♥
♥ क्षण..! ♥
ही प्रीत तुझी मजला कळली नाही..!
मी अबोल होतो स्थिर होतो
तुझ्याशी अंतर ठेवून वागतो..
तू एक काही विचारल्यावर
मी बरंच काही नंतर सांगतो...
तू पिच्छा पुरवते मागे लागते
मी षंढ प्याला रिता करतो...
सगळं कळते मला-तुलाही
तरीही मग उगाच उरतो...
सैरभैर होतो अन् कोसळतो
पुन्हा मग मी सगळं आवरतो...
ओठांवरुनच परत परतवतो
मग कितीसा तुला कळतो..?
श्वास अनेक उसासा एकच
दिलासा तेवढा जवळ ठेवतो...
मितभाषा बोलून गोंधळ मांडतो
तरीही उगाच तुला छान वाटतो...
देणं-घेणं नसतं कशाचं नात्यात
नियमित व्यवहार हिशेबी राहतो...
वाचलं काय? उरलेलं काय होतं
रिता प्याला मग पुन्हा भरतो...
दोष घेऊन समारोप होऊन जातो
आरोप तरी जगजाहीर होत असतो...
तुला कळत नाही मी समजवत नाही
ही प्रीत तुझी मजला कळली नाही..!
तरीही...
काहीनाही
काहीही...
कधीही
केव्हाही...
जेव्हाही
तेव्हाही...
आणि
आताही..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment