♥
♥ क्षण..! ♥
क्षण संदर्भचित्र : प्रसाद वाघ यांच्या भिंतीवरुन
चित्रकाराची कलाकारी २०१२ सालची
कलाकार : Yuliya Vladkoska
१)(प्रेस नोट) बातमी : प्रेयसीला गुडबाय कार्यक्रम संपन्न..!
जळगाव, दि.१६- येथील प्रख्यात प्रियकर असलेले आणि प्रेमाचे अभ्यासक "अमुक तमुक" यांच्या विद्यमाने प्रेयसीला गुडबाय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूर्व प्रेमाच्या गुप्त गोष्टी व्यक्त न करण्याच्या अटीवर अनेक प्रेमवीरांनी "प्रेयसीला गुडबाय' कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन उत्स्फूर्त असा सहभाग घेतला. प्रेयसीच्या ओठांवर बोट ठेवत प्रेयसीला शेवटचा निरोप देण्यात आला. 'अमुक तमुक' संस्थेच्या वतीने प्रियकरांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन 'टिंब टिंब'येथे 'तमक्या'वेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष सतराशे साठ ब्रेकअप झालेले श्रीयुत श्रीमान प्रियकर हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी तमाम प्रेमवीरांना प्रेमात पडून अनाहूत बळी जाऊ नये असा संदेश दिला. त्यांच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन अनेक प्रेमवीरांनी आपली आत्मकथा व्यक्त केली असून लवकरच "अमुक तमुक" संस्था त्यावर पुस्तक प्रकाशित करणार आहे. प्रियकरांना हक्काचे व्यासपीठ मिळावे असा हेतू आयोजकांचा होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमके नी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तामक्यांचे विशेष सहकार्य लाभले.
......
२) जाहिरात पंचलाईन..! :
प्रेमात पडल्यावर पुढे काय..
फक्त शेवटचा एक गुडबाय..!
......
३) गुडबाय ग्रिटींग..! :- (कविता)
नकळत भेट झाली अन्
पुन्हा प्रेमात पडणे झाले..
पूर्वी मनमोकळे होते अन्
आज गालात हसणे झाले..
जा आज तू खुशाल निघून
मनापासून हे सांगणे झाले..
स्पर्शून ओठांना एकदाच
प्रेयसीला गुडबाय करणे झाले..!
.......
४) चारोळी
पुन्हा पुन्हा नाही फक्त
आता शेवटचे सांगितले,
हाय-हॅल्लो सारखेच इथे
गुडबायही कॉमन झाले..!
.......
५) मृदुंग इस्ताईल..!
क्षण..! :-
नजरा नजर झाली... प्रेमाची लहर आली... सगळ्यांनीच केले म्हणून प्रेमात हृदये बरबाद झाली... प्रत्येकाची इच्छा होते... प्रेमात शेवटी वेदनाच उरते... सांगत होतो जरा कुठेतरी थांबायला हवे... चक्क शेवटचा गुडबाय करायला हे कसले कारण होते?... सहवासाचा काळ खूप छान गेला... नुकसानीत मात्र उभे आयुष्य गेले... न राहावून एक निर्णय मी घेतला गुडबाय करायचा... तर तुझ्या का एवढे जीवावर आले..?
..........
६) मृदुंग इस्ताईल एका ओळीचे पत्र..! :-
प्रिय प्रेयसी,
माझी दारं तुझ्यासाठी कायमची बंद झाली, गुडबाय नावाची पत्रे निनावी तुला पाठवली..! (बस कुणी पाठवलंय शोधत)
..........
७) मृदुंग इस्ताईल जाहीर पंचनामा..!(सूचना)
माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची भीक मागायला आल्यावर दारा बाहेरुन जोरात बेंबीपासून ओरडावे आवाज हृदयात पोहोचला तर भीक मिळेल अन्यथा समोरची दारं वाजवून पाहावी. प्रेमाची चेष्टा करायची आल्यास जाहीर अपमान केला जाईल. काळजाला भोकं पडतील अशा विषारी शब्दांचा जीवघेणा प्रयोग यशस्वीरीत्या केला जाईल. सर्व नियमांचे काटेकोर पालन झाल्यावर प्रेमात बाय बोलणे झाल्यावर पूर्व कल्पना न देता थेट गुडबाय कोणत्याही क्षणी बोलले जाईल याचा आयुष्यावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जाईल..!
...........
हुश्श! दमलो अर्ध्या तासात काय काय लिहिले काय माहीत ठरवा तुम्हीच कसे जमलंय :-) परिणामांची चिंता मी आजही करत नाही..!
आणि हो गुडबाय बरं..! :-P
....------------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment