♥
♥ क्षण..! ♥
क्रिमरोल..! :)
कुणीतरी: माझ्यासाठी एक छानसा रोल लिहून दे! अगदी लोकांना कायम लक्षात राहील असाच.
मी: प्रत्येक रोल चांगला आणि छानच लिहिला गेला असतो. स्वतःतल्या अभिनयाने त्याला न्याय दे. चांगल्या रोलच्या शोधात चाललेली भटकंती बंद होईल..!
कुणीतरी: म्हणजे? तुला म्हणायचं काय आहे? मी चांगला अभिनय करत नाही?
मी: अगदी तसं नाही. पण थोडं फार तसंच. तू एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेस. पण कुठला रोल आपल्याकडून काय मागत आहे. याचा थोडा विचार कर. ग्लॅमरच्या चकाकीत फक्त चमकत ठेवणारे रोल पितांबरी नाहीतर विमबार सोप सारखे रासायनिक असतात. त्यात अंगणात लागलेल्या लिंबाची ओरिजनल सर येत नाही. रुजावे लागते. उन्हाळे-पावसाळे सहन करावे लागतात. सहज मिळणारे खत दुरापास्त झाल्यावर उपासमार पण खरोखर अनुभवावी लागते. तेव्हा ती जिवंत आणि मनापासून उमटते.
कुणीतरी: आजकाल सहज सगळं मिळत असतांना एवढं कशाला करायचं? की तुला द्यायचं नाही?
मी: अभिनयाच्या गुणांची तू घमंड निश्चित कर. पण सहज चार पैसे मोजून विकत घेतलेला रोल चांगला होईलच कशावरुन? मला काय मी सहज देऊन टाकेल लिहून. पण तो रोलही तुझ्याकडून चांगलाच होईल याची खात्री आहे का तुला?
कुणीतरी: हो! निश्चितच. तू लिहिलेला रोल म्हणजे चांगलाच होणार. दे स्क्रिप्ट.
मी: तुला हवा तसा आणि शोभेल असा सध्या माझ्याकडे रोल नाहीये. काहीतरी द्यायला म्हणून पण माझ्याकडे रोल नाहीये.
कुणीतरी: तुला खरंच रोल द्यायचा नाही?
मी: पुणेतल्या मालपाणीचे क्रिमरोल आहे देऊ..?
कुणीतरी: याचे परिणाम खूप वाईट होतील. बघून घेईल तुला. (चरफडत गेली)
दिखावट्या सौंदर्यासाठी मी तडजोड केली नाही आणि शब्दांचा बाजार पण मांडला नाही. स्वतःच्या मिजासात ऐटीत असलेले बरेच उंबरठे पाहिले आणि अनुभवले पण आहेत. त्यांच्यापासून वेगळं होतांना स्वतंत्र आणि जगावेगळं स्वतःत जिवंत असतं. तेव्हा परिणामांची पर्वा ही वेळ करते. तेवढीपण मला आता सवड नाही एंटरटेन करायला..!
#जोहोगादेखलेंगे..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment