♥
माणसाची जन्माची लालसा
जिज्ञासा कायम अगाध ठेवते,
जिज्ञासेची जिद्द सुरू झाली
कि सरणावर रचनेबांध करते..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#writer #क्षण #stories #books #life #coffee #struggle #back
नमस्कार, माझ नाव पियुष प्रकाश खांडेकर. कविता आणि चारोळ्या टोपण नावाने लिहितो. माझ्या काही कविता तुमच्या समोर सादर करतोय. तुमचा अभिप्राय नक्की कळवा !! कविता जास्त करत नाही पण खूप सा-या चारोळ्यांचा आस्वाद नक्की घ्या.. मृदुंग / क्षण ! संपर्क :- "क्षणातच" पि.ओ.बॉक्स नं. ६७, जळगाव हेड पोस्ट ऑफिस. जळगाव-४२५००१, दूरध्वनी : ७३८७९२२८४३
♥
माणसाची जन्माची लालसा
जिज्ञासा कायम अगाध ठेवते,
जिज्ञासेची जिद्द सुरू झाली
कि सरणावर रचनेबांध करते..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#writer #क्षण #stories #books #life #coffee #struggle #back
♥
प्रसंगानुरूप अनपेक्षित घडून जाते
तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने शून्य होतो,
त्या शून्यातून मग पुढचा मोठा प्रवास
अथवा करूनादायक शेवट होत असतो..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#covid19 #writer #author #books #life #क्षण #struggle #stories
♥
प्रत्येकासोबत घटना घडतात
परिस्थिती प्रत्येकावर बितते,
काही सावरून तटस्थ होतात
काही मात्र सर्वस्वच गमावते..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#writer #author #क्षण #stories #books #life #coffee #struggle
♥
तसा मी मनात कुणाला सहज जागा देत नाही,
त्यामुळे कागदावर ती लोकं लवकर येत नाही;
निरीक्षण चुकतं आणि परीक्षण फसत असतं,
म्हणूनच ती माणसे मनाची पायरी चढत नाही..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#writer #author #books #stories #lifeteachings #student #coffee #struggle
दुय्यम सुज्ञ..!
पूर्वी मराठी लिखाण हे जास्त प्रमाणात भावना प्रधान होते. त्यामुळे त्यावेळेच्या प्रेक्षकांना ती रुचली व आवडली देखील. आताची पिढी व प्रेक्षकांची आवड लक्षात घेतली तर लेखकांना स्वतःच्या लिखाणात बरेच बदल करणे अपेक्षित आहेत. खपते म्हणून तेच तेच चित्रपट बनविणाऱ्या निर्मात्यांनी नवीन लेखकांना संधी आणि नवीन विषयांची मागणी करणे आवश्यक आहे. पण नवीन लेखकांना मिळणारी संधी ही जम बसवून व खुर्ची सांभाळून बसलेल्या ज्येष्ठ लेखकांना रुचत नसते. त्यामुळे लेखन चोरी, गोष्ट बदलणे किंवा वेगळ्या शब्दात तीच गोष्ट जुने हातखंडे वापरून बनवणे असे प्रकार निर्माते जुन्या अनुभवी लेखकांच्या साहाय्याने करतात. प्रेक्षक मूर्ख नसतो. तेवढा तो सुज्ञ निश्चित असतो. त्यामुळे चोखंदळ प्रेक्षकांना त्यांच्या अनुरूप चित्रपट मिळाली की त्यावर न्याय निश्चित प्रेक्षकांकडून मिळतो व दादही मिळते.
वरदहस्त, लौकिक व लोकप्रिय नायक नायिका यांच्यावर चित्रित चित्रपट यशस्वी होतातच असे नसते. चित्रपटाच्या कथा, पटकथा आणि संवाद यांच्या परिपूर्ण बांधणीवर चित्रपटाचे यश अवलंबून असते. परंतु उत्तम लेखन करणारे योग्य संधीपासून वंचित राहतात व त्यांना कायम दुय्यम स्थान पत्कारल्यावरच काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रेक्षकांना चांगले चित्रपट मिळणे दुरापास्त झालेले आहेत. कारण निर्माते, ज्येष्ठ लेखक हे त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन न करता थेट हस्तक्षेप करू लागलेले आहेत या प्रकारांमुळे चांगले लेखक या क्षेत्रापासून दूरच राहणे पसंत करतात. मग सुज्ञ प्रेक्षक मराठी चित्रपटांवर पाठ फिरवन्यापलीकडे काही करू शकत नाही.
- पियुष खांडेकर (✍मृदुंग®)
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
♥
♥ क्षण..! ♥
डोळा..!
पहिल्या प्रेमाचं ते वय सोळा आहे
अन् आज ती सुवर्ण नक्षी तोळा आहे,
हटवली होती उगा सारी गर्दी त्यांनी
माझं वैभव बघण्यास गाव गोळा आहे,
फक्त एक कागदच होता माझा समोर
कितीदा शब्दांचा केला चोळामोळा आहे
ओठांनी हसत राहिलो मी आजसुद्धा
केरातून उचलला कवितांचा बोळा आहे,
शब्दांचे बैल म्हणोत मला हरकत नाही
माझ्या कागदाचा धनी मनवतो पोळा आहे,
कशाला माझी नजर असावी कुणावर
जेव्हा माझ्यावरच प्रत्येकाचा डोळा आहे..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+९१ ७३८७९ २२८४३
#writer #eyes #author #creativewriting #coffee #life #struggle #success
..मग
शुर्पनखा विद्रूप झाली! तिच्यावर नंतर सौभाग्यही शोभल नाही अन् सौंदर्यही..!
- ✍ मृदुंग®
#ramayana #coffee #struggle #relationship #tragedy #writer #author #books