♥
♥ क्षण..! ♥
नाना पाटेकर इश्टाईल..!
जमलात पुन्हा सगळे या या
तुमच्यासाठीच तमाशा मांडलाय
नाही कंबर नाही हलणार आणि
ढोलकी सुद्धा नाही वाजणार पण
तमाशा होणार एक तुझा तरी
अन्यथा माझा तरी, तमाशाच का?
एक हाच प्रकार आहे जो प्रत्येक
पुरुषाच्या इच्छेने होतो व अगदी
फुरसतीने होतो, ती येईल ठुमकत
आणि डोळे मिचकवत अधाशीपणा
तुझा काय सुटणार आहे? बसशील
वाट बघत, छेड काढत, इज्जत
नसतेच, उपभोग असतो तुला कसं
पक्क ठाऊक झालेलं आहे. नाही का?
बाटली काढशील, प्याला भरशील
सेज सजवायला फुलंही उधळशील
ती नाही म्हणेल, तू पुरुषार्थ गाजवशील
गरम माथ्याने मुस्काटात लावून देशील
ती तुझी तहान भागवेल, मात्र ती...
तहानलेली, अपूर्ण तशीच राहिल...
तुला हवे तसे तिला कुस्कारीत राहाशील
पण ती इच्छे विरुद्ध तुझ्या मिठीत येईल
तू प्याला भरत राहाशिल रिता करशील
पण प्रेमाची तहान, सन्मानाने भागवशील?
हे तुझ्या रक्तात नाही, घराण्यात आणशील?
नासवशील, लुटशील, वापरशील आणि
विकशीलही... एकदा जपून पाहशील?
छे! जमणार नाही! चप्पल पायात शोभते,
मिरवायला ठिक असते पण गळ्यात सोनेच
शोभते. असल्या छपन्न बाजूला काढशील
आणि एकदिवस तुझाच अंश असेच करेल
तेव्हा कुठल्या अधिकाराने थांबवशील?
घराणे पुढे चालवून तुझे हे सुख मिळवशील?
वळण लागायला वेळ लागतो. अनुकरण
करायला अवधिसुद्धा लागत नाही.
आधी विचार स्वतःचा कर स्वार्थी झालास
तरी चालेल पण हिंस्त्र जनावर होऊ नकोस
कारण हिंस्त्र जनावराला मारता येत पण
संयम राखून पशुला आवर घालता येत नाही..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
7387922843
No comments:
Post a Comment