मला स्वप्न एकच पडतय रोज ते अशा प्रकारे :-/
माझा मृत्यू झालाय यमराज रेड्यावर बसून मला घेयला येतो { मला जरा हसूच येत सांड रेड्यावर बसून आल्यासारखं वाटल} आणि वर घेऊन जातो वरती चित्रगुप्ता समोर रांग लागलेली असतेचित्रगुप्त कोटा भरत असतो नरकाचा आणि स्वर्गाचा म्हणजे लोकांचा पाप पुण्याचा शेवटचा हिशोब लाऊन प्रत्तेकाची सोय करत होता
सगळ्यांचे नंबर झाले माझा नंबर आला
चित्रगुप्त : नालायक माणसा आलास ये तुझीच वाट बघत होतो
कुठे ठेऊ तुला मी देवाने प्रत्तेक माणसासाठी १० ग्रंथात १०० वर्षाचा हिशोब लिहायला सांगितले आहेत {५ - पुन्याचे आणि ५ पापाचे}
तुझे १० पण ग्रंथ अगति तुडूंब भरले आहेत एकही ओळ एकही शब्दाचा फरक नाही अगदी समतोल आहे तुझ पण आणि पुण्य बोल कुठे ठेऊ मी तुला
काय इच्छा आहे तुझी स्वर्ग हवा कि नर्क??
मी :- चित्रगुप्ता कुठे राहायचं मला ते नंतर ठरवू आधी माझ्या प्रश्नच उत्तर देता का
चित्रगुप्त :- {छाती फुलवून} अवश्य विचार विचार
मी :- चित्रगुप्त तुला देवाने सगळ्यांचा पाप पुण्याचा हिशोब लिहायला बसवला आहे हाच हिशोब स्वतः देवाला लिहायला काय धाड भरली आहे का ??
कशाला तो देव आहे मग फक्त पार्वतीच्या बाजूला सरस्वतीच्या शेजारी लक्ष्मीच्या सोबत सोबत जोडीने मिरवण्यासाठी का ? तुला तुझी काही काम असतील ना
सुटी हवी असतील ना तुझी पण पोर बाळ असतील ना कशाला तू देवाची चाकरी करतोस? सांग दे माझ्या प्रश्नाचे उत्तर
चित्रगुप्त :- ये ये अरे असा विचार मी अजून केला नाही थांब देवालाच याचा जाब विचरतो धन्यवाद धन्यवाद आज जाब भेटला तर ठीक नाही तर राजीनामाच तोंडावर फेकतो
{ झालं देवाला तातडीने फोन लाऊन बोलावले गेले अख्या स्वर्गात नरकात हंगामा उभा झाला}
शेवटी दैवाने त्याच्या कुटील स्वभावाने आणि दैवी शक्तीच्या बळावर काळ वापस मागे लोटला मझा मृत्यू झाला त्या क्षणा पर्यंत !!
सकाळ झाली नेहमीच्या सवयीने आधी मोबाईलचा इंबोक्स चाळला माझ्या मोबाईल मध्ये मेसेज होता मित्राचा {मला तरी वाटत कि देवानेच माझ्या मित्रा तर्फे त्याचा निरोप सोडला असेल}
तुझ्या सारख्या मनुष्याला कुठेही जागा नाही आहेस त्याच परिस्थितीत आणि अवस्थेत हजारो मृत्यू अनुभवशील हाच तुझा योग्य मृत्यू आहे !!
स्वप्न संपले पुन्हा नव्याने दोन वेळा पहिले आज शब्दात बांधून ठेवले
No comments:
Post a Comment