Powered By Blogger

Thursday, April 18, 2019

ओझ..! :-)


आयुष्याचे T&C समजून घेतांना स्वप्ने कधी YZ होतात कळत नाही. मग X गृहीत धरावा तरी कसा? दैनंदिनीच्या चरितार्थासाठी होणारी तडजोड साधी कधीच नसते. त्यावर उभ्या आयुष्याची Q&A लगेच सोडवायची म्हणतात. प्रत्येक गोष्टीला योग्य न्याय मिळत नाही. त्यावर "Always be positive" चं का म्हणून ओझ मिरवायच..?
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#termsandconditions #writer #author #life #struggle #hardwork #coffee #stranger

Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/piyush-khandekar-snfs/quotes/aayussyaace-t-c-smjuun-ghetaannaa-svpne-kdhii-yz-hotaat-klt-o20xa

Wednesday, April 17, 2019

निकाल..!



..मग नशिबाच्या घडामोडींवर आयुष्याच्या सगळ्या घटना आणि पात्र एका पानावर एकत्र येतात.. "everyone is on the same page".. तेव्हा निकाली काही लागतं तर ते स्वतःच अस्तित्व असतं आणि बळीस पडत ते कायम सांभाळून ठेवलेलं स्वप्न..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#page #dreams #writer #author #everyone #lifestory #struggle #coffee

Read my thoughts on @YourQuoteApp #yourquote #quote #stories #qotd #quoteoftheday #wordporn #quotestagram #wordswag #wordsofwisdom #inspirationalquotes #writeaway #thoughts #poetry #instawriters #writersofinstagram #writersofig #writersofindia #igwriters #igwritersclub

Monday, April 8, 2019

क़ैद..! :-)



तुम खुदको संभाल लो
मेरी फिकर कभी मत करना..
मैं एक टूटा हुआ आइना हूं
मुझसे जुस्-त-जु मत करना..
तकलीफ़ होगी तुम्हें बहोत
लेकीन मेरे लिए इतना ज़रूर करना..
अपने होटों में एक लफ्ज़ बनाकर
मुझे कुछ इस कदर तुम क़ैद करना..
फ़िर मेरे आज़ादी का किसी से
कोई ज़िक्र तुम कभी मत करना..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#हिन्दी #writer #author #shayari #poetry #cage #love #coffee

Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/piyush-khandekar-snfs/quotes/tum-khudko-snbhaal-lo-merii-phikr-kbhii-mt-krnaa-main-ek-jus-ondo5

Sunday, April 7, 2019

उन्हाळा..! :-)




♥ क्षण..! ♥

उन्हाळा..!

ऊन जास्त तापू लागले की असं होतं,
घामाची धार लागून मन तहानलेलं होतं..

बर्फाशिवाय मग काहीच लागत नाही,
चहा कॉफीपेक्षा लिंबू सरबत बरं वाटतं..

गरम-गरम वरण भात नकोसा वाटतो,
दहीभात दोन टाईम हल्ली पुरत असतो..

लाहीलाही होऊन देह दुपारी गारवा मागतो,
डोक्यावर तीन पात्याचा पंखा गरगरत राहतो..

उन्हात आल्हाद शोधत फिरणं होत असतं,
नेमकं ज्यूस आइस्क्रीम पार्लर बंद सापडत..

वडापाव भजीचा तेलकटपणा चीटकुन बसतो,
अन् कपाळावरची घामाची थेंब मी टिपून घेतो..

देहाला सावली हवी अन् काळजाला थंडावा,
पण पावलं शोधत राहतात मातीतला ओलावा..

उन्हाळा येतो अन् सावलीलाही जाळत जातो,
बर्फाच्छदित प्रदेशातले टूर महाग करत जातो..

झाडं सुकून जातात अन् पाचोळा गोळा होतो,
करपलेला देह पुन्हा आगीत होरपळत जातो..

सांजेला उनाड वारा बेपत्ता झालेला असतो,
रोजची चिडचिड रात्री दही खिचडीत पचवतो..

हा उन्हाळा आतल्याआत धगधगत राहतो,
रात्री केव्हातरी गारवा हळूच स्पर्शून जातो..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#summer #cold #writer #author #books #stories #juice #hot

Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/piyush-khandekar-snfs/quotes/unhaalaa-mrdung-r-kshanatch-gmail-com-91-73879-22843-olxtb

Thursday, April 4, 2019

आयुष्य फुलत राहतं..! :-)



टेबलाचा खण उघडून आठवणींचा अल्बम चाळत बसण सोईस्कर असते. मनाचा कप्पा उघडून तासंतास बोलण तेवढं सोप्प नसते. तरीही स्वतःशी मारलेल्या काही गप्पा रंगत जातात. आपण भूतकाळाच्या तरल लाटेवर मनमुराद तरंगत राहतो. जेव्हा खडबडून भानावर येतो. तेव्हा मन खट्टू झालेलं असते. डोळे डबडबलेले असतात आणि काळ बराच पुढे लोटला गेलेला असतो. त्या क्षणांना कुरवाळून घ्यायचं, आयुष्य फुलत राहतं..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#writersblock #writer #author #stories #books #coffee #evening #memories

Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/piyush-khandekar-snfs/quotes/tteblaacaa-khnn-ughdduun-aatthvnniincaa-albm-caalt-bsnn-aste-og7no