♥
♥ क्षण..! ♥
सर..!
टपोऱ्या थेंबांत अनवाणी पावलांनी बागडणारी लाजरी बुजरी एक धुंद वेळ. तिच्या पायात वेंधळ्या थेंबांची नादमय पैंजण. नुकतेच सोळावे लागलेल्या तारुणीसारखी गार वाऱ्याची तिच्यासोबत आल्हादमय झुळूक. इच्छा नसतांनाही तिच्या स्त्री हट्टाला झेलत थेट अंतर्मनापासून बेधुंद व्हावं लागतं. काळजातून गारवा आरपार करत त्या नारीची ओंजळीत एकवटलेली एकुलती एक आठवण! तिला तिच्याशिवाय अजून कुणाचीच सर नाही. तिच्या अस्तित्वाचा निव्वळ असर! माझ्यावर- तुझ्यावर आणि प्रत्येकावर! निसर्गाचा हिरवा चुडा आणि भारजरीत हिरवा शालू! कितीतरी पावसाळे होऊन गेले तरी या हिरव्या तारुण्याचे दरवेळी वेगळेच पैलू! आता भिज, नंतर भिज किंवा अगदी शेवटच्या थेंबाला पण ऋतू बदलण्याआधी एकदाच तिच्यासह पूर्ण चिंब भिजून घ्यायचं! आयुष्य पुन्हा कोरडं कधीच वाटणार नाही. एवढी ती 'सर पावसाची' मनमोकळी अन् तुझ्याएवढीच माझी आहे. एकदम ओली चिंब करणारी माझी एक सर..!
------------------------ ✍मृदुंग®
kshanatch@gmail.com
No comments:
Post a Comment