Powered By Blogger

Friday, December 4, 2015

मला आठवण येते..! :-)


♥ क्षण..! ♥

मला आठवण येते..!

नदी, खोरे, दऱ्या, कपाऱ्या अगदी गावातल्या पाऱ्याचीही
जिथे बुद्धी खुंटते अशा अडगळीत असलेल्या धुळीच्या थरांचीही,
कित्येक चौकटी उभ्या राहिल्या त्या बंद-उघड्या दारांचीही मला आठवण येते..
प्रसावली जिथे ओठात वेदना अशा जिव्हारी लागलेल्या जखमांचीही,
मंजुळ नाद, हळवा संवाद टीपायची काने अशा पैंजणांचीही,
तृप्त व्हायची नजर, कापरे होयचे स्वर अशा निसटलेल्या क्षणांचीही, मला आठवण येते..
परिस्थितीची एक चाल, आयुष्य बेताल अशा सौख्यभऱ्या दुःखाचीही,
कोसळत्या पावलांची, भिजलेल्या वाटांची अशा
संपलेल्या भेटीचीही,
राख झालेल्या देहाची, परतून आलेल्या पावसाची अन् कोरड्या दिवसाचीही, मला आठवण येते..
लुटवलेल्या प्रेमाची, मोबदले दिलेल्या शरीराची अन् वांझ झालेल्या नशीबाचीही,
चालढकल करणाऱ्या श्वासांची, जाणीवा मेलेल्या प्रेताची अन् ओरखडे पडलेल्या मनाचीही मला आठवण येते..
उभ्याने जळणाऱ्या प्राजक्ताची, वठलेल्या गुलमोहराची अन् उसणं हसणाऱ्या रातराणीचीही,
बहरुन रुसलेल्या बागेची, काठावरच्या एकाकी लाटेची अन् उपरा झालेल्या किणाऱ्याचीही,
तुझ्यापेक्षाही खूप मला आठवण येते..!

सांग आता मी विसरायचं काय आणि कसं???
--------------------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment