Powered By Blogger

Monday, December 26, 2016

स्पंदने.. त्या फुलपाखराची..! :)


♥ क्षण..! ♥

स्पंदने.. त्या फुलपाखराची..!

गॅलरीत बसल्या बसल्या कळलं नाही की काय होतंय आणि काय चाललंय? पण जे काही होत त्या रात्री भयंकर होतं. एक-एक थंड घाव होत असल्याचा भास. शरीराची शुद्ध तर नाहीच. थंड श्वासांचेही मग भान राहिले नाही. सुरु होत काहीतरी आतल्याआत. पण बाहेरच्या बाहेर सगळं गार पडत चाललं होतं. रगात वाहणार रक्तसुद्धा गोठतांना आपला प्रवाह थोपवत होता. पण झालं एकदाच काय व्हायचं ते. सगळं थांबलही आणि सुन्नही पडलं. जाणिवा पण बोथट होत गेल्या. नजेरेसमोरचा अंधार अलंकार होऊन लुप्त झाला. काही कळलं नाही मग पुढे काय झालं. डोळे उघडले तेव्हा बरंच काही तसंच होतं. जरा उजाडलं होतं. दुरुन कोणीतरी धावत येत होतं. त्राण नसलेलं शरीर एखादा बाण होऊन गप्प गार पडलेलं होते. नजर धूसर झाली होती आणि वाचा खुंटली होती. वेदना नव्हती ना संवेदना जाणवत होती. बस! स्पंदने त्या वेंधळ्या फुलपाखराची चुकत गेली आणि मग बंदच पडली..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Wednesday, December 21, 2016

कुचेष्टा..! :)


♥ क्षण..! ♥

कॅचेष्टा..! :)

बोलून झाल्यावर, आपण काय बोललो? याचा फेर विचार करत बसायची मला सवय नाही. त्यामुळे कदाचित, विचार करुन बोलायची सवय लावून घेतली आहे. अर्थात याला काही चौकट आखणे म्हणतात. मी ही म्हणतो. पण ही चौकट ओलांडण्याची इच्छा दुर्मिळ झालेली आहे. अंतर ठेवून वागल्यावर अंतर सहसा कमी होत नसते. ते अंतर वाढत जाते. आपण कोणत्या एका अनोळखी वाटेवर कुठवर चालत जाणार? त्यापेक्षा ओळखीची वाट थोडी फेऱ्याने पडली तरी ती चौकटीत नचुकता पावलांना उभेच करणार असते. मग आड मार्गावर किंवा वाटेत भेटलेले सहप्रवासी हे लुभावणारे स्वप्नदोष असतात. त्यांचं अस्तित्व अस्तित्वात खरोखर असतं. पण आपल्या स्वतःच्या आयुष्यात ती निव्वळ थट्टा आणि मस्करीच्या पुढे कुचेष्टा असते. ..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
7387922843

Tuesday, December 20, 2016

To be or not to be..? :-)


♥ क्षण..! ♥

To be or not to be..? :)

To be or not to be..?
एव्हढाच तर सवाल आहे...
Option ला काही नसून
सगळं equal झालं आहे...
Opportunityचं वादळ
Priorityत बदललं आहे...
Love नावाची अफवाच
Dirty बनलेली आहे...
दिसलेला स्पष्ट Picture
Capture होणं राहिलं आहे...
Happy आयुष्य मागतांना
Face बेक्कार पडलं आहे...
To be or not to be..?
Understanding खोटं
Reacting खरं झालं आहे...
ओळखणं social होऊन
Identity खाजगी आहे...
Tell you गप्प बसायचं
Moove on होऊन जायचं...
Restart करुन परत एकदा
स्वतःला Satisfy करुन घ्यायचं...
Try केलं होतं सगळं मनापासून
Unable झालं सोडून द्यायचं...
To be or not to be..?
जगायचं फक्त जगायचं आहे..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Monday, December 19, 2016

ते दोघं..! :-)

माझ्या वॉलवर भेटलेल्या त्या दोघांना..! ;)

♥ क्षण..! ♥

ते दोघं..! :-)

सहज सूर जुळत नाही
न काही एक कळत नाही...
कशातही मन लागत नाही
आणि सहसा करमत नाही...
बऱ्याचदा कारण लागते
कधी तेही सापडत नाही...
हो-हो नाही-नाही असं नाही
पण थोडक्यात बरंच काही...
कधी धुंदी लागते आणि
बेधुंद तराने सुरेल वाटतात
पण उगाच समजत नाही
आणि मोकळं बोलत नाही..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

#आपण नको
#तुम्हीबोलायलाहवं #एकमेकांशी

Saturday, December 17, 2016

ही प्रीत तुझी मजला कळली नाही..! :)


♥ क्षण..! ♥

ही प्रीत तुझी मजला कळली नाही..!

मी अबोल होतो स्थिर होतो
तुझ्याशी अंतर ठेवून वागतो..
तू एक काही विचारल्यावर
मी बरंच काही नंतर सांगतो...

तू पिच्छा पुरवते मागे लागते
मी षंढ प्याला रिता करतो...
सगळं कळते मला-तुलाही
तरीही मग उगाच उरतो...

सैरभैर होतो अन् कोसळतो
पुन्हा मग मी सगळं आवरतो...
ओठांवरुनच परत परतवतो
मग कितीसा तुला कळतो..?

श्वास अनेक उसासा एकच
दिलासा तेवढा जवळ ठेवतो...
मितभाषा बोलून गोंधळ मांडतो
तरीही उगाच तुला छान वाटतो...

देणं-घेणं नसतं कशाचं नात्यात
नियमित व्यवहार हिशेबी राहतो...
वाचलं काय? उरलेलं काय होतं
रिता प्याला मग पुन्हा भरतो...

दोष घेऊन समारोप होऊन जातो
आरोप तरी जगजाहीर होत असतो...
तुला कळत नाही मी समजवत नाही
ही प्रीत तुझी मजला कळली नाही..!

तरीही...
काहीनाही
काहीही...
कधीही
केव्हाही...
जेव्हाही
तेव्हाही...
आणि
आताही..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com

Saturday, December 10, 2016

क्रिमरोल..! :-)


♥ क्षण..! ♥

क्रिमरोल..! :)

कुणीतरी: माझ्यासाठी एक छानसा रोल लिहून दे! अगदी लोकांना कायम लक्षात राहील असाच.
मी: प्रत्येक रोल चांगला आणि छानच लिहिला गेला असतो. स्वतःतल्या अभिनयाने त्याला न्याय दे. चांगल्या रोलच्या शोधात चाललेली भटकंती बंद होईल..!
कुणीतरी: म्हणजे? तुला म्हणायचं काय आहे? मी चांगला अभिनय करत नाही?
मी: अगदी तसं नाही. पण थोडं फार तसंच. तू एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेस. पण कुठला रोल आपल्याकडून काय मागत आहे. याचा थोडा विचार कर. ग्लॅमरच्या चकाकीत फक्त चमकत ठेवणारे रोल पितांबरी नाहीतर विमबार सोप सारखे रासायनिक असतात. त्यात अंगणात लागलेल्या लिंबाची ओरिजनल सर येत नाही. रुजावे लागते. उन्हाळे-पावसाळे सहन करावे लागतात. सहज मिळणारे खत दुरापास्त झाल्यावर उपासमार पण खरोखर अनुभवावी लागते. तेव्हा ती जिवंत आणि मनापासून उमटते.
कुणीतरी: आजकाल सहज सगळं मिळत असतांना एवढं कशाला करायचं? की तुला द्यायचं नाही?
मी: अभिनयाच्या गुणांची तू घमंड निश्चित कर. पण सहज चार पैसे मोजून विकत घेतलेला रोल चांगला होईलच कशावरुन? मला काय मी सहज देऊन टाकेल लिहून. पण तो रोलही तुझ्याकडून चांगलाच होईल याची खात्री आहे का तुला?
कुणीतरी: हो! निश्चितच. तू लिहिलेला रोल म्हणजे चांगलाच होणार. दे स्क्रिप्ट.
मी: तुला हवा तसा आणि शोभेल असा सध्या माझ्याकडे रोल नाहीये. काहीतरी द्यायला म्हणून पण माझ्याकडे रोल नाहीये.
कुणीतरी: तुला खरंच रोल द्यायचा नाही?
मी: पुणेतल्या मालपाणीचे क्रिमरोल आहे देऊ..?
कुणीतरी: याचे परिणाम खूप वाईट होतील. बघून घेईल तुला. (चरफडत गेली)

दिखावट्या सौंदर्यासाठी मी तडजोड केली नाही आणि शब्दांचा बाजार पण मांडला नाही. स्वतःच्या मिजासात ऐटीत असलेले बरेच उंबरठे पाहिले आणि अनुभवले पण आहेत. त्यांच्यापासून वेगळं होतांना स्वतंत्र आणि जगावेगळं स्वतःत जिवंत असतं. तेव्हा परिणामांची पर्वा ही वेळ करते. तेवढीपण मला आता सवड नाही एंटरटेन करायला..!
#जोहोगादेखलेंगे..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com

Wednesday, December 7, 2016

मनावर..! :-)


♥ क्षण..! ♥

मनावर..!

हल्ली माझं बोलणं त्यापेक्षा जास्त माझं लिहिणं तिच्यासह सगळेच फार मनावर घेतात. मला काय वाटलं? नव्हे तुझ्याकडून काय हवं यात अपेक्षांची मग कोंडी होते. तुम्ही जेवढं मनावर घेता! तेवढं मी कागदावर पण ठेवत नाही. हे माझं सत्य आहे. माझ्या जाणिवा अजून जिवंत आहेत. पण तेवढ्याच उणिवा मी संवादासाठी मांडून ठेवल्या आहेत.
आपल्याला एकमेकांशी बोलायला एवढं एकच माध्यम आता उरलेलं आहे. अर्थात चौकट माझी मला जपायची आहे. तुझी/तुमची तुला/तुम्हाला यात अतिक्रमण कुणालाच करायचे नाही. निव्वळ ओघवते काही लिहून झाल्यावर येणारं सर्व काही अपेक्षित असते. हे ठरवून म्हणता येईल.
सोशल होतांना पब्लिकची काय टेस्ट आहे? हे कळायला यापेक्षा दुसरं माध्यम कागदावर तरी नसतं. सगळं काही ताटात वाढून बघावं लागतं. नेमकं काय आवडत? हे उघड माहीत असूनही नावडतच कागदावर लिहून पुढे वाढलं जात असतं. मुद्दाम कारण ज्याला तुम्ही वाचताय हे त्याचं कर्तव्य आहे की तो तुमची चॉईस आणि लाईक या दोघांच्या चक्रव्यूहापेक्षा सहज नजर गेली न वाचलं गेलं अथवा रिमाईंड झालं. चुकलं आणि ओढून ताणून बुद्धीला ताण दिलाय असं वाटतं ना! त्यापेक्षा जाणवतं. तेव्हा लिहिलेलं काहीही न समजणारेही स्वतःची उपस्थिती कागदावर नजरेतून देतात.
रटाळ अर्थहीन असलं तरी. वाचक असतो. श्रोता जागरूक असतो. रसिक नाराज असतो आणि प्रेयसी रुसली असते. कारण अनपेक्षित मांडलेलं अपेक्षाभंग करत असते. तरीही अपेक्षेवर आणि वेळेवर सर्वस्वी सोपवून चालढकल होत असते. चॉईस आणि लाईकच काहीतरी मिळेल म्हणून. व्हेरिएशन आणि व्हरायटी यातली कॉन्टिटी मार खाते. कारण ते कॉन्स्टंट नसतं. स्टेबल नसतं. ओघवतं असतं. म्हणून काही आवडलं नाही तरी ते आपल्याला आवडलेलं नसतं हे खरंय. तरी भावना आणि मनाचा विचार करून दुखापतीवर सॉरी ही फुंकर निर्थक असते.
मनावर घेतलं सरळ साधं सोपं ते तिथंच फुलस्टॉप लावतं. जे कळत नाही. आवडत नाही. तेच मनावर नजरेसमोर सतत येत. काय असेल? म्हणायचं काय असेल? काहीतरीच काय हे? असं का पण? प्रश्न तयार होतात. उत्तर माहीत असूनही. सहज विसरलं जातं थोडं लक्षात राहायला फार चुकावं लागतं अगदी असं तेव्हा कुठं कागदावरच असं मनावर घेतलं जातं. नाही का..?
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

Monday, December 5, 2016

फ्लॅटमेट 3 :-)

#पुणे

#फ्लॅटमेट 3
ए! उठे! स्ट्रॉ कुठंय? दे पटकन..!
काय भाई? ती काय तिथं ठेवलीये...
हां सापडली..!
हॅहॅहॅ! काय भाई? काय चाललंय? स्ट्रॉ खिशात गुलाबाच्या फुलासारखं खोचून कुठं निघालायेस?
कुलकर्ण्यांकडे..!
परमेश्वरा! ते आणि कशाला?
कॉफी प्यायला बोलवलंय आणि काय हां त्यांना मी माझं लेखकीय नाव 'मृदुंग' हेच का म्हणून ठेवलं? या प्रश्नाचं उत्तर हवंय..!
हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. म्हणजे कुलकर्णी स्वतःच्याच कॉफीने स्वतःच तोंड भाजून घेतात. असे कसे भेटतात रे भाई तुला एकेक नमुने?
आपण कुठं आहोत..?
आपण पुण्यात! हे काय विचारणं झालं?
इथंच चुकलास बघ! आपण पुणेत आहोत आणि इथं फ्री मध्ये सॅम्पल जसा पेटीस व समोस्यासोबत देतात ना अगदी। तसेच पुणेत शोधले की नमुने भेटत राहतात..!
हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. कुलकर्ण्यांना जरा जपून आणि समजून घे भाई!
नको. मी गैरसमज दूर नाही करत कुणाचे तुला चांगल्याने माहीत आहे. झालेले समज आता आणखी वाढवून येतो बाकी नंतर कुलकर्णी गैर झालेत तरी आपलं काय जातंय..? ही स्ट्रॉ त्यासाठीच आहे. कॉफी पिऊन झाल्यावर सप्रेम भेट म्हणून उष्टी स्ट्रॉ द्यायला..!
अगं आई गं! भाई हे लय झ्याक होतं बग! हॅहॅहॅ. हॅहॅहॅ. हॅहॅहॅ.
त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ये ही स्ट्रॉ..! चल जातो बाय..!
#एवढंच
✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com