♥ क्षण..! ♥
नाटक : गुलमोहर..! (प्रवेश पहिला)
{ सध्यातरी 'तो' आणि 'ती' म्हणूया. पुढे-पुढे दोघांचा जसं-जस्सा रंग चढेल, रंगतदार पात्रांची त्यांच्याच कडून मांडणी होईल..!}
मध्यम वर्गीय उच्च 'भृ' वस्तितले एक घर. 'तो' आणि 'ती', "नुसता पसारा कसा आवडतो तुला?" बडबडत(पुटपुटत) 'ती' बेडरुमचा दार उघडून दिवान-खाण्यात (हॉल मध्ये) येऊ लागते. 'तो' सुद्धा तिच्या मागे-मागे घुटमळतो. ती बैठकावरची (सोफ्यावरची) उशी व्यवस्थीत करते. तो पुन्हा पसरवतो. इकडे-तिकडे विखुरलेला वर्तमानपत्र एकत्र करुन 'ती' बैठकावर आसनस्थ होते. पसरवलेल्या उशीला पाहून रागाने त्याच्याकडे पाहाते (रोखून).
'तो' उशी निट करुन तिच्या पुढ्यात धप्पकण बसतो. 'ती' बसल्या-बसल्या टि-प्वॉयवर जमलेला सगळा पसारा आवरून स्वस्थ बसते. 'तो' तिला न्याहाळत शांत 'गुणी बाळ' बणून बसला असतो..!
ती : (त्याच्याकडे न पाहाता) चहा घेणार..?
तो : (होकारात) मान वर-खाली करतो.
ती : (त्याच्याकडे न पाहाता किंतू आवाज चढवून) चहा घेणार आहेस का..?
तो : (पुन्हा मुद्दाम, होकारात) मान वर-खाली करतो.
ती : (चिडून वैतागलेल्या अवस्थेत) चहाss..
तो : (सावरून..! मध्येच तिचे वाक्य तोडत) होs! हो! घेईल.
ती : मांडून ठेवलाय मी गॅसवर. जाऊन कपात ओतून आण. तुझ्यासाठीही आणि माझ्यासाठीही. स्वस्थ बसते.
तो : (पाय आपटत ओठातल्या ओठात पुटपुटत जावू लागतो) बायकोशी कुठलाच नवरा जिंकू शकत नाही..!
(फोन वाजतो 'ती' घेते) हॅल्लो..(ऐकते) हॅल्लो मॅ'म टाटा स्काय मधून सुप्रीया बोलतेय. हा क्रमांक कुलकर्णींचाच आहे ना? आपण आमचे जुणे ग्राहक आहात. आपण उपभोगत असलेल्या सेवेत काही अडचन तर नाही ना? या संदर्भात हा कॉल केला गेलाय..? (ती दिर्घ श्वास घेऊन सोडते) नाही काही अडचन नाही. फोन करुन विचारल्या बद्दल धन्यवाद तुमचा दिवस शुभ असो, क्रेडल फोनवर आपटते.
'तो' चहाचे कप घेऊन येतो. तिला अजुन वैतागलेले बघून गालात हसतो. स्वत:चा कप घेऊन तसाच तिच्यासमोर बसतो. कपातल्या चहाचा झुरका घेतो. ( ती तो आवाज ऐकून) हातातला पेपर त्याला फेकून मारते.
ती : शिssss कसलेही घाणेरडे आवाज काढू नकोस.
तो : (हसतो),कुणाचा फोन होता? (विचारतो)
ती : (सांगते) टाटा स्काय वालीचा होता. (चहाचा घोट घेते) सुविधेपासून संतुष्ट आहात का विचारत होती.
तो : होतीssss! 'ति' होती का? श्याsss! पुन्हा चान्स गेला. (चुळबुळतो जागेवर)
ती : हम्म्मम..!
तो : तू मुद्दाम पाठवलेस ना मला चहा गाळायला? तुझ्यामुळेच चान्स गेला. लग्न झाले तेव्हा पासून कोणी विचारले नाही. बायको नावाच्या सुविधेपासून नवरा म्हणून तू संतुष्ट आहेस का? निदान ते टाटा स्काय वाले तरी विचारतात बघ. जळतेस तू, नाही सहन होत नवर्याचे पर'स्त्री बरोबर बोलणे. तुम्ही बायका असताच संशयी, चुगलखोर आणिsss...
ती : (रागाने) उगाच (फोनकडे पाहात) एका बाईसाठी सगळ्या बायकांचा उद्धार करायलाच हवाय का? एकट्या बायकोशी स्पष्टपणे बोलायचे धाडस नाहीच ना! म्हणून सगळ्या नवरोबांच्यावतिने (प्रेक्षकांत अर्थपुर्ण नजर फेरून) हा नवरोबा, एकट्या बायकोला सगळ्या बायकांबद्दल सांगतोय. वाs! शोभत नाही हां..!
तो : (नरमतो, तोंड वाकडे करतो) बायको नवर्याला फार बोलू देत नसते.
ती : (उसळते) नवरा फाजील जास्त बोलतो म्हणून बायको त्याला गप्पच ठेवणे योग्य समजते.
तो : (हतबल! कप ठेवून वर्तमान पत्रात काही तरी शोधू लागतो,) नाही सापडत आहे. कुठे गेल काय माहित? (पेपर आपटून गप्प गुमान तिला बघत बसतो.)
ती : पेपरात पुढची ओळ सापडली नाही वाटत. (त्याच्याकडे बघते)
तो : (दोन्ही हात गालावर ठेवून डोळे वटारून तिला बघत असतो)
ती : (त्याला पाहून) खुप गोड दिसतंय पिल्लू (खळखळून हसते).
तो : पिल्लू..? (प्रश्नचिन्ह) आजवर या नावाने मला कधी संबोधले नाहीस तू. 'बाळ' या नावाच्या पुढची श्रेणी आहे का ही पिल्लू..?
ती : गंभीर होते. सॉरी म्हणते..चहाचे कप उचलून लगबगीने किचन मध्ये पळ काढते.
तो : (पुन्हा पेपर उचलून एक ओळ वाचतो) "भुतकाळाच्या आठवणी तुमच्या नकळत ओठांवर येतात."
ती : फ्रेश होऊन येते. त्याच्या पुढ्यात बसते.
तो : (पेपर बाजुला ठेवतो. तिच्याकडे रोखुन बघत एकदम विचारतो) 'हा पिल्लू म्हणजे तुझा "मंदार" ना.?'
ती : (पदराशी चाळा करत) हो..!
तो : धक्का बसल्यागत शुन्यात हरवतो.
ती : (पदराशी चाळा करत सैरभैर होते.) बोल ना बाळा, काय झाल? अस्स काय करतो? (जवळ जाऊन हातात हात घेते.)
तो : (तिचे हात झिडकारून उठून उभा राहातो. दोन पाऊले समोर येतो. पाठमोरंच तिला विचारतो.) आपलं नातं पवित्र आहे ना? नक्की प्रामाणिक आहेस ना तू या नात्याशी? (खोल आवाजात) माझ्याशी? या घराशी? या घरातल्या छोट्याश्या संसाराशी..?
ती : गप्प..! शुन्यात हरवलेली.
तो : अंधारात..!
(परदा पडतो)
क्रमश:
------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com
+91-7387922843