♥
♥ क्षण..! ♥
आठवणीतली पाने..!
आज पुन्हा मागची काही पाने उलटली. कुठे कोमेजलेला गुलाब तर कुठे गंधाळलेल्या प्राजक्ताची फुले भेटली. अगदी तस्संच्या तस्सं वाक्यात उमटलेलं. जगणं होतं एका काळाचे ते नजरेसमोर आलेलं. काळोख पिवून उजेडाणे त्याचे अस्तित्व सांगावे तसेच रातराणीचे लुभावणे होते.
गुलमोहराचे वठून जाणे, मोगर्याचे बाधीत असणे. ओंजळीतल्या चाफ्यात मग दोन अशृंचे ताफेही नसणे. प्रत्येक शेवटा नंतर सुरुवात वेगळीच होते कदाचित..! ऋतू नसतांना श्रावण आठवतो. भर दिवसाच्या उजेडात काळोख हवाहवासा वाटतो. गत काळाच्या स्मृती तजेल होवून, परिस्थितीचे मापदंड आलबेल होतात. चौकटीतल्या नियमांचा आधार घ्यावा तर प्रेमाची समिकरणे चुकीची वाटतात.
नजरेच्या कक्षेत येणारा प्रत्येक शब्द कागदाचा गुलाम झालेला दिसतो. आठवणींचे हळवे वादळ दिशाहीन सैरभैर झालेला उरतो. प्रभावी वाटण्याखेरीज उधारीची खेळ गम्मत भासतो. मोबदल्यात मग प्रत्येक नात्याची मांडणी होते. स्वत:साठी काही एक शिल्लक न ठेवता स्वप्नांची वाटणी होते. कुठल्या त्या एका पानावर स्थिर उभे राहून बिथरणे होते..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment