♥
♥ क्षण..! ♥
22/11/2011 ते 22/11/2014
गेल्या तिन वर्षात बराच काळ लोटलाय...घडामोडीही बर्याच वेगात घडल्या आहेत...परिणाम स्वरुप बदल देखील दृष्टीपथात आहे...तरीही वाटते कुठे तरी आहे तसेच आहे सगळे...जस्से होते तस्सेच आहे...पण येणारा काळ नाविन्य घेवून येणारा असतो म्हणतात...अजुन वेगळं पण सगळं सारखच काही असते ना...अगदी तसेच...हा आज आहे...हाच तो उद्याही आहे...पुढे-पुढे सरणारा...या कालखंडात झालेल्या जखमेपासून असह्य वेदनेचा एक वेगळाच भाग तयार झालाय...कदाचित काही गोष्टी टाळता येणे शक्य नसतात म्हणतात...म्हणून त्यांना स्विकारावे लागते...आणि त्यांच्या सोबतच पुढे चालत राहावे लागते...मागे वळून नजर जातेच हो...पण तोवर आपल्यावर रोखलेली नजर, सावरुन अलिप्त आणि लुप्त झालेली असते...अर्थात यात कुणाचा दोष आहे किंवा नाही माहित नाही...पण निर्दोषही कुणी नाही एव्हढे नक्कीच..."क्षण" या सदराचा हा तिसरा वार्षीक सोहळा...हे सदर सुरु करुन आज कुठवर आलेय? आणि कुठवर पोहोचून उभे राहिलेय? या अहंकारी वृत्तीत नक्कीच गुरफटणार नाही...आपणा सर्वांचे या शब्दांवर प्रेम असेच अबाधीत राहो...मला माहित आहे माझ्या पुढच्या वाटचालीचा काय विचार आहे? हा प्रश्न मी इथे उत्तर देवून सोडवायला हवा...परंतू ठरवून कुठे काही करता येते? काही गोष्टी गुलदस्त्यातून एकदम बाहेर येवून संभ्रमात टाकतात...भ्रम-संभ्रम आजही माझ्या बाबद बरेच आहेत...पण मी ते अजुन तरी दुर नाही करणार...थोडक्यात असे कि, आजवर होते तसेच पुढे चालत राहिल...बाकी अपेक्षा/सुप्त इच्छा माझी काहीच नाही...तुमचे शब्द प्रेम असेच भर-भरुन (फक्त)माझ्या शब्दांवर ठेवा...आपणा सगळ्यांचा व्यक्तिगत-व्यक्तिश: आभारी आहे..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com