♥
त्याच तिच्यावर प्रेम म्हणजे अनकंडिशनल लव्ह...
तिचं त्याच्यावर प्रेम म्हणजे कंडिशनल लव्ह..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
नमस्कार, माझ नाव पियुष प्रकाश खांडेकर. कविता आणि चारोळ्या टोपण नावाने लिहितो. माझ्या काही कविता तुमच्या समोर सादर करतोय. तुमचा अभिप्राय नक्की कळवा !! कविता जास्त करत नाही पण खूप सा-या चारोळ्यांचा आस्वाद नक्की घ्या.. मृदुंग / क्षण ! संपर्क :- "क्षणातच" पि.ओ.बॉक्स नं. ६७, जळगाव हेड पोस्ट ऑफिस. जळगाव-४२५००१, दूरध्वनी : ७३८७९२२८४३
Friday, July 15, 2016
त्याच-तिचं..! :-)
Saturday, July 9, 2016
सीसीडी..! :-)
#सीसीडी
#पुणे
ती: तुला फॉलो करण्यात पण एक वेगळी मज्जा आहे...
मी: अच्छा..?
ती: हम्म..
मी: नाईलाज असतो माणसाचा. म्हणून शेपूट वागवत असतो. अन्यथा...
ती: हाऊ मिन
मी: आय एम टॉकिंग अबाउट वाय-फाय...
ती: रिडिक्युलस, यु सच अ बास्टर्ड..
मी: यप द लकी बास्टर्ड... पे धिस बिल ऑफ युअर कॉफी...
ती: आय डिडन्ट कॅरी मनी
मी: सो सॅड, प्लिज वॉश कॉफी मग्स क्लिनली...
ती: यु .................... बीप
मी: नन्हा मुन्हा राही हूँ, देश का सिपाही हूँ...,
बोलो मेरे संग...
तुझ्या नानाची टांग..!
✍मृदुंग®
Friday, July 8, 2016
तडफड..! :-)
♥
♥ क्षण..! ♥
तडफड..!
त्या दिवशी वाटेत भेट झाली. पाऊस मुसमुसत होता आणि तो स्वतःच मन सावरत होता. तुटून गेलेल्या बांधा नंतर सावरावं आणि आवरावं लागतं. थेंबांच्या तिरडीवर रोज नव्याने झोपावं लागतं. मन नसलेल्या या शरीराच्या प्रेताचेही वासनांध भोग घेतले जातात. कधी व्यवहार तर कधी मोबदला म्हणून. व्याजासह निव्वळ परतफेड. मन होतं किंवा मनात काय होतं? इच्छा काय होती ? या प्रश्नांची उत्तरे म्हणजे माझी तशीच राहू दिलेली कोरी पाने. भिजणं झालं होतं. त्यानंतरची माझी कडवट कॉफीसुद्धा कपात राहून गेली. न पिलेल्या कॉफीचे न चुकता दिलेले अचूक बिल. त्या कॉफीचे मोल घेतांना क्षणभर थरथरणाऱ्या हातांचे हसऱ्या ओठांनी स्वागत केले.
नजरेत कितीतरी प्रश्न. वृत्तीत कितीतरी संभ्रम. गैरसमजांचा मनातच झालेला गुंता. चिंता मग शरीराच्या भिजण्याची कि, कॉफीच्या कडवटतेची? रेंगाळते कसलीतरी चव. अजूनही कोरडं पडलेल्या या ओठांवर. कदाचित! नको कदाचित पुन्हा म्हटले कि, बऱ्याच वाटा परत दुतर्फा सजून पावलांना बेडीत जखडत असतात. मन गुंतवत राहतात आणि हाताशी पुन्हा एक वास्तव रितेपणा उरत असतो. असंच ठिक आहे. दरम्यान असलेल्या अंतरावर उरलेल्या सगळ्या भाकड कल्पना. अस्तित्व असो, किंवा नसो सगळं चांगलं आहे. पुढ्यात लोळण घेत आहे. अगदी खोटं असलं तरी. दुःखाच्या उंबरठ्यावर सुखाची प्रचिती कायम अशीच असते. थोडी ओल आणि जन्मभराची पडलेली कोरड..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३
Wednesday, July 6, 2016
मी विसरुन जा म्हटल्यावर..! :-)
♥
♥ क्षण..! ♥
मी विसरुन जा म्हटल्यावर..!
पहिल्या फोनपासून माझ्या कडवट कॉफीपर्यंत तिला सगळं आठवत. माझं कोसळणे पाहिले नाही पण स्वतःच स्वतःला दिलेल्या जखमेवर माझी फुंकर तिला स्मरते. हव्या असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन माझा प्रश्न तसाच ठेवला जातो. निर्दयी दगड होऊन सगळं तोडूनही पुन्हा तिच्याकडून मी पुजला जातो. उसवायच काय मग? तिचा प्रश्न , तीच आयुष्य हवं ते करो! मला आता फार काही माझ्याकडूनही नको. आहे ते आयुष्यभराचे दारिद्र्य खूप आहे. निदान त्यातही मी माझं समाधान शोधलंय. बाकी एवढंच की, ते सगळं लक्षात ठेवून आता काय साध्य न सिद्ध होणार? माती होऊन त्याची धूळ पण कधीच उडून गेलेली आहे..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
Tuesday, July 5, 2016
सर..! :-)
♥
♥ क्षण..! ♥
सर..!
टपोऱ्या थेंबांत अनवाणी पावलांनी बागडणारी लाजरी बुजरी एक धुंद वेळ. तिच्या पायात वेंधळ्या थेंबांची नादमय पैंजण. नुकतेच सोळावे लागलेल्या तारुणीसारखी गार वाऱ्याची तिच्यासोबत आल्हादमय झुळूक. इच्छा नसतांनाही तिच्या स्त्री हट्टाला झेलत थेट अंतर्मनापासून बेधुंद व्हावं लागतं. काळजातून गारवा आरपार करत त्या नारीची ओंजळीत एकवटलेली एकुलती एक आठवण! तिला तिच्याशिवाय अजून कुणाचीच सर नाही. तिच्या अस्तित्वाचा निव्वळ असर! माझ्यावर- तुझ्यावर आणि प्रत्येकावर! निसर्गाचा हिरवा चुडा आणि भारजरीत हिरवा शालू! कितीतरी पावसाळे होऊन गेले तरी या हिरव्या तारुण्याचे दरवेळी वेगळेच पैलू! आता भिज, नंतर भिज किंवा अगदी शेवटच्या थेंबाला पण ऋतू बदलण्याआधी एकदाच तिच्यासह पूर्ण चिंब भिजून घ्यायचं! आयुष्य पुन्हा कोरडं कधीच वाटणार नाही. एवढी ती 'सर पावसाची' मनमोकळी अन् तुझ्याएवढीच माझी आहे. एकदम ओली चिंब करणारी माझी एक सर..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com