Powered By Blogger

Saturday, October 10, 2020

दुय्यम सुज्ञ..! :-)

 दुय्यम सुज्ञ..!


पूर्वी मराठी लिखाण हे जास्त प्रमाणात भावना प्रधान होते. त्यामुळे त्यावेळेच्या प्रेक्षकांना ती रुचली व आवडली देखील. आताची पिढी व प्रेक्षकांची आवड लक्षात घेतली तर लेखकांना स्वतःच्या लिखाणात बरेच बदल करणे अपेक्षित आहेत. खपते म्हणून तेच तेच चित्रपट बनविणाऱ्या निर्मात्यांनी नवीन लेखकांना संधी आणि नवीन विषयांची मागणी करणे आवश्यक आहे. पण नवीन लेखकांना मिळणारी संधी ही जम बसवून व खुर्ची सांभाळून बसलेल्या ज्येष्ठ लेखकांना रुचत नसते. त्यामुळे लेखन चोरी, गोष्ट बदलणे किंवा वेगळ्या शब्दात तीच गोष्ट जुने हातखंडे वापरून बनवणे असे प्रकार निर्माते जुन्या अनुभवी लेखकांच्या साहाय्याने करतात. प्रेक्षक मूर्ख नसतो. तेवढा तो सुज्ञ निश्चित असतो. त्यामुळे चोखंदळ प्रेक्षकांना त्यांच्या अनुरूप चित्रपट मिळाली की त्यावर न्याय निश्चित प्रेक्षकांकडून मिळतो व दादही मिळते. 


वरदहस्त, लौकिक व लोकप्रिय नायक नायिका यांच्यावर चित्रित चित्रपट यशस्वी होतातच असे नसते. चित्रपटाच्या कथा, पटकथा आणि संवाद यांच्या परिपूर्ण बांधणीवर चित्रपटाचे यश अवलंबून असते. परंतु उत्तम लेखन करणारे योग्य संधीपासून वंचित राहतात व त्यांना कायम दुय्यम स्थान पत्कारल्यावरच काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रेक्षकांना चांगले चित्रपट मिळणे दुरापास्त झालेले आहेत. कारण निर्माते, ज्येष्ठ लेखक हे त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन न करता थेट हस्तक्षेप करू लागलेले आहेत या प्रकारांमुळे चांगले लेखक या क्षेत्रापासून दूरच राहणे पसंत करतात. मग सुज्ञ प्रेक्षक मराठी चित्रपटांवर पाठ फिरवन्यापलीकडे काही करू शकत नाही.

- पियुष खांडेकर (✍मृदुंग®)

kshanatch@gmail.com

+९१ ७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment