Powered By Blogger

Friday, January 29, 2016

शब्दनाट्य..! :-)


♥ क्षण..! ♥

शब्दनाट्य..!

नाटकाला गेल्यावर एक नाटक रंगमंचावर सुरु होतं आणि एक नाटक प्रेक्षकांमध्ये सुरु होतं. रंगमंचावरचे नाटक बघायला तिकिटाचे पैसे मोजावे लागतात आणि प्रेक्षकांमधले नाटक बघायला फक्त नजर व श्रवनिका संवेदनशील असावी लागते. रंगमंचाएवढेच प्रेक्षकांमधील नाटक रंगतदार आणि चपखल देखील असतं. त्यातील संवाद हे शिव्यांनी सुरु होऊन शिव्यांनीच संपणे ठरलेले असते त्यामुळे त्यांचे पाठांतर करावेच लागत नाही. रंगमंचकाची भव्यता आवश्यक असत नाही ना विद्युत रोषणाईचा गरज असते. बसं तापट डोकं, तिखट जीभ आणि आजूबाजूला स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्यांचे सुंदर गरीब चेहरे पुरेसे असतात. तिथे कोणीच लेखक नसतो, आयोजक नसतो आणि कलाकार तर मुळीच नसतो असतात ते नाटककार जे दोन्ही नाटकांचा भरभरुन आस्वाद घेतात आणि त्या रम्य सायंकाळला लक्षात ठेवतात. कारण नाटकाची नैसर्गिक रित आहे नाटक संपल्यावर खरं नाटक सुरु करायचं असतं आणि ठरलेल्याच संवादांवर नाटकाचा शेवट करायचा असतो कारण टाळी तेव्हाच मिळणार असते! कुणी कितीही शुद्ध भाषेत खटकेबाज संवाद लिहिलेत तरी त्यांना शृंगार दागिना म्हणून शिव्यांनाच स्वीकारावं लागत असतं. खटके उडविण्यात शिव्यांचे योगदान आजतागायत जे मिळत आहे याची कदर भाषेत झाली म्हणजे समजायचं प्रयोग करण्याआधी व रंगमंच चढण्याआधीच नाटक आपल्या जागेवर म्हणजे रस्त्यावर येऊन बसलं आहे ज्याला नजरा हजारो लाखो मिळत असतील पण पाठ थोपटून खूप छान नाटक आहे म्हणणारे प्रेक्षक, रसिक मायबाप आणि उत्साह भरुन साथ देणारा रंगमंच फार दुर्मिळतेने मिळत राहतो. नाटक करावीत, अगदी नाटकाला येऊनही नाटक करावीत पण आपलं नाटक कुठे कसं आणि कधी थांबवाव कळलं कि, नाटकातून मन उतरत नाही अन् मन भरतही नाही अगदी कागदावर रंगलेल्या या एका शब्दनाट्यासारखेच..!
---------------------------- मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३

No comments:

Post a Comment