♥
♥क्षण..! ♥
आयुष्य गुलजार आहे..! (भाग-4)
कुठलेच नाते हे गॅरेंटी आणि वॉरंटी घेऊन येत नसते... एखाद्यासोबत वाईट झालं म्हणून आपल्यासोबत किंवा कुणासोबतही तसे काही होऊ नये अशी इच्छा प्रत्येकाची असते... पण वेळ आणि परिस्थितीच्या बदलांना स्वीकारायचे असते ते जमले कि सगळं काही सोप होतं... उदा आपण पोळ्या खातो त्या तव्यावर शेकूनच ना तिथे तव्याने तापू नये पण पोळी शेकून द्यावी असा हट्ट चालतो का आपला? नाही ना... लग्नही तसेच आहे एक चुकतो तर दुसरा सांभाळतो... कारण दुसरा बरोबर असतो म्हणून तो कायम चूका काढणार का? नाही ना किंवा दोघांनी चुकाच करायचे ठरवले तर आयुष्य बरोबर सुटणार कसं? तिथे नातं तुटणारच...
लग्न कुणाशीही करावं पण विश्वासाला तडा जाऊ देऊ न देता... नसेल बसत सहज विश्वास कुणावर म्हणून लग्नाला नाही म्हणता येतं... पण एक सांगा माणसाला समजून घ्यायची संधी दिली तर आयुष्य छान जाते की नाही?... हाताची पाचही बोटे एकसारखी नसतात आणि प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट ही वेगळीच असते एकसारखी नसते... आता ही गोष्ट लग्न करून लिहायची कि लिहायचीच नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न... पण मी म्हणेल लग्न करून प्रेमाने जगायचं असतं तिथे जबाबदार प्रियकरही नसतो आणि प्रेयसीही नसते...निदान प्रेमाला आपण संधीही दिली नाही असा पच्छताप आयुष्यभर तरी उरणार नसतो...
तारुण्य आहे तर म्हातारपण येणार आहेच... पाण्यासारख स्वीकारता आलं तर काहीच अडचण येणार नाही...जगण्याची संधी मिळते तेव्हा घ्यायची... संधीची वाट बघितली तर वेळ जाते आणि जगणे राहून जाते... प्रेमावर विश्वास नसेल तर अरेंज मॅरेज जरुर करावे पण याची खात्री तिथेही नाही कि तेही नातं टिकेल... टिकेल म्हणून प्रेमाच किंवा लग्नाचे नाते जोडू नये एक नाते आपल्याला आयुष्यभर प्रेमाने जपायचे आहे म्हणून नात्याला जपून बघायचं ते नातं निभावलं आपणच जाईल तेही सहज सूंदर आयुष्याने तेव्हाही कधी माझी आठवण आलीच तर... आयुष्य गुलजार आहे एवढं स्वतःलाच म्हणून बघायचं आणि संगायचंसुद्धा... नुसता विचार करुन हाताशी काहीच लागत नसते... जे हाताशी लागते ते कायम पळण्याच्या तयारीतच असते... आपण कुठे थांबायचं हे आयुष्यभर कळत नाही... जेव्हा कळतं तेव्हा कायम उशीरच झालेला असतो... हा उशिरसुद्धा स्वीकारायचा अन् आयुष्याला पुन्हा नवं आव्हान द्यायचं... तेव्हाच तर आयुष्य खऱ्या अर्थाने गुलजार होणार असतं..!
--------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment