♥
♥ क्षण..! ♥
जात नाही..!
माणसांमध्ये माणूस विचारला जात नाही
बघ आता मंदिरात दगड पूजला जात नाही,
व्याभिचारसुद्धा करतोय कष्टाशी शेतकरी
साधी! मीठ-भाकरी घशाखाली जात नाही,
नजरा चोरतोय भरल्या पोटाने जो तो इथे
उपाशी निजलेली भूक पाहिली जात नाही,
धर्म विचारला जातो कुळ जोपासले जाते
कधी सहजच 'जात' सांगितली जात नाही,
गृहितके जोडून छत्तीस गुणं तापासली हो
मंगळाची दशा न दिशा बदलली जात नाही,
पैशांचे व्याजच काय हप्तेही दिली जातात
गरिबाला एकवेळ भिक घातली जात नाही,
फुकट शिक्षण चांगलं मिळत होतं मुलांना
पैसे देऊन परिस्थिती शिकवली जात नाही,
सांगतो, लिहितो, बोलतो शेवटचे मी आता
वृत्ती, बुद्धी, नशीबे, स्वप्ने वाटली जात नाही,
फार वाईट वाटतं पाहून एक नजर जगाला
अवस्था आता फारशी पाहिली जात नाही..!
----------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment