Powered By Blogger

Thursday, June 29, 2017

..सगळंच उध्वस्त..! :-)


♥ क्षण..! ♥

..सगळंच उध्वस्त..! :)

प्रत्यक्षात तुझा आणि शब्दांमधल्या तुझा ॲटिट्युड फार वेगळा आहे. हे तुला माहिती होते का?..

हो.. मी आखून ठेवलेल्या या चौकटीची मला पूर्ण कल्पना आहे..!

कसं मेंटेन करतोस?.. प्रत्यक्षातील नाही. पण शब्दातील तुझा ॲटिट्युड लवकर लक्षात येतो!..

'छाप पडली पाहिजे', 'इम्प्रेशन स्ट्रोन्ग पाहिजे' या वाक्यांच्या विरुद्ध वागायचं. हवं तर प्रवाहाविरुद्ध जगायचं. सहज येतं. जमतं. कळत..!

..पण हा ॲटिट्युड हानिकारक आहे असं नाही वाटत का तुला?..

नाही. हा ॲटिट्युड आहे म्हणून दहा वेळा विचार करुन माणसे वाचतात. व्यक्त व्हायचं धाडस करतात..!

उगाच नाही का पण हे?.. कशाला माणसांना दबावात ठेवायचं?.. घाबरतात लोकं तुला. तुझ्यापेक्षा तुझ्या शब्दांना!..

काही कोणी घाबरत बिबरत नाही. मर्यादेची जाणीव होऊन लोकं त्यांच्या चौकटीत गप्प राहतात..!

..एवढा रुबाब आणि बेरकीपणा शोभत नाही पण!..

रुबाब आणि बेरकीपणा माझ्या शब्दांची आभूषणे आहेत. म्हणून वेगळेपणा वखानतात लोकं..!

..तरीपण...

कसय ना लहानपणी मुलांवर संस्कार केले जातात. तेव्हा ती मुलं संस्कारी वाटतात आणि असतातही. माझ्या शब्दांवर मला देखील न जुमानण्याचे संस्कार आहेत. ते काय कुणाच्या '.B.E.E.P.' ऐकतील..?

वळण लावावं मग आपण!..

प्रवाहाला वळण नाही बांध घालावा लागतो. ही शब्द तर वादळे आहेत. थोपवायची म्हटलं तर...

..सगळंच उध्वस्त..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843

Tuesday, June 13, 2017

वा-जा..! :-)



♥ क्षण..! ♥

वा-जा..! :-)

..तुमच्या प्रोफाईल स्टेट्स अथवा पेज स्टेट्स पोस्ट वर.. नेमकं काय चालतंय हे समजण्यातच जास्त वेळ जातो..
- वाचक-जाचक

..माणसाने धडपड कशाला करायची मग एवढी.. जगण्यासाठी होते तेवढी पुरे.. अवांतर.. उगाच का म्हणून..?
- मी

..तुला नाही कळायचं..विचारुपण नकोस..
- वाचक-जाचक

..राहिलं..! :-)
- मी

..ए..
- वा-जा

..काय..?
- मी

..काही नाही..
- वा-जा

..बरं..! :)
- मी

.. Typing... Stop typing... Typing... Stop typing... Typing... Stop typing...
- वा-जा
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
#चुकूनओपनझालेलीचॅटविन्डो

Monday, June 12, 2017

भिजू.. एकदा..? :-)


♥ क्षण..! ♥

भिजू.. एकदा..? :)

सर्दी-पडस होईल म्हणून पावसाला मी वाळीत टाकलं.. तू सांगितलंस म्हणून हां.. अन्यथा ऐकलं मी कोणाच्या.. ओ लेखक भाषा!.. वाक्य म्हणून अर्धवट सोडलंय.. आभाळालाच सासरे म्हणायची चुकी करु नका.. त्याची वीज झेपायची नाही आपणास.. आभाळ भरून यायला लागलं तसं.. अंगणात जाडजूड लोखंडी ठोकळा ठेवायच्या तुम्ही.. का तर वीज घाबरते म्हणून.. की रात्री येणाऱ्या चोराला बदडून काढायला म्हणून.. एकदा काय बऱ्याचदा तर मीच आपटलोय त्या ठोकळ्याला ठेचाळून..
..आणि तुम्ही वर्दी घेता.. पावसापाण्याची पुन्हा ढोसून आलात..? अंधार.. नसलेली वीज.. थेंबांचं टोचणं.. वर वाढलेल्या गवताळ चिखलात रुतलेले पाय.. त्या पायातल्या पायतानाला किलोभर चिखल.. आणि त्यात तुझा आडवा ठोकळा.. आणि.. ढोसली मी.. पुरे.. छत्री असूनही पूर्ण कसे भिजून येता काय समजत नाही का मला?.. विषयांतर नको.. पाऊस आणि ठोकळा भिजण्याचा काय प्रबंध.. संबंध..?
आवरा.. सुका आता.. हा घ्या टॉवेल.. तेल तापलंय मला भजी तळायची आहेत.. तुम्हाला काय.. दुसरीकडे कॉफीचंपण आंधन ठेवून द्या.. आम्हाला एवढंच..! दारातला पाऊस, खिडकीतला पाऊस, छपरावर-बाल्कनीत, धावपळीत आणि शेवटी आठवणीतला पाऊस.. गार झालेली कॉफी.. थंड झालेली भजी.. शांत एकांतात खायला उठणारं रिकामं घर.. माणसांशीवाय..  कितीतरी स्मशानातल्या प्रेतांवर भर पावसात घट्ट चिखलात विरघळत जाणारी माती.. आणि या सगळ्यात गुलमोहराच मोहरणं साठवायचं, पानगळ सावरायची की, वठणं..? मला हे पटत नाही.. पुन्हा भिजू.. एकदा..? परत... ... ... ??
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३