सकाळी सहाचा गजर झाला आणि तो झटक्यातच उठला खर म्हणजे त्याला झोप तशी लागलीच नव्हती कारण सकाळच्या ८:३० च्या ट्रेण ने "रश्मी" येणार होती तशी तीने त्याला तार केली होती आणि फ़ोन ही केला होता घेईला ये म्हणाली होती म्हणुन तो रात्रभर झोपलाच नाही सकाळच्या जवळपास कुठे डोळा लागला होता त्याचा आणि गजर झाला........
.
अर्ध्या तासात सर्व आटोपुन त्याने गाडीची चावी घेतली आणि घराला कुलुप लावुन गाडी रस्त्यावर आणली......
गाडी स्टार्ट करुण स्टेशनच्या रस्त्याने सुसाट तो निघाला....
तशी घाई नव्हतीच ट्रेन येयला अजुन दोन तास अवकाश होता.......बाहेर मस्त सोनेरी किरणांची सकाळ सजत होती पण त्याचे संपुर्ण लक्ष गाडी चालवण्यावरच होते........लवकरात लवकर रेल्वे स्टेशनवर पोहचायचे होते त्याला.......अनायसे ट्रेन लवकर आली तर.....
.
पंधरा मिनिटात तो त्याची गाडी स्टेशन पार्किंग मधे लावुन पळत पळतच प्लेट्फ़ोर्म तिकिटासाठी रांगेत लागला....... गर्दी तशी तुरळकच होती अप-डावुनवाल्यांची...... नेहमी गजबजल्या राहना-या स्टेशनवर जास्त गर्दी आज नव्हतीच....... प्लेट्फ़ोर्म तिकिट काढायला त्याला मोजुन ४/५ मिनिटेच लागली असतील तसाच तो निघुन प्लेटफ़ोम कडे जायला निघता निघता इंक्वायरीत थांबला त्याला हवी असनारी ट्रेन वेळेवरच धावत होती........ तसाच वळुन तो प्लेट्फ़ोमच्या दिशेने निघाला आज खुप खुशीत होता.....अनायसेच ओठांमधुन शिळ घलत होता...
.
आवोगे कब तुम ओ बालमा..............प्लेटफ़ोमच्या वेटींग रुम मधे जवुन बसला वेटींग रुम मधेच थांबयला लवले होते रश्मीने त्याला घड्याळाकडे एक नजर वेळ पाहुन घेतली त्याने.....७ वजुन पाच मिनीटेच झाली होती..... अजुन अजुन दिड तास सुद्धा त्याला एका काळा प्रमाने वाटु लागला त्यालाअ.... येतांना सोबत त्याने रश्मीची तार पण घेतली होती पुन्हा एकदा त्याने ती तार काढली वाचायाला...."Hi I am Comming To Jalgaon on 14th june. By Train Kolhapur Gondia Maharashtra Exp. Pick-Up me at 8:30am yours Rashmi".......रश्मीच्या वळनदार अक्षरांवर त्याचे डोळे स्थिरावले...........नकळतच तिच्या जुन्या आठवणी त्याला आठवल्यात रश्मी त्याची बाल मैत्रीन.............
रश्मी अगदी त्याच्या घरासमोरच राहयची तिचे बाबा आणि त्याचे बाबा दोघेपण जिवश्च कंठश्च मित्र आणि त्यांच्या मुलांनी तर मैत्रीत त्यांनाही मागे टाकले दोघांची आवड एकच पसंत एकच शाळा एकच, वर्ग एकच, आणि कॉलेज...कॉलेज मधे पण सगळ एकच.....खुप अटुत नात होत त्यांच पुढे MBA साठी रश्मीचा नंबर पुण्याच्या कॉलेज मधे लागला आणि त्याचा नागपुरला "शिक्षन क्षेत्राची" जनु नजरच लागली.....MBA ची दोन वर्ष एकमेकांशीवाय काढायला दोघांना कसतरीच वाटत होत......तरी मनाचा हिय्या करुण गेली दोघ......दोन दिशांना पण पत्र आणि मोबाईलवर बोलन चालुच होत...एकमेकांच्या टच मधे होती दोघ.... त्याची MBA च्या शेवटच्या वर्षाची परिक्षा रश्मीच्या परिक्षेच्या १५ दिवस आधीच संपली होती म्हणुन मी लगेच जळगावला येयुन रश्मीच्या येण्याची वाट बघत होतो आणि आज तो दिवस उजाडला होता या दोन वर्षात मला कळुन चुकले होते की मी रश्मीवर प्रेम करायला लागलाय तिच्या शिवाय मी राहुच शकत नाही...पण रश्मीला...हे वाटल नसेल का??????? तिला सुद्धा माझ्या सोबत रहाव वाटत नसेल का?? कि उगाचच मी गैरसमज करुण घेतोय कस सांगु रश्मीला?? याच विचारात पडलोय तिच्या येण्याचीच वाट बघत होतो आज ति येनार आल्या आल्या सांगन बर नाही पाहु एक दोन दिवसांनी..... एकांतात भेट होईलच ती म्हणालीच होती खुप काही सांगयचय तुला...खुप विचारुन देखील नाही सांगीतले तिने मी आल्यावर सांगील म्हणाली......काय सांगयच असेल रश्मीला या विचारातच तो हरवुन गेला होता........
प्लेट्फ़ोम वर सामानाची ब्याग सावरतच रश्मी ट्रेन मधुन उतरली आणि सरळ वेटींग रुम कडे चालु लागली आजुबाजुला पहायचा प्रश्नच नव्हता कारण तिची वाट पाहणारा वेटिंग रुम मधेच असेल याची तिला खात्री होती नक्किच "अमर" जुन्या आठवणीत गुंतला असेल नाही तर ट्रेन आली आणि हा अजुन बाहेर नाही आला यावरुनच तिला समजल होत.....तिच तिला तरी कुठे कळल होत पुण्यापासुन ते जळगाव पर्यंतचा प्रवास कसा झाला ते सहप्रवासी एक होती सहज ट्रेन मधे ओळख झाली होती कुठ जानार वगेरे बोलन झाल होत तिच्या सोबत म्हणुन सांगितल होत जळगावला जातेय तिने हाक नसती दिली तर विचारतुन आपण काही बाहेर आलोच नसतो तिच अभीवादन/ धन्यवाद करुण ट्रेन मधुन उतरत होती ती........
.
.
.
वेटिंग रुमच्या दरवाज्यातुनच तिला अमर दिसला अगदी तसाच आहे बस थोडा तब्बेतीने बारीक झालाय तसाच तरतरीच चेहरा, शांत नजर.....कुनालाही सहज आकर्षीत होईल अगदी तसाच....विचारांतच रश्मी त्याला पहातच रहीली होती किती घाई-घाईने आला आहे हा केसांचा भांग ही नाही पाडला याने रात्र भर झोपला देखील नाही डोळ्यांवर झोपे अभावी सूज दिसत होती तिला.....वेटिंग रुम मधे येना-या एका प्रवाशाचा धक्का लागुन रश्मी विचारांतुन बाहेर आली आणि स्वताशीच खुदकन हसली आणि अमर जवळ गेली.....
म्हणाली एक्सक्युज मी! मिस्टर अमर कोणत्या विचारात अहात तुम्ही??? आम्हाला ओळखल का???
कि विसरले??? कुठल्या विचारांत आहात आपण???
तिच्या या अचनक प्रश्नांमुळे अमर भानावर तर आला पण त्याला खरच कळले देखील नाही केव्हा रश्मी त्याच्या समोर येवून उभी राहिली....तिच तेच बालीश हसन,मोकळे केस, टपोरे डोळे,तजेल चेहरा तिला जेव्हाही पहायचा फ़्रेशच वाटायची ती........तिच्या प्रश्नांना उत्तर देण्या एवजी त्याने नुस्त स्मित केल आणि त्याचेच प्रश्न विचारले कशी आहेस???? कसा झाला प्रवास??? काहीच बदल नाही तुझ्यात अगदी आहेस तशीच आहेस पकावू......त्यावर तिने डोळे मिचकवले.........दोघांच हे नेहमीचच असंख्य प्रश्न विचारतील एकमेकांना पण उत्तर कोणीच देत नाही.......त्याने तिला पाहील गालातच हसला तुझी ओळख पटली असेल तर घरी जवुयात काय????....मनोमन तो सुखावला होता रश्मी आहे तशीच आहे काहीच बदल झाला नाही तिच्यात.....त्याने तिची ब्याग उचलली आणि स्टेशनच्या बाहेर....चालु लागला बरोबर रश्मीही चालु लागली......सोबत तिच विचारने चालुच होते घरी कळवले नाहीस ना मी येतेय म्हणुन मला सरप्राइझ देयच होत सगळ्यांना पण तुलाच का म्हणुन सांगीतल माहीत नाही.....तुलाही देयच होत मला पण........पण (अमर बोलला मधेच) पण काय आहे ना तुझ्या सामानाच ओझ वाहनार कोणी तरी हवाच होता ना.......किती जड आहे ती ब्याग काय आणलय काय इतक????..... मी ना खुपशी शॉपिंग केलीये (वाटलच चांगलीच केलेली आहे की अमर मनातच बोलला)
अच्छा !! अरे वा......बोलता बोलता दोघ गाडी जवळ आलेत....बर आता सांग कुठे चलायच डायरेक्ट घरी सोडु का कुठे कॉफी घेयची आधी मग घरी जयच????
.
अम्म्म्म !! कॉफी घेवुनच जवुयाना.....एकदा घरी गेल्यावर मम्मी काय लवकर सोडायची नाही ब-याच दिवसांनी येतेय ना तिच मन भरत नाही तोपर्यंत काही बहेर येता येनार नाही........हो तेही आहेच.....मला तरी कुठ सोडल बाहेर लगेच चांगले चार दिवस घरातच होतो....वैतागला नाहीस का मग....अरे खरच या वेळेस अजीबाद वैताग नाही आला त्याच त्याच प्रश्नांचा.........तुझ मात्र बरय आता तुला वैतागवायला माझे आई बाबा आज संध्याकाळी येतील कालच गावी गेलेत....मला मात्र चौघांनी जाम पिडला......त्याने तीची जड ब्याग डिक्कित ठेवली आणि ती लॉक केली........गाडीच फ़्रंट डोर उघडुन रश्मीला म्हणाला बाईसाहेब आसन ग्रहन करा........!!
.
एखाद्या राजकुमारी सारखीच ती गाडीत बसली......गाडीला वळसा घालुन तो स्वत: ड्रायव्हींगला बसला गाडीत बसल्या पासुन ती दोघ एकमेकांशी बोललीच नाही..........त्याने गाडी मद्रास कॅफे जवळ थांबवली नेहमीचेच ठीकान होते त्यांचे.....कॅफेत गेल्यावर त्याच त्यांच्या नेहमीच्या टेबलावर जावुन बसली दोघ...वेटरला दोन कॉफी ऑर्डर केल्या आणि एकमेकांकडे पाहुन उगाच हसलेत.....बोलायला सुरुवात रश्मीनेच केली.....
रश्मी : अमर ही दोन वर्ष कशी गेलीत एकमेकांशीवाय काही कळलच नाही
.
अमर : हो ना काहीच कळल नाही
.
रश्मी : कसे गेलेत हे दोन वर्ष तुला????
.
अमर : तुला जसे गेलेत तसेच..... {मुद्द्यावर तुच ये}
.
रश्मी : अरे काय रे मला बिलकुल चांगले नाही गेलेत रे प्रत्तेक क्षणाला तुझी आठवन येयची खुप मिस केल तुला
.
अमर : मी पण तुला खुप मिस केल ग...
.
रश्मी : आणि बाकी सांग कस चाललय
.
(अमर काही बोलणार तेव्हड्यात वेटर कॉफी घेवुन आला वेटरने कॉफी टेबलावर ठेवली आणि तो निघुन गेला)
.
दोघही एकंमेकांकडे पहात होते जणु चेह-या वरचे अबोल भाव समजण्याचा प्रयत्नच करत होते....
.
या वेळेस अमर ने बोलायला सुरुवात केली...
.
अमर : रश्मी कुठ हरवलीस??? कॉफी घे ना थंड होतेय...
.
रश्मी : उगाचच हसत हम्म्म्म घेते....!!
.
अमर : रश्मी !! {तिने फ़क्त त्याच्याकडे पाहील} काय झालय काही त्रास आहे का??? एकदम अशी गप्प का बसलीस.....
.
रश्मी : आपण जरा थोड निवांत ठीकाणी जवुयात का आता मला तुझ्याशी काही बोलायच आहे....
.
अमर : अग पण घरी.......
.
रश्मी : प्लिज घरी सांगता येयील दुस-या ट्रेनने आली ते.....त्याच्या संमतीची वाट न पाहताच ती उठली...
.
अमर ने काही न बोलताच न पिलेल्या कॉफीचे बिल पे केल आणि उठला.....
.
काही न बोलताच रश्मी गाडीच्या फ़्रंट सिट वर बसली त्यानेही गाडी चालु केली गाडी एखाद्या निवांत ठीकाणी पोहचे पर्यंत गाडीत नुसती शांतता होती....
.
नकळतच अमर ने गाडी लव्हर्स पोईंटलाच वळवली होती कारण निवांत बोलण्यासाठी तिच एक जागा होती.....नयन रम्य निसर्ग....भर उन्हातही थंड वारा सुटला होता.....बरच उंच ठीकाण होत ते....जळगाव पसुन ४० किलोमिटरवर तसे ते खुप वेळा गेलेले त्या पोईंटला पण आज काहीतरी वेगळच वाटत होत अमर ला....
.
त्याने पुन्हा गाडी पार्क केली संपुर्ण प्रवासात रश्मी काहीच बोलली नाही विचारांत एकदम गुंतूनच गेली होती ती.....गाडीची गती जशी मंदावली तशी ती भानावर आली......... गाडी लॉक करुण ती दोघ डोंगरात लपलेल्या सुंदर तलावाजवळ येवुन बसलीत.....
.
अमर काही विचारणारच होता तेव्हड्यात रश्मीच बोलली......
रश्मी : अमर तसे तर आपन या पोईंट्ला बरेचदा अलोय पण आज काही वेगळच वाटतय ईथे येवुन.......अमर काहीच बोलला नाही माहीत नाही एकदमच अस का वाटल ते पण वाटल.....तुझ्या शिवाय दोन वर्ष कशी काढलीत माझ मला माहीत....खुप वेळा वाटल रे......सगळ सोडुन तुझ्याकडे याव परत पण तु.......तु एकदाही बोलला नाहीस मला निघुन ये......पुण्याला Admission झाली कळल होत तुला.....स्टेशन वर सोडायला देखील आलास......पण रश्मी तु जावु नकोस अस का नाही बोललास रे????? नसती गेली मी......सांग मला का नाही बोललास उत्तर दे... का नाही थांबवलस मला???........नकळतच तिच्या डोळ्यात पाणी आल.......
.
.
!! मनाचा बंध तुटला होता अमरला बिलगुण ती मनसोक्त रडत होती...आणि अमर सुद्धा......!!
.
.
दुर कुठेतरी रेडीओ वाजत होता......
.
.
"दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके......."
अमर : रश्मी !! मी तुला का नाही थांबवल.....कसा थांबवणार होतो मी तुला??? तुझ स्वप्नच नव्हत का हे शिकायला पुण्यालाच जायचे...... आणि मी कोण तुझ्या स्वप्नांच्या मधे येणारा??? तुझ्या आनंदातच तर माझा आनंद होता वेडे.... हो फ़ार दु:ख झाल मला तुझ्या पसुन दुर झाल्याचा पण तितकाच आनंदही झाला तुझ स्वप्न पुर्ण झाल्याचा....
तुला गाडीत बसवुन घरी गेल्यावर माझ्या रुम मधे खुप रडलो मी लगेच तुला फ़ोन करणार होतो...पण....मला तुझ्या स्वप्नांच्या मधे नव्हत येयच.....तसही म्हणतात ना जवळची व्यक्ती जितकी दुर जाते तितकीच अधीक जवळ येते...हे पटलय आता....तुझ्या या प्रश्नांच्या भिडीमारावरुण आणि हे तुझ्या माझ्या ओल्या पापण्यांवरुन.....तुला नाही वाटत का अस???....रोज बोलायचो आपण फ़ोन वर एक-एक तास अगदी....ज्या दिवशी तुझ्याशी बोलन नाही ना झाल तो दिवस अगदी चुकल्या सारखाच वाटायचा...दर पंधरवड्यावर एकमेकांना पत्र सुद्धा लिहायचो....अगदी निबंध च्या निबंध....रश्मी आपण दोघ दुर असुन सुद्ध खुप जवळ होतो....अगदी हाकेच्या अंतरावर नाही म्हणता येणार पण
आपल मन....एकमेकांच्या खुप जवळ होत आणि आहे.....तुला नाही वाटत का अस????
.
.
रश्मी :मला काहीही कळल नाही तु काय बोललास ते समजेल अस बोल नेहमी कोड्यातच का बोलतोस रे तुला माहितीये मला नाही समजत.....सरळ सांग ना....
(रश्मीला सगळ कळुन देखील न कळल्याच दाखवायची सवय आहे हे अमरला चांगलेच ठावुक होते तो काही बोलला नाही........त्याला समजले आता जस्त बोलण्यात काही अर्थ नाही....रश्मी पुर्ववत झालीये ब-याच दिवसांनी तिच्या चेह-यावर निरागस स्मित उमटले होते....अगदी पहील्यासारखे......)
अमर : बाकी सांग कोणी भेटला का नाही पुण्यात गळ्यात पाडायला?????
(अमर ने नकळतच विचारला प्रश्न)
रश्मी : (या प्रश्नावर रश्मी बळेबळेच हसली) म्हणाली हो मग भेटला ना पण पुण्याचा नाही हो मुंबईचा......
अमर : कोण अमिताभ बच्चन का भिकारी????(या वर दोघेही मनसोक्त हसले)
किती निरागस निस्सम होते तिचे ते स्मित अगदी लहान मुली सारखे काही क्षण अमर तर गुंतूनच गेला होता तिच्या त्या हसण्यात नकळतच
तो भान हरपला होता त्याचे...गुंतून बसला होता जुन्या आठवांत तेव्ह्ड्यातच...तेव्ह्ड्यातच रश्मिनेच त्याला विचारला जावू या का आता घरी
बराच वेळ झाला मला भूक पण लागलीय अरे आहेस का लक्ष कुठेय तुझ ??कुठे हरवला होतास??...
अमर : काही नाही बस तुझ्या हसण्यात हरवलो होतो फार छान हसतेस तू....
रश्मी : छे काहीतरीच काय तुझ आता मधेच चाल जाऊ या वापस !! ..... :-))