Powered By Blogger

Wednesday, November 9, 2016

मृदुंग


♥ क्षण..! ♥

मृदुंग..!

आज हे नाव कमावल्याचं सार्थक छे! खूप वाईट वाटत आहे. 500 & 1000 च्या नोटा दुर्मिळ झाल्यात जमा नसूनही #पुणे येथे कुठलंही अमृततुल्य स्वीकारायला तयार नाही. खिशातील होती नव्हती चिल्लर (सुट्टे नव्हे) संपून गेली. टिश्यू (हा कायम इश्यू पेपर असलेल्या माझ्यासारख्याच्या) पोटातली आग पेपरवर शब्दांनी विझवायच्या पवित्र्यात होतोच. असंच काहीतरी उपाशी पोटातण दोन ओळी खरडल्या.. "पोटातली भूक भागवायला कालपर्यंत नोट सर्रास वापरली, आज अन्नाची ऐपत बघ नोटेलाही ती नाही परवडली - मृदुंग" असं लिहून तो इश्यू गोळा करून टेबलवर ठेवला. अमृततुल्यतली गर्दी कमी करायला बाहेरची वाट धरली. इथे उपाशी पोटोबा, काय नाव घेईल तुझं विठोबा..? स्वतःशीच बडबडत पार्किंग जवळ मरतुकड्या गाडीवर येऊन बसलो. पाच एक मिनिटं गेली असतील. तो इश्यू हातात नाचवत कडक इस्त्रीच्या कपड्यातला एक गृहस्थ माझ्याकडे संभ्रमाणे बघत उभा राहिला. माझ्याकडे बोट दाखवून जरा स्पष्ट आणि पुणेरी कणखर टोनिंगमध्ये बोलला मृदुंगss का? मी वदलो हो मीच नाईलाज आहे. तो गृहस्थ जवळ आला हात धरून अमृततुल्यात ओढत घेऊन गेला. जिथं बसलो होतो तिथंच मला बसवत स्वतःही बसला. इश्यू पेपर पुढं करत म्हणाला "ही अशी कागद सांभाळून ठेवत जा फार दुर्मिळ असतात."😢 त्यांचं वाक्य पुढं मी पूर्ण केलं "दुर्मिळ कागद पुढं विदीर्ण होतात आणि कालांतराने त्यांच्या अवस्थेची कोणी दखल घेत नाही. म्हणून स्वतःच झिजू लागतात." छान! मी म्हटलं होतं ना तुला (त्या गृहस्थांची सौ. त्यांच्या शेजारी येऊन बसल्या.) भयंकर आहे हा! ते गृहस्थ "हो, कळलं आणि पटलंही पुन्हा तुझ्या आवडत्या लेखकांच्या वाटेला नाही जाणार. या पामराला माफ करा." त्यांची सौ. 'पोटोबाचं बघा मग ठरवू!" मी आपला उठलो. उगाच रोमान्स कडवट करायची इच्छा नव्हती (त्यांचाच हं). पुन्हा त्यांनी टोकल अन् थांबवलं(जोडीने) 'जेऊन जा!" मी "उपकार नाही घेत मी पुण्यात तरी नाहीच. आभारी आहे." गृहस्थ काही बोलणार होते, त्यांच्या सौ.च त्यांना अडवत बोलल्या "चेंज तर घेऊ शकतोस? आणि चेंज मिळाल्यावर तुझं बिल तू देऊ पण शकतोस?" माणसाची दुखरी नस पकडून मतलबाची गोष्टी तिऱ्हाईताच्या गळ्याखाली उतरवणारी कायम दुसऱ्याचीच बायको असते. मी "मला चेंज दिल्यावर तुम्हाला काय उरणार?" सौ. वदल्या "हे बँकेत आहेत मिळतील सहज चेंज." मी आपला खात्री करायला "नक्की का?" ते गृहस्थ "हो, नक्कीच. अंतर्गत कामकाज सुरु आहे... पुढं निवांत बसत गप्पा सुरु झाल्या. ओळख झाली अर्थात त्यांनी पटवून दिली. भरीत, पिठलं, शेवभाजी भाकरी, भात फक्कड जेवण झालं." स्वभावानुसार चेंज घेऊन माझं मी बिल दिलं. पुढं ते एकत्र गेलं. जरा वेळ रेंगाळून अर्थात मोदी या विषयावरच्या चर्चेला कंटाळून त्या सौ.नी विषय बदलला. "पुण्यात आहेस तर हा हेकेखोरपणा सोड, नाहीतर उपाशी मरशील?" मी "छे, हा हेकेखोरपणा नाही स्वाभिमान आहे. कुणाचे उपकार का म्हणून मी घ्यावे? सुट्टे नव्हते. पण पैसे नाहीत असं तर काही नव्हतं. तसंही या पुण्यात आणि पुण्यातल्यांना जास्त करुन अहंकार आणि स्वतःच श्रेष्ठत्व पदोपदी सिद्ध करायची सवय आहे. त्यांनी ती जपली तसा मी माझा स्वाभिमान जपला. अंतर एवढंच ते पुणेकर अहंकाराने ताठ आहेत आणि मी स्वाभिमानाने." सौ."किती अवघड बोलतो, लिहितो तर लिहितो बोलतोही." मी "काय करु पुण्यात हे असलंच वागावं लागतं ते बदलत नाही आणि मी सुधारत नाही."
बाकी बरच मग इकडंच- तिकडंच-घरचं बोलून झाल्यावर गृहस्थ म्हणाले "ही सांगत असते बऱ्याचदा, सांगत काय वाचून दाखवत असते तुझं लिखाण. पुन्हा रितसर निमंत्रण देऊन घरी बोलावलं तर ये जेवायला. मी "हा आज झालेला दुर्मिळ योगायोग दीर्घकाळासाठी खूप आहे. घरीपण योगायोगानेच येईल." गृहस्थ "पण घरी हे इश्यू पेपर नाहीत रे." मी "म्हणून हा मी परत कुठं घेतला?" तिघेही हसलो. गृहस्थांनी मी दिलेली नोट परत केली आणि म्हणाले "लिही जरा यावर काहीतरी आता या क्षणाला फ्रेम करून लावेल घरात." "माझी ओळख कागदावरच्या शब्दांनीच झालेली आहे. मला जमत नसलेल्या व्यवहारांचा हिशेब मात्र या कागदावर आहे.. -मृदुंग."

गृस्थांच्या आणि त्यांच्या सौं.च्या आग्रहास्तव नाव नमूद करत नाहीये. त्यांचं नाव नाही म्हणून अमृततूल्याची जाहिरात करण्याची इच्छा नाही! बदलेली करन्सी, वेळ आणि ऋतू लक्षात राहून जातो. किती काळ? माहीत नाही..!
------- ✍ मृदुंग®
०९ नोहेंबर २०१६
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment