♥
♥ क्षण..! ♥
शब्दवेडी..!
माहीत नाही मला ती
शब्दवेडी कशी असेल.?
झाली तर एक कविता
सहज न लगेच करेल..
अन् संवेदनांना भाव-
विभोर करुन टाकेल..
पाऊले अडखळतील
वाटा येऊन मिळतील..
उधाण लाटा प्रेमाच्या
किनारा एक गाठतील..
माहीत नाही मला ती
शब्दवेडी कशी असेल.?
गुंफेल नात्यांना स्वतः
अन् धागा मला करेल..
मी वेंधळा वादळ न ती
हळवी एक पहाट असेल..
प्रेमाचं धागं कसं टिकेल
आहे तोवर फक्त जपेल..
कधी हे कधी ते लागेल
माहीत नाही काय मागेल?
तू कागदापेक्षा माझाच
प्रत्येक ओळीत सांगेल..
माहीत नाही मला ती
शब्दवेडी कशी असेल..
एक-एक क्षण वेचेल
की शब्द न शब्द जगेल..
मी पाऊस होऊन बरसेल
अन् ती सरीवर सर असेल..
मी कधी प्रेमिका म्हणेल
कधी तिला रसिका संबोधेल..
मग ती फक्त अंगणातील
तुळस म्हणून उगाच मिरवेल..
माहीत नाही मला ती
शब्दवेडी कशी असेल..
गुलमोहराची बहर जशी
रातराणीत सुगंधी वेळ तशी..
मी कान नसलेला कप
न ती सावरुन घेणारी बशी..
मी तुझी बेबंद-बेधुंद रात्र
आणि तू सातवणारा शशी..
थोडी अशीच असेल ती
शब्दवेडी जरा-जराशी..
कधी क्षणा-क्षणाशी अन्
कधी मना-मनाशी वास्तव
रेशिम बंधांचे अचूक जाणणारी
"शब्दवेड्याची ती शब्दवेडी..!"
------------------------ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
No comments:
Post a Comment