क्षण..!
नातं कपबशी सारखे झाले आहे, कपाचा कान तुटल्यावर, कपातल्या वाफाळत्या चाहाचा घोट, जेव्हा चटका मारतो, हेलकावे खात मग चहा बशीच्या ओंजळीत जाते, कपबशी कधी आपलेपणाने कुणा नजर होते चहा सोबत, तर कधी कपातली चहा ऐपतीत नसते म्हणून बशीत दोन घोट प्रेमाने वाटले जातात, कपबशीच नातं असं दोघही जेव्हा वेगळे होतात, चहाची चव न् चटका एकत्र देतात..!
.
© मृदुंग
No comments:
Post a Comment