Powered By Blogger

Thursday, April 4, 2019

आयुष्य फुलत राहतं..! :-)



टेबलाचा खण उघडून आठवणींचा अल्बम चाळत बसण सोईस्कर असते. मनाचा कप्पा उघडून तासंतास बोलण तेवढं सोप्प नसते. तरीही स्वतःशी मारलेल्या काही गप्पा रंगत जातात. आपण भूतकाळाच्या तरल लाटेवर मनमुराद तरंगत राहतो. जेव्हा खडबडून भानावर येतो. तेव्हा मन खट्टू झालेलं असते. डोळे डबडबलेले असतात आणि काळ बराच पुढे लोटला गेलेला असतो. त्या क्षणांना कुरवाळून घ्यायचं, आयुष्य फुलत राहतं..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३

#writersblock #writer #author #stories #books #coffee #evening #memories

Read my thoughts on YourQuote app at https://www.yourquote.in/piyush-khandekar-snfs/quotes/tteblaacaa-khnn-ughdduun-aatthvnniincaa-albm-caalt-bsnn-aste-og7no

No comments:

Post a Comment