♥
♥ क्षण..! ♥
लिहायला घेवू नये..!
लिखाणाच कसं असतं? स्वत:ला येत असल्यावर इतरांच लिहिणे तुच्छ वाटतं. इतरांनी लिहिलेल्या पानभरातलं एखाद दुसरीच ओळ आवडते. त्यातल्या त्यात स्वत:च लेखक असल्यावर, स्वत:च्या मनाचा न शब्दांच्या रतिबाची घरंदाज ओळख झालेली असते. वाचायची आवड असते पण समोर असलेला किंवा आलेला शब्दांचा ढाचा कंटाळवाना वाटतो. वेगळं शोधण्याचा प्रयत्न केला तर काही एक वाचनेबल नसतेच. सुरुवातीची ओळ वाचताच पुढच्या ओळीचा अंदाज लागतो. वाचायची भुख तर सपाटून लागली असते. पण..! हवे तसे व्यंजन पुढ्यात येत नाही. शोध सुरु असतो इथून तिथून पाने बदलायचा. पण संदर्भ बदललेलेच नसतात तर पान बदलून काय मिळणार आहे? या उपर स्वत:चाच विचार केला तर या व्यतिरिक्त अजुन वेगळं चविष्ट इतर जावू द्या स्वत:च लिहायला बसल्यावर कागद-शब्द-प्रसंग-वेळ सगळेच अवसान गळून बसतात मग कुणाला काही बोलावे किंवा कुणाचे काही ऐकून घ्यावे हा निव्वळ टाईम पास अन् विषयांतर..!
---------------- © मृदुंग
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment