Powered By Blogger

Thursday, May 25, 2017

#पाळी..! :)


♥ क्षण..! ♥

#पाळी..!

ती : जो तो #पाळीवर लिहितोय तू पण लिही ना काहीतरी..?

मी : हाहाहा, झेपलं तर बघ..!

"नैसर्गिक काय सर्वदृष्ट्या सुदृढ असलेला प्रत्येक समाज आहे. या समाजाचा वासनेने हापापलेला वांझोटपणा त्याने त्यागल्यावर; त्याची स्त्रीला उपभोगण्याची लालसा जेव्हा कपड्यांच्या आतील सौंदर्य बघण्यात गुंतलेली असेल. तेव्हा त्याची मानसिक पाळी निसर्ग निर्मित आणि नियमित यायला लागेल. त्यावेळी त्या समाजासमोर फक्त आरसा धर...
..आणि सांग विवस्त्र (नागडं) दोघेही होऊ शकतो. अब्रुनुकसानीचे खापर आणि ओझं मला पेलून मिरवावं लागेल. अवघडल्या जागेचं कायमचं दुखणं होऊन बसेल. पण! नवनिर्मितीच्या या सुखद चक्राचे पाईक या समाजाला होता येणार नाही. याची एवढीच काय ती लाज मला माझ्या पदरात लपवलेल्या तोंडाला वाटते. बाकी तुम्ही आणि तुमच्या सामाजिक आस्था या समाज व्यवस्थेत बाटलेल्या आहेतच!
या अशा समाजात मला समरस व्हायचं नाही. वैचारिक कृतिशून्य समाज मला नकोय. कृतिशील निष्ठावान समाज मला हवाय आणि तो नसला तरी तो घडवणारा पुढचा अंश मलाच घरंदाज निपजायचा आहे. या गर्भधारणेसाठी मला शय्या करण्याची गरज नाही. माझे पतन झाल्यावरही सतत माझ्या शरीराचे स्वतःच्या वीर्यपतानासाठी तोडले जाणारे लचके खाणे बंद करा. शक्य झालेच तर आणखी एक "भूक आहे म्हणून अधाशासारखं खायचं नसतं." चव-चटक लागल्यावर म्हटलेलं नाही स्वीकारायचं असतं. हे स्वीकारणं शक्य नसेल तर तरुण अवस्थेत स्वतःच्या हातांचा आपण उपयोग केलेलाच आहे तो सातत्याने चालू ठेवावा..!"
(दिवस आणि रात्र #पाळीत)
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
+91 73879 22843

No comments:

Post a Comment