Powered By Blogger

Sunday, February 1, 2015

रिफिल-रि-फिल-रिफील..! :-)


♥ क्षण..! ♥

रिफिल-रि-फिल-रिफील..!

रिफिल या शब्दाचा अर्थ मला आजवर निटसा कळला नाही. पेनात(लेखणीत) असते ती रिफिल रि-फिल न होता बदलली जाते. त्याच पार्श्वभुमीवर मग एकदा मनात दाटून आलेली आणि मनातून ओसरून गेलेली भावना-संवेदना-वेदना-कणवं-प्रेम मला पुन्हा माझ्यात रि-फील करता आले नाही. अथवा या सगळ्याला अपवाद म्हणून समज-गैरसमजाच्या विलोभनिय जंजाळातून स्वत:ला अलिप्त मला करता आले नाही. दृष्टीकोण बदलायचा भलेही फुकटचा सल्ला किरकोळ 'स्व' भावाने देऊनही बरबाद झाल्या आयुष्याला पुर्ववत किंवा नव्या वळणावर मला स्वत:लाच स्वत:च्या स्वाधीन नव्हे आधीन करता आले नाही.

"ना मी ऋतू होतो, ना लहरी वादळ". एक पर्याय म्हणून स्वत:लाच निवडायची माझी ऐपत नव्हती. जाहिर दर्शवलेली दयनिय अवस्था माझी स्वत:चीच आहे मला स्वत:ला मान्य असुनही माझ्या या दाव्यावर आक्षेप नोंदवलेल्या 'भाकड लोक चर्चेला' थांबवता मला आले नाही. तू-तुझ्यासारखे बरेच असतील या दुनियेत एक तुच नाही. माझ्या असलेल्या दुनियेवरही हुकूमत माझी चालली नाही.

रिफिल - पुन्हा अनुभव सारेच एकदा काय बिघडलेय? का..? कशाला..? स्वार्थाच्या प्रलोभनांची भुरळ झटकून श्वास घेणं जमायला लागल्यावर पुन्हा एकदा त्याच वाटेवर स्वत:चे पाऊल ठेवायला 'लाज' स्वत:चीच वाटत असेल तर असा फाजिलपणा पुन्हा-पुन्हा करावा कशाला..?

झुगारलेय हो! स्पष्टपणे रोख-ठोक मोलभाव न करता म्हणेल त्या किम्मतीवर पुन्हा या आयुष्याचा सौदा करणे मला पटत नाही. गरज आहे म्हणून पुन्हा एक संधी कशाला म्हणून द्यावी? ती सुद्धा दुनियेसाठी? अरे हट! काही एक अर्थ नाहीये या रिफिल- रि-फिल-रिफीलचा..!
----------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment