♥
♥ क्षण..! ♥
..सगळंच उध्वस्त..! :)
प्रत्यक्षात तुझा आणि शब्दांमधल्या तुझा ॲटिट्युड फार वेगळा आहे. हे तुला माहिती होते का?..
हो.. मी आखून ठेवलेल्या या चौकटीची मला पूर्ण कल्पना आहे..!
कसं मेंटेन करतोस?.. प्रत्यक्षातील नाही. पण शब्दातील तुझा ॲटिट्युड लवकर लक्षात येतो!..
'छाप पडली पाहिजे', 'इम्प्रेशन स्ट्रोन्ग पाहिजे' या वाक्यांच्या विरुद्ध वागायचं. हवं तर प्रवाहाविरुद्ध जगायचं. सहज येतं. जमतं. कळत..!
..पण हा ॲटिट्युड हानिकारक आहे असं नाही वाटत का तुला?..
नाही. हा ॲटिट्युड आहे म्हणून दहा वेळा विचार करुन माणसे वाचतात. व्यक्त व्हायचं धाडस करतात..!
उगाच नाही का पण हे?.. कशाला माणसांना दबावात ठेवायचं?.. घाबरतात लोकं तुला. तुझ्यापेक्षा तुझ्या शब्दांना!..
काही कोणी घाबरत बिबरत नाही. मर्यादेची जाणीव होऊन लोकं त्यांच्या चौकटीत गप्प राहतात..!
..एवढा रुबाब आणि बेरकीपणा शोभत नाही पण!..
रुबाब आणि बेरकीपणा माझ्या शब्दांची आभूषणे आहेत. म्हणून वेगळेपणा वखानतात लोकं..!
..तरीपण...
कसय ना लहानपणी मुलांवर संस्कार केले जातात. तेव्हा ती मुलं संस्कारी वाटतात आणि असतातही. माझ्या शब्दांवर मला देखील न जुमानण्याचे संस्कार आहेत. ते काय कुणाच्या '.B.E.E.P.' ऐकतील..?
वळण लावावं मग आपण!..
प्रवाहाला वळण नाही बांध घालावा लागतो. ही शब्द तर वादळे आहेत. थोपवायची म्हटलं तर...
..सगळंच उध्वस्त..!
- ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
73879 22843
No comments:
Post a Comment