♥
♥ क्षण..! ♥
भिजू.. एकदा..? :)
सर्दी-पडस होईल म्हणून पावसाला मी वाळीत टाकलं.. तू सांगितलंस म्हणून हां.. अन्यथा ऐकलं मी कोणाच्या.. ओ लेखक भाषा!.. वाक्य म्हणून अर्धवट सोडलंय.. आभाळालाच सासरे म्हणायची चुकी करु नका.. त्याची वीज झेपायची नाही आपणास.. आभाळ भरून यायला लागलं तसं.. अंगणात जाडजूड लोखंडी ठोकळा ठेवायच्या तुम्ही.. का तर वीज घाबरते म्हणून.. की रात्री येणाऱ्या चोराला बदडून काढायला म्हणून.. एकदा काय बऱ्याचदा तर मीच आपटलोय त्या ठोकळ्याला ठेचाळून..
..आणि तुम्ही वर्दी घेता.. पावसापाण्याची पुन्हा ढोसून आलात..? अंधार.. नसलेली वीज.. थेंबांचं टोचणं.. वर वाढलेल्या गवताळ चिखलात रुतलेले पाय.. त्या पायातल्या पायतानाला किलोभर चिखल.. आणि त्यात तुझा आडवा ठोकळा.. आणि.. ढोसली मी.. पुरे.. छत्री असूनही पूर्ण कसे भिजून येता काय समजत नाही का मला?.. विषयांतर नको.. पाऊस आणि ठोकळा भिजण्याचा काय प्रबंध.. संबंध..?
आवरा.. सुका आता.. हा घ्या टॉवेल.. तेल तापलंय मला भजी तळायची आहेत.. तुम्हाला काय.. दुसरीकडे कॉफीचंपण आंधन ठेवून द्या.. आम्हाला एवढंच..! दारातला पाऊस, खिडकीतला पाऊस, छपरावर-बाल्कनीत, धावपळीत आणि शेवटी आठवणीतला पाऊस.. गार झालेली कॉफी.. थंड झालेली भजी.. शांत एकांतात खायला उठणारं रिकामं घर.. माणसांशीवाय.. कितीतरी स्मशानातल्या प्रेतांवर भर पावसात घट्ट चिखलात विरघळत जाणारी माती.. आणि या सगळ्यात गुलमोहराच मोहरणं साठवायचं, पानगळ सावरायची की, वठणं..? मला हे पटत नाही.. पुन्हा भिजू.. एकदा..? परत... ... ... ??
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment