♥
मोठं होत असतांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे?
तुम्ही कितीही समजदार असलात ना! तरी होणाऱ्या किंवा घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः जबाबदार राहत असता. तुमच्या कडून झालेल्या चुकांना किंवा घटनांना इतर कुणावरही तुम्ही लादून मोकळं होऊ शकत नाही. म्हणून मग स्वतःच स्वतःला सांभाळत राहावं लागतं. सतत होणाऱ्या आरोपांचंही असंच असतं हळूहळू तेही मोठे होत असतात. तेव्हा सोडून द्यायचं नसतं. स्विकारुन घ्यायचं. निदान थोडंतरी आयुष्यात मग तुमच्या मनासारखं काहीतरी होईल..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
नमस्कार, माझ नाव पियुष प्रकाश खांडेकर. कविता आणि चारोळ्या टोपण नावाने लिहितो. माझ्या काही कविता तुमच्या समोर सादर करतोय. तुमचा अभिप्राय नक्की कळवा !! कविता जास्त करत नाही पण खूप सा-या चारोळ्यांचा आस्वाद नक्की घ्या.. मृदुंग / क्षण ! संपर्क :- "क्षणातच" पि.ओ.बॉक्स नं. ६७, जळगाव हेड पोस्ट ऑफिस. जळगाव-४२५००१, दूरध्वनी : ७३८७९२२८४३
Friday, October 27, 2017
मोठं होत असतांना... :)
Thursday, October 26, 2017
पप्पा आणि मी (संवाद)
जाता-जाता पप्पांनी विचारलं..
पप्पा- "दिवाळी अंकांसाठी तू का कधीच लिहीत नाहीस?,
लिहीत जा. पाठवत जा."
मी - पप्पा आता तुम्हाला काय सांगायचं या लोकांचं राजकारण?
सगळं करुन भागले. इथेही दिवाळी अंकांची एक वेगळी स्पर्धा आहे.
माझी स्पर्धा अजूनतरी माझ्याशीच आहे. त्यामुळे या लुभावण्या प्रलोभनांवर मला भाळताच येत नाही..
पप्पा - (एकाच नाव घेतलं) ओळखतोस का? त्यांचं आलं छापून.
मी - ते मला ओळखतात. विचारुन बघा!
पप्पा - प्रवाहासोबत चाल एकदा. ऐकला चलो रे म्हणत राहाशील तर कसं होणार तुझं?
मी - काहीच बोललो नाही.. माझा मुंबईचा प्रवास सुरु झाला.
आता थोड्यावेळा पूर्वी पप्पांचा व्हाट्सअप्पवर मॅसेज आलाय..
पप्पा - "गध्या, ही लोकं स्वतःहून तुझ्या मागेमागे येऊन तुला लिखाण मागतात मग देत का नाहीस?"
मी - द्यायला लगेच देता आलंही असतं मला. पण मग विचार केला "मी भांडवल बनावं का?" मी केलेली वाचकांमध्ये गुंतवणूक आहेच माझ्यापाशी. मला त्याच एवढं कौतुक आणि स्पर्धा करण्यासारखही काही नाही. तुम्ही त्यांच्याशी बोलल्यावर कळलं असणार तुम्हालाही मी लिखाण का पुरवलं नाही.
पप्पा - मी समजतो त्यापेक्षा या लोकांना खूप चांगल्याने ओळखून आहेस तू तर..
मी - मिळालं तुम्हला उत्तर. आता झोपतो शुभरात्री..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
Tuesday, October 24, 2017
दिसलं पाहिजे..! :-)
♥
♥ क्षण..! ♥
दिसलं पाहिजे..!
..अम्म्म्म्म! लहान मुलांचा निरागस बाळबोधपणा दिसला पाहिजे. तसं म्हटलं तर श्रीमंतांची वैभवता त्यांच्या श्रीमंतीतून व प्रतिष्ठेतून जशी दिसून येते. अगदी तशीच गरीबाची कैवल्य आणि समाधानी वृत्तीसुद्धा दिसून येते. पण आपण बघावं का? हो! लोकांनी त्यांची डोळे तुम्हाला बघण्यासाठीच कार्यशील केलेली असतात. मुलगी बघायला गेलेल्या मंडळींचेच घ्या ना.. पदरात असलेल्या लावण्याचा बांधेसुदपणा जेवढ्या हावरटपणाने दिसून यावा यासाठी धडपड होते. तेवढीच पडद्यामागून संथ, तरल आणि मंजुळ आवाजात उत्तरे देणारी व्यक्तीही जरा अजून पुढे यावी अशी इच्छा होतेच. यात अपवाद अरसिक आणि दृष्टिहीन असूही शकतात. वाईट मुळीच नसेल आणि नसतंही. बघणाऱ्याचा दृष्टिकोन काय आहे हे समजलं पाहिजे. चांगलंच प्रत्येकाला हवं असतं. माझ्यापेक्षाही चांगलं तुला मिळेल किंवा सापडेलही असं ब्रेकअप करणारी प्रेमी युगुल एकमेकांना बोलून मोकळी होऊन जातात. त्यानंतर त्यांना पुन्हा तसं काही दिसतंच असं नसतं. बघायची भूमिका रसिक श्रोत्यांशीवाय आणि दगडाच्या बनविलेल्या विलोभनीय मूर्त्यांशीवाय अजून कुणाला चांगली वठवता आलेली नाही. इथे उपवर मुलगासुद्धा मुलगी बघायला/पाहायला जातो पण ती त्याला योग्यप्रकारे दिसली किंवा त्याने नीटसं पाहिलंच नसते. मग या क्षण दोन क्षणात पसंती देणाऱ्यांना काय साक्षात्कार होतो का? कि, यांच बघणं एवढं सराईत झालंय हेच कळत नाही. कदाचित साठ-सत्तर स्थळे जाऊन बघितल्याने असा अनुभव मिळतो? हे विचार करण्यासारखं आहे..
..तुम्हाला दृष्टी आहे आणि दिसतंसुद्धा चांगलं. एवढं चांगलं दिसतं की उनीदुनि सगळंच चव्हाट्यावर येऊन बोंबाबोंब करते. याला आणखी हातभार म्हणून मग माहिती मिळते. त्या मिळालेल्या माहितीला "समजणं" हा निव्वळ दैवाच्या मनातला सुप्त हेतू कळण्यात सामावलेला एक आनंद! पण दिसलं पाहिजेच! त्याशिवाय कळणार कसं? तोंड फाटकं प्रत्येकाचं असतं. त्यामुळे तोंड उचलून बोलायला आणि विचारायला काही कोणी येत नाही. आजकाल तर "नोटिस केलंय" हे पण ठोकून सांगावं लागतं. त्यात "इग्नोअर केलं" तर झालंच कल्याण!किती शतकं झालीत माहिती नाहीत. देव दिसावा म्हणून आजही पुजला जातोय. कारण तो दिसला पाहिजे म्हणूनच! दिसल्यानंतर काय? तुम्हाला "मोक्ष" कन्फर्म..
तर मुद्दा काय दिसलं पाहिजे. चांगलं-वाईट, सकारात्मकता-नकारात्मकता, गुण-दोष, चुका आणि गुन्हा हे दिसल्यावर मग कुठेतरी दृष्टिकोन बनतो. हा व्यक्तिसापेक्ष असला तरी याचं व्यंजन आणि वेगळं रसायन प्रत्येकाचं व्हेरी स्पेशल असतं. याला सर्वसामान्य "अनुभव" या सोप्या शब्दाने ओळखतात. माझी गृहीतके आणि गणिते या सोप्प्या गुणकारात सापडत नाही. एकमेकांना उगाच म्हणून सुरुवातीला भागायच कालांतराने वजा करायचं आणि आयुष्याच्या टर्निंग पॉइंटला बेरीज करून बाकी सांगायचं? अशी बरोबरीतली गणिते बेहिशेबी नजरांना कळणार कशी? दिसलं-पाहिलं-तोंड फिरवलं मागे मागचं राहून गेलं आणि पुढचं पुढे! काही दिसलं तर दिसलं पाहिजेच! जरा बघत चला! हल्ली सांभाळून राहण्याची गरज आहे. कसलाही गाजावाजा न करता. तेव्हाच दिसणार आपलं आणि दुसरा ढुंकून पाहणार. कारण त्याला इच्छा होणारच! अजून..थोडं अजून "दिसलं पाहिजे..!"
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
Thursday, October 19, 2017
दरवळ..! :-)
Wednesday, October 18, 2017
क्षण आनंदाचे..! :-)
Monday, October 9, 2017
तुझी कथा..! :)
♥
♥ क्षण..! ♥
तुझी कथा..! :)
तुझ्या कथेबद्दल मला बोलायचं नाही.. मी वाचलं एकदा नाही हजारदा.. इतकंच कळवणे मला जमले नाही.. तुझ्या कथेनेही मला वाटत चुगली केली नाही.. असो, तुझी कथा चांगली असूनही आवडली अजिबात नाही.. तुझं तू पण त्यात होतं "आपण" नव्हतोच.. त्यामुळे गुंतणे काही झाले नाही.. तुला विणकाम चांगले यायचे म्हणून शब्दांचे गुंफने जमले आहे.. दरम्यान वीण जरा विस्कटलीही... तू सवयीनुसार सारवासारव उत्तम केलीस.. कळणाऱ्याला ते कळलं असणारच म्हणा.. ठीक वाटलं, कथाच म्हणून सोडून दिलं.. तुझ्या कथेत कथानक आणि तुझी कथा कथक फार झालेत.. कदाचित, म्हणून तुझी कथा आत अशी पोहोचत नाही.. अधांतरी वाटते.. पण चालतेय वेगळं काही तरी म्हणून.. मुळात गुंता हवाच सोडवायला.. कोडी सोडवणं सोप्पय, कथेची कोंडी सोडवणं अवघड गेलं असणार.. हरकत नाही, प्रसिद्धीच्या झोताला एकदिवस अंधार ग्रासतोच.. कवाडं तेवढी नजरेची उघडी ठेवून राहा.. या अंधाराला चिरत येणार प्रतिष्ठेचा गंध गर्वाची नवीन कथा लिहून जाणार असतो.. तेव्हा तुझी कथा आणखीन खुलून दरवळेल.. शेवटी मात्र काही राहील तर ती फक्त.."तुझी कथा..!"
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
Tuesday, October 3, 2017
चाल-ढकल..! :-)
♥
♥ क्षण..! ♥
चाल-ढकल..! :-)
रात्री उशिराने अंधाराचा आधार घेऊन, पापण्यातून एक थेंब हळूच ओघळतो. कुणाला? स्वतःलासुद्धा नसेल, पण उशीला त्या थेंबाचं कारण आणि महत्त्व माहिती असतं. दिवसासाठी ओढलेला मुखवटा एवढ्या सहज गळून पडल्यावर, अंधाराची जी भीति वाटते ना ती मग इतर कुणाचीही वाटत नाही. अंधार सत्य आणि शाश्वततेची जाणिव करुन देऊ शकतो. दिवस या जाणिवेची उणीव भरुन काढू शकत नसतो. जी चाल-ढकल रोज करतो ना आपण ती याच आयुष्याची. आतल्या आत आणि मनातल्या मनात आपण आणखीन एक वेगळं आयुष्य जगत असतो. जे फक्त आपल्या स्वतःला माहीत असतं. याची वच्यता कुठे चुकून करावी किंवा ओघवती झाली देखील; तरीही आपण ती बंद ओठांच्या ओशाळ हसण्यावर अधांतरी तोलत ठेवत असतो. याचं मूळ कारण स्वतःने स्वीकारलं असतं तर मांडावे लागले नसते आणि स्वतःशीच भांडावे कधीच लागले नसते..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९ २२८४३