Powered By Blogger

Sunday, November 20, 2011

!! क्षमा प्रार्थनीय !! {Story}

!! क्षमा प्रार्थनीय !!

आज तुझा मिस कॉल आला ब-याच दिवसांनी आधी वाटल चुकून दिला गेला असेल म्हणून मी इग्नोरच केल म्हंटल उगाचच कशाला कॉल करावा
बोलून बसली तर चुकून दिला गेला एका मैत्रिणीचा नंबर शोधात होते त्यात तुला चुकून लागला म्हणून तू का लगेच कॉल ब्याक केलास ???

काय बोलणार होतो मी या प्रश्नावर अच्छा ठीक आहे आणि फोन कट {आणि मनात त्रागा कशाला केलास लगेच फोन गरज काय होती तुला आणि काय काय जस्ट शिट यार}
पाच मिनिटांनी पुन्हा कॉल चक्क कॉलच केला विचार झाला तसा उचलावा पण.... माझे विचार चालूच होते बहुतेक कॉल ची मर्यादा संपून कॉल कट झाला पुन्हा एक नवा मिस कॉल

का कॉल केला असेल आज चक्क एक वर्षांनी तोच नंबर आणि तीच व्यक्ती अस्तित्वातली पण स्वप्नवत भेटलेली असा म्हणतात मोबाईल चे क्रमांक सतत बदलत असणारे व्यक्ती खूप बदललेले असतात
एकच एक नंबर असलेली व्यक्ती आहे तशीच असते प्रामाणिक, कर्तव्यदक्ष..... प्रेमळ कदाचित !!

का कॉल केला असेल आता अर्धा तास झाला फोन करून विचारू विचारलाच का नाही उचलला माझा कॉल तर सांगता येईल सायलेंट वर होता आणि कादंबरी वाचत होतो लक्ष नव्हत म्हणून
करूयाच फोन बघू या काय म्हणते....
ती : हेल्लो,
मी : हाय ! कशी आहेस ?
ती : {कापराच स्वर आला कानी} मी ठीक आहे आणि तू कसा आहेस
{सांगू का याला आता तुला नकार दिला कितीकी मोठी चूक केली ती अजूनही जिथे प्रपोज केलास
तिथच रोज असते मी...... माझी मलाच दोष देत अन........ तुझ्या शिवाय आयुष्य जगत...........}
मी : माझ सोड तुझा आवाज सांगतोय काही तरी बिनसलंय काय झाल सांग... सगळ ठीक आहे न...??
{पुरुषाला कितीही अनावर झाल तरी भावनांना आवरता येत म्हणून कदाचित माझ्या सारख्या पुरुषांना हृदयच दगडाचे आहे म्हणून हिणवले जात असेल}
ती : नाही काही नाही सहज तुझी आठवण आली म्हणून फोन केला
{अजूनही आहे तसाच आहे आज एक वर्ष नंतर माझा आवाज एकला तरी कळल याला मी ठीक नाही आहे ते मग मी प्रेम करायला लागलीये याच्यावर हे कसे याला अजून कळले नाही}
मी : बर ! मी ठीक आहे कसा चालू आहे तुझा अभ्यास शेवटच वर्ष नाही आता तुझ इंजीनिअरिंगच ??
ती : {बरीच सावरून बोलत होती आता} हो शेवटच आणि मस्त चालू आहे तुझ जॉब कसा चाललाय ??
मी : अरे हो तुला नसेल कळाल मी जॉब सोडलाय आणि जमले होते ते सगळे पैसे आणि बँकेच थोड लोन घेऊन बिझनेस टाकला आहे इव्हेंटसचा
जोरात नाही पण चालू आहे चांगला "दिक्षा इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड"
ती : काय हिक्षा इव्हेंट कंपनी तुझी आहे खूपच नावाजलेली आहे आणि तू का सांगतोस जोरात नाही चालू आहे बिझनेस
मी : {नकळत बोलूनच गेलो} तू नाहीस ना... तू असतीस तर मजाच आली असती....
ती : मी आहे अजूनही तुझ्या सोबत अगदी जिथे सोडून गेला होतास तिथेच कळत नव्हत मला तुला कस सांगू यायचं होत मला तुझ्या सोबत
पण तू .... माझ्यावर अवलंबून राहिला असतास ते मला नको होत तू एकटाच तुझ वेगळा विश्व बनवलेस हेच पाहिजे होत मला आणि आता तू फार मोठा झाला आहेस रे फार मोठा
तुझ्या प्रेमाला झिडकारण्याचे हेच कारण होते माझे होता विश्वास मला तू पेटून उठशील तळमळशील पण मला फक्त मला दाखवण्यासाठी का असे ना पण खूप मोठा बनशील आणि तू बनला आहेस
दुस-यावर अवलंबून असणे तू विसरला आहेस खंबीर बनला आहेस खरच खूप छान वाटत आहे मला.....
मी: मी बनलो तर आहे मोठा पण तुझ्या शिवाय मी काहीच नाही अगदी कशाचीच गरज वाटत नाही फक्त तू आणि तूच हवी असे वाटते

ती : मी अजूनही आहे तशीच आहे आणि तुझीच आहे रे तुझ्या वर अगदी जीव ओतून प्रेम करते रे पण तू अवलंबून होतास दुस-यावर हे मला नको होत खरच नको होत
मला जास्तची कधीच अपेक्षा नव्हती अगदी थोड जरी असल ना तरी पुरेस होत पण शेवटी तू एक पुरुष आहेस तुझ्या नोकरी मध्ये तुला जो पगार मिळायचा एव्हडा पगार मला माझ्या इंजीनिअरिंग च्या अनुभवाच्या काळात मिळणार फक्त आणि तुला आयुष्यभर तुलाच तुझी चीड वाटली असती तुझ्या पेक्षा मी जास्त कमवते हे तुला सहन कधीच झाल नसत म्हणून केले हे सगळे प्लीज मला माफ कर !

मी : नाही तुला माफी देणार नाही मी तुला आयुष्यभर आता फक्त माझीच म्हणून राहावे लागणार आहे उद्याच हो उद्याच मागणी घालायला येतोय मी तयार आहेस ना??
ती : ..............................................................
मनाचा बांध तुटला होता
ती मनसोक्त रडत होती
मनापासून हसत होती
अन स्वप्ने रंगवत होती

समाप्त
अजूनही आपल्या आजूबाजूला असे असंख्य जोडपे आहेत ज्यांच्यात याच करणा वरून वाद विवाद होत असतात ऑफिस मध्ये बॉस सोबत प्रमोशनसाठी हुज्जत घालतात बरेच पुरुष पण कधीच स्त्री चा पगार त्यांच्या पेक्षा जास्त असलेला खपवून घेत नाहीत स्त्री चा मानसिक छळ सोबतच मार झोड पर्यंत ही पोहोचलेले असतात बरेच कौटुंबिक कलहही आणि घटस्फोटाचे कारण सुद्धा हे एकाच आहे करा ना बे धडक मान्य की हो एक स्त्री एका पुरुष पेक्षा जास्त कमवते पुरुषाशी खांद्याला खांदा मिळवत बरोबरीने चालू शकते कमवू शकते एखादी स्त्री एखाद्या पुरुषा पेक्षा जास्त तर यात चुकीचे असे काय आहे लिखाण काल्पनिक आहे आणि विषय सुद्धा जरा नाजूक आहे जेव्हडे सांभाळता आले सांभाळून घेतले आहे तरी काही ठिकाणी चुकलो असल्यास अथवा कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास.....

!! क्षमा प्रार्थनीय !!

मृदुंग

No comments:

Post a Comment