र जनावर होऊ नकोस
कारण हिंस्त्र जनावराला मारता येत पण
संयम राखून पशुला आवर घालता येत नाही..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

शिक्षक दिन..! ;-)


♥ क्षण..! ♥

शिक्षक दिन..! ;)

प्रेमाची शाळा
विरहाचा गृहपाठ
अनुभवाचा अभ्यास
आठवणींचे पाढे
आसवांची बाराखडी
स्वप्नांची निरागसता
आयुष्याची षंढ प्रगती
श्वासांचे गणित
अंतरांचे उत्तम भूगोल
उपयोग शून्य विज्ञान
अर्थहीन इतिहास
हास्यास्पद चित्रकला
आळशी कार्यानुभव
दुमडून ठेवलेली सरस्वती
आणि खाली पिली छडी वाला मास्तर
आकर्षणाची सुंदर शिक्षिका
तासाला जमलेले गलेलठ्ठ मठ्ठ विद्यार्थी
आणि मी हातात डायरी झालेली वही घेऊन
एकसाथ सावधान विश्राम व जयहिंद करुन
रिता करुन टाकणारा बाक तसाच ठेवून
दोन बाकाच्या टेबलावर दोन कॉफी
पिणारे तिन हिशेब चूकते करुन मोकळा..!

काय तर विद्यार्थी जोमात मास्तर कोमात..!

घंटा अपशब्द शाळेत अतुरतेने घराची ओढ लावायचा आणि आता
मास्तर काय शिकवेल 'घंटा' असा वापरून नाम निराळा कारभार

तरी ही औपचारिकता शिक्षका ज्ञान वाट तंबाखू चोळून पिचकारी नको मारु सांगणारा
शेवटच्या बाकावरचा हुशार विद्यार्थी..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

Thursday, September 3, 2015

माणूस..! :-)


♥ क्षण..! ♥

माणूस..!

माणसातून माणसाला आणि अध्यात्म्यातून परमेश्वराला वगळले तर अर्थ शून्य उरतो. माणसाची किंमत परमेश्वरा एवढी केली तर तो विनोद ठरतो. माणसाचा अर्थ शोधून पाहायला नजर शेजारी जाते स्वतःच्या मनात डोकावणे सहज जमत नाही. मोफत वस्तू झालेल्या माणसाला वापरणे आणि वापरले जाणे कळते एवढा चांगला उपयोग मनात आला तेव्हा निर्जीव वस्तूचाही होत नाही पण हे व्यक्त करणे म्हणजे माणूस होण्याची थट्टा करण्यासारखेच असते. सरतेशेवटी माणूस होण्याचा अर्थ काय पाहिले तर उपयोगात पडले याचे समाधान की उपयोगात आणले याचा आसुरी आनंद हे व्यक्तिसापेक्ष आहे. थोडक्यात माणूस हा शून्य आहे. त्याला अर्थ श्वास असे पर्यंत आहे आणि त्याचा उपयोग (मनात येईल तसा करता येऊ शकतो) अवलंबून होणारा कारभार व्यवहार अथवा व्यापार..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843

Tuesday, September 1, 2015

किड..! (बुरशी) :|


♥ क्षण..! ♥

किड..! (बुरशी)

मराठी म्हणवतो स्वतःला
अन् अब्रूला हात घालतो
अशी कशी पदरात तुझी
दंड मर्दाची जात घालतो,

तोंडातून लाळेला गाळत
डोळ्यात वासना ठेवतो
सो कॉल्ड सोशल माती
हफाफुन कशाला खातो,

हव्यास कशाचा आहे हा
माज का मराठी सांगतो
जेव्हा स्वतःच्या हातानेच
नागडी तुझी लाज करतो,

छाती फुलवतोस गर्वाने
मनगटातून जोर लावतो
अबला दिसत नाही तोच
कुत्रा होऊन मागे धावतो,

अशी का रे तुझी पाचवी
तू स्वतःनेच पूजत बसतो
जेव्हा मशाल होणारी ती
ठिणगी तू कुस्कारुन देतो,

विक्षिप्त म्हणायचे कसे
सभ्य वर्तन तू बाळगतो
तू लागलेली एक किड
फक्त पोखरतो-पोखरतो
तू लागलेली एक किड
फक्त पोखरतो-पोखरतो..!------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843