<3
कधी कधी शब्दांपेक्षा सहवासाचा एक क्षणही पुरेसा असतो, मनातलं खूप काही बोलायला----------------------- © मृदुंग
बस तुझ्या माझ्या आठवणींचा सुगंध छळतोय..............!
आठवणीतच पण माझ्या मनात दरवळतोय .................! -----------------------© मृदुंग
तू आहेस तर सगळंच आहे... तू नाहीस तर काहीच नाही...
क्षणभरचे पापण्यातले स्वप्नच... आता जगायला पुरेसे आहे... ------------ © मृदुंग
प्रत्येक इछेची 'विलक्षण' इच्छा असते, सुरुवातीला नव्हे शेवटीच त्याचे लक्षण दिसते.....
.------© मृदुंग
"लक्ष ' ण" कळायला लक्ष वेळा लिहिले, तरी सुद्धा सुरुवातीला लक्ष देऊन नाहीच पहिले..... ------------------------- © मृदुंग
गुणाकारा सोबतच आता, "ण" ला "क्ष" ने भागुनच घ्या म्हणजे झाले 'ण क्ष' ल' ....................... ------------------------- © मृदुंग
{अगदी मनासारखे}
<3
हात जोडले म्हणजे देवाकडे काही तरी मागितलेच असे नसते,
श्रद्धेने, भक्तीने आणि कर्माने जे मिळाले त्यात आनंद सामावले असते ....... © मृदुंग !
No comments:
Post a Comment