♥
♥ क्षण..! ♥
जगण्यात मज्जा आहे..!
मी नसतो तू असतेस
मी असतो तू नसतेस..
धावपळीच्या जीवनात
का जगाला दोष देतेस..
परिस्थितीची दोन बाहुले
एक होकार एक नकार..
त्यात तू तर घर न कहर
मी मात्र फार तर प्रहर..
थोडं थोडं वेचण्यात मज्जा आहे...
तुझ्याशी मन सहज जुळत
माझ्याशी मात्र फक्त काकुळत..
काही ओढीने न बऱ्याच रागाने
बाहुपाशात सारंच विरघळत..
तू आवरते सावरते न सांभाळते
मी थोपवतो लादतो न डावलतो..
तरी तू कसबीने सारं ओवाळते
मी स्वीकारुन झिडकारून देतो..
थोडं थोडं तुटण्यात मज्जा आहे...
कधी आवडत कधी आवडलं
आपण फक्त आपलं म्हणायचं..
गुलाबाची कळी प्राजक्ताचा लळा
गंधाशिवायही सुगंधीत व्हायचं..
अर्थातून काय अर्थात शोधायचं
जमलंच तर शेवटी सांगायचं..
स्वतःला.. असंच!
थोडं थोडं जगण्यात मज्जा आहे..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843