Powered By Blogger

Saturday, March 28, 2015

हे नवरे असलेच, भलत्या वेळी भलतेच..! :D


♥ क्षण..! ♥

हे नवरे असलेच, भलत्या वेळी भलतेच..!

तो : अगं! ऐ, ऐकलेस का ऐ? अगं ऐक ना! ऐ, ऐकतेस का नाही? ऐ..!
ती : ऐ! ऐ! करून झालं तर पुढचं बोल, खाली पिली टाईम खोटी नको करू. पिल्ल्याला शाळेतून घरी घेऊन यायचे आहे मला. लग्ना आधी असो अथवा लग्नानंतर असो, मुलीला दोन मुलं सांभाळावीच लागतात. एक तिचं स्वत:चे आणि दुसरं तिच्या सासूचे अथवा प्रियकराच्या मातोश्रींचे. एव्हढ सगळ असुनही स्त्रीच्या जातीला 'वांझ' हा कलंक का बरबटून काढत असतो काय माहित.
तो : ऐ! कुठं फिरायला जातेस मध्येच मी काय म्हणालो ऐकलेस का? तुझं हे असंच असतं. आता शट-अप बोलणार आणि फोन कट, त्या फोनाच्या कटल्यावर पार 'कटलेट' सारखी अवस्था होते माझी तुला काय ठाऊक..?
ती : तुला काही चाड? दहा वर्षाचा मुलगा आहे तुला...
तो : तो तुझाही मुलगाच आहे आणि तुच त्याची आई आहेस..!
ती : घरी ये संध्याकाळी मग बघते तुला..!
तो : अरे वा! हिरो बनून येतो अगदी! मग बघत राहा टक लाऊन..!
ती : हिरो बनायच्या नादात तू जोकरच बनून येतोस माहितीये का तुला..?
तो : काय सांगतेस? तरीच म्हंटल या हिरोला पाहून तुझं हसणं का थांबत नाही ते..
ती : दिलं! दिलंच ना शेवटी स्वत:लाच श्रेय..?
तो : काय तरी जळालं वाटतं.
ती : पोळी जळाली तुझ्या नादात.
तो : अरेरे! पोळीच्या होरपळून झालेल्या दु:खद निधना बद्दल मला खेद आहे.
ती : (खळखळून हसते) सुधारणार आहेस कि नाही?
तो : My Dear Wife 'I Never Give-Up From You... I L..'
ती : शट-अप..!
तो : Okey! :-( संध्याकाळी मी बोलणार आणि तू शट-अप बसणार..!
ती : बघू! संध्याकाळचे संध्याकाळी! फोन बंद करते (फोनला बघत बडबडते) 'हे नवरे असलेच, नको त्यावेळेला नको तेच बोलतात'..! :-)
----------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Friday, March 27, 2015

हरवलेली वस्तू आणि माणसे..! :-)


♥ क्षण..! ♥

हरवलेली वस्तू आणि माणसे..!

वस्तू आणि माणसात जीव गुंतला कि असाच प्रत्यय येतो... एव्हढ असुनही पुन्हा जीव लावला जातो... एक आस असते... टिकेल तरी... पण होतं काय जे आपलं नाही त्याला आपलं म्हणायची इच्छा संपत नाही... हे एक वर्तुळ आहे... जो असाच फिरत राहातो..! आठवण बनली एव्हढेच फार उपकार वस्तूचेही आणि माणसाचेही..!
----------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Tuesday, March 24, 2015

मला शाळा आवडते..! :-)


♥ क्षण..! ♥

मला शाळा आवडते..!

शाळा ही विद्यार्जनांची प्राथमिकता असते
इवल्या-इवल्या नजरांची कुतूहलता असते,

आकार दिला जातो लोण्याच्या गोळ्यांना
गृहपाठाची अशीच ती माध्यमिकता असते,

गुरूजनांशी होणारी ओळख इथेच असते
घरानंतर चढलेली ही पहिली पायरी असते,

ओळख करून बाराखडीशी नि पाढ्यांशी
अभ्यासाची खरी सुरूवात झालेली असते,

मला माझी शाळा खूप-खूपच आवडते
मला माझी शाळा खूप-खुपच आवडते..!
------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

Sunday, March 22, 2015

कुणास ठाऊक..? :-)


♥ क्षण..! ♥

कुणास ठाऊक..?

कधी-कधी चंद्र चांदणीजवळ जाऊन बसतो. रोज आभाळसोबत असतांना एकटाच असतो. त्यालाही कळत असावं सहवास म्हणजे काय! थोडावेळ कुणाला देऊन सुख म्हणजे काय! व्यवहार नसेल ना? शुद्ध गरज. थोडावेळ त्याच्यासोबत जावा, थोडावेळ तिच्यासोबत जावा. आभाळातही मग एक क्षितिज किनारा हेरून ठेवावा. दोघं स्वत:च्या सौंदर्यात नभातल्या रात्रीला सजवतात. शृंगाराणे नटलेल्या त्या दृष्यास नजर लागते. हृदयाच्या एका कोप-यात उभ्या मधुचंद्राची सल लागते. स्पर्श होत नाहीत भासच ते मिलनाचे! कलेकलेने दुरावे वाढणारे, विश्वासाचे सुजाण क्षण पुरावे मागणारे बनतात. दोघंच एकमेकांचे एकमेकांना संशयाच्या तराजुत तोलतात. तू कुणा-कुणाचा? तू कुणा-कुणाची? उत्तरे गृहित धरतात. प्रतारणा मग उरतच नाही, सत्य ओठांवर येत नाही. असेच दोघंही एकमेकांपासून दुर होतात. काळोखाला औपचारिक उजळवून सोडतात. चांदण्यांच्या गराड्यात दोघं एकटे उरतात. उभारला संसार मोडत मात्र नाहीत. कर्तव्ये निभावूनही एकमेकांचे ऋण फेडत नाहीत. एकमेकांना व्यवहाराचे हिशेब मागत नाहीत. एकमेकांवर उपकार करुन स्वत:चे देवपण सोडत नाहीत. तरीही मनातल्या मनात एकमेकांसाठी खट्टू होत राहातात. हळवेपणा मुखावर उमटत नाही. झालं-गेलं निसटून जात नाही. दोघांची स्वतंत्र प्रतिभाश्रेणी असुनही अवलंबून असणे चुकवत नाही. एक सुखी कुटूंब म्हणून जगासाठी ओढलेला मुखवटा गळू देत नाही. प्रतिष्ठेचा पदर ढळतांना सावरणे तो निभावतो. सुटतांना त्याचा तोल ती सावरते. श्रेय मग दोघं एकमेकांना देत नाही. कर्माचे फळ फांदीवर येत नाही. रिकामा झुलाच असतो तो. वांझ तिला म्हणता येत नाही. नामर्द त्याला म्हणता येत नाही. कुणास ठाऊक..?
------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Friday, March 20, 2015

गदिमां..! :-)


♥ क्षण..! ♥

गदिमां..!

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ..!

'गदिमां'च्या गीतरामायणातल्या आपल्याला आवडणा-या ओळी इतक्या सहजतेने समोर आल्यावर अथवा नकळत समोर आल्यावर मनाला जी प्रसन्नतेची लहर सुखावून जाते तिला शब्दात वर्णन करुन बंदिस्त करणं ही अशक्यकोटीतली बाब आहे. त्या क्षणी-त्या क्षणाला मन भरुन जगून घेणं एव्हढच त्या नकळतपणावर अजाणतेने केलेले संस्कार म्हणावे..!
------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

तिष्टम्..! :-)


♥ क्षण..! ♥

तिष्टम्..!

आयुष्य कधी कधी आपली अवस्था वाट पाहाणा-या चातकासारखी करून ठेवते. जिथे ओढ तर भरपुर असते पण! कंटाळा या वृत्तीची जाणिव देखील नसते. चातक पावसाची वाट पाहात असतो. त्याच्या येण्यावर प्रेयसीच्या वाटेकडे नजर लावून बसलेला प्रियकर होऊन बसतो. तरसवणारे असतातच विलोभनीय. आपल्याच कक्षेत विश्व नव्हे मनाचे विजेते. राजाने येण्याचा हाक्याकडून पुकारा होताच समस्त दरबाराने अदबीने सन्मान करावा अगदी तस्सेच! आयुष्याच्या रंगमंचावर नाटक सादर होत असते. बघणारे श्रोते असतात. प्रयोग सादर करणारे कलाकार असतात पण! वाs! काय अभिनय सादर केलास अशी दाद देणारी आपली माणसे थोडी अंतर राखुन असतात..का? "स्वार्थम् सर्व क्लेशम्..!"
----------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Thursday, March 19, 2015

सन्यास..! (लघु कथा) :-)


♥ क्षण..! ♥

सन्यास..! (लघु कथा)

मी जगतोय,
असे मी कधीच म्हणत नाही
मी मरतोय,
असे मात्र मी रोजच म्हणतो,
जगणारा मग,
माझ्याकडून अपेक्षा करत नाही
मरणारा मग,
मला स्वत:च्या सोबत नेत नाही
मी रोज असाच,
चौकट आणि चौकटीत जात नाही..!
---------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Monday, March 16, 2015

कॅन्डल लाईट डिनर..! :-)


♥ क्षण..! ♥

कॅन्डल लाईट डिनर..!

प्रत्येकाला वाटत असत, 'प्रेयसी' सोबत जमले नाही ॲटलिस्ट, बायको सोबत तरी खिशाला परवडेबल कक्षे अंतर्गत कॅन्डल लाईट डिनरचा आस्वाद उपभोगता यावा. झगमगाटलेल्या विद्युत रोशनाईत सजलेल्या तारांकीत उपहार गृहात हे काय परवडनार आहे?  त्यापेक्षा घरच्या घरीही हा प्रकार महाविद्युत वितरणाचा पुरवठा ठप्प झाल्यावर अनुभवायला मिळतो. परंतु बाहेर अगदी ठरवून सरप्राईज प्लॅन करुन काही नविन जेवणाच्या चविष्ट पदार्थासोबत सुरेल संगीत मैफलीचा आस्वाद घेत, रोमॅन्स करण्याच्या पर्वणीच्या उपलब्धतेचा 'चान्स' म्हणजे "आज भी तुस्सी बडे रोमॅन्टीक हो"..!
----------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

Tuesday, March 10, 2015

खेल..! :-)


♥ क्षण..! ♥

खेल..!

जैसा तुने सोचा था ए जिन्दगी
इस खेल नें हैं अब नया मोड लिया,
तू खेल रहीं थीं अपनेहीं ढंग से
और मेरे मिजास नें नया मोड लिया..!

ना! ना! इतनी आसानी से नहीं
बडे इत्मिनान से रिश्ता तोड लिया,
चल तू भी क्या याद करेगी मुझे
मैंने हर शख्स से वास्ता तोड लिया..!

अब उमिदों पर कोई सोच ना रख
मैदान-ए-जंग तेरे फरिश्तों ने छोड लिया,
जिनके दम पर इतरा के आयें थेंs
उस शख्सियत को जज्बातों ने छोड लिया..!

भागते वक्त के साथ मैंने दौड लिया
थां किसी का मैंने अपना खेल खेल लिया,
अब अंजाम क्या और रंजीश क्या
ख्वाईशों को मेरी मैंने हर तरहा जी लिया..!
------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com