♥
♥ क्षण..! ♥
♥ क्षण..! ♥
ऋतू..
बहरता बहरलेला..!
(कथा भाग-१)
बहरता बहरलेला..!
(कथा भाग-१)
प्रत्येक गोष्टीची सुरुवात पावसापासून होते. तशीच पावसापासून प्रेमाची सुरुवात होते. आपण मात्र उगाच अंतर ठेवतो. हा योग की, योगायोग या संभ्रमात कर्म करत राहतो. कितीतरी पावसाळे सरुन गेले असतील. पावसाचा आणि कुणाचा प्रेमळ योगायोग जुळून आलेला नसेलच. मनात एक असतं. ओठांवर अनेक असतं. पावसासोबत ओघळलेलं तारुण्य नवं असतं, हवं असतं. स्वप्नच असतं हेही एक. वास्तवात उतरत नाही तोवर भाकड कल्पनेत रमले असते. वास्तवाची जाणिव करुन द्यायची म्हटलं की, सगळंच पुन्हा आलबेल करुन जाणारं सत्य असतं.
..चौफेर चोखंदळ जगायचं तरीही असतं.
..आपलं आयुष्य आपण सावरायच असतं.
..दूषणं भले मग कितीही लागोत, हृदयावर आघातांची आभूषण मिरवत जगायचं असतं.
रोज हृदयाची आहुती देणारे वेगळे नसतात. स्वप्नांची चिता पेटवून हात शेकणारे आपलेच असतात. कालांतराने हसण्यावर उडालेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट प्रेमाचीही असते. सांगायची म्हटलं की, दातखिळी बसते. जगायची म्हटलं की, जीवावर येते. सोडून द्यायची म्हणताच, पुन्हा नव्याने गोष्ट रंगू लागते. करायचं काय? उगाच काय? म्हणत एक गोष्ट बनते. तिला फोडणी, खतपाणी आणि आहुतीही नियतीची खेळी टाकत राहते. अशावेळी आपण हतबल होण्याव्यतिरिक्त काहीएक करु शकत नसतो. शिवाय पुढे अख्ख आयुष्य पडलंय म्हणत निव्वळ चालढकल करत राहतो. पश्चातापच्या यज्ञात स्वतःचा बळी देऊन थोर पुण्य कमावलं या अविर्भावात जगत राहतो.
..चुकलं कुणाचं? कधी? कशामुळे? सतत शोध घेत राहतो.
..काही उत्तरे एखादवेळी सापडतातसुद्धा. पण प्रश्न अर्थहीन झालेली असतात.
..कळलं कसं नाही तेव्हा? उत्तरच असतं एक स्वतःला दिलेलं. पण जाब स्वतःचीच बुद्धी मागते.
..गोंधळ अजून किती होणार? झालेला गुंता सोडवता-सोडवता जरा जास्तच गुंतत जातो. आपण!
..पण काही म्हणा, आठवलं ते सगळं की मोरपीस फिरतोच आणि एक सल मनात खोल रुतते.
..वेदनेच्या अथांग सागरात एकटेपणाचे मनोरे हेलकावे खात असतांना; गुन्हेगार दोष स्वतःला देतात. शिक्षा जग ठरवून देत असते.
भोग उपभोगण्याची मनाची संपूर्ण तयारी झाली असतेच की, तेवढ्यात..
..तेवढ्यात, ऋतू बदलण्याचा नियम अचूक पाळून घेतो..
..बाहेर रिपरिप पावसाला सुरुवात होते. धरणीचा दाह एका क्षणात सुगंध होऊन दरवळू लागतो.
..भर पावसात अश्रू लपविण्याची आयती संधी दडवता येत नसते.
..क्षणभराचा मोह सर्वस्व लुबाडून घेतो. पदरात उरते ते स्वतःच्याच ओंजळभर स्वप्नांचे दारिद्र्य.
..स्वतःच अनाकलनीय गूढ वास्तव.
(क्रमशः)..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
(कथेचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)
(क्रमशः)..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
(कथेचे संपूर्ण वृत्तांत काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जीव, जंतू, प्राणी व धर्माशी काही एक संबंध नाही. जर काही संबंध आढळलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा.)
No comments:
Post a Comment