♥
♥ क्षण..! ♥
तुझी कथा..! :)
तुझ्या कथेबद्दल मला बोलायचं नाही.. मी वाचलं एकदा नाही हजारदा.. इतकंच कळवणे मला जमले नाही.. तुझ्या कथेनेही मला वाटत चुगली केली नाही.. असो, तुझी कथा चांगली असूनही आवडली अजिबात नाही.. तुझं तू पण त्यात होतं "आपण" नव्हतोच.. त्यामुळे गुंतणे काही झाले नाही.. तुला विणकाम चांगले यायचे म्हणून शब्दांचे गुंफने जमले आहे.. दरम्यान वीण जरा विस्कटलीही... तू सवयीनुसार सारवासारव उत्तम केलीस.. कळणाऱ्याला ते कळलं असणारच म्हणा.. ठीक वाटलं, कथाच म्हणून सोडून दिलं.. तुझ्या कथेत कथानक आणि तुझी कथा कथक फार झालेत.. कदाचित, म्हणून तुझी कथा आत अशी पोहोचत नाही.. अधांतरी वाटते.. पण चालतेय वेगळं काही तरी म्हणून.. मुळात गुंता हवाच सोडवायला.. कोडी सोडवणं सोप्पय, कथेची कोंडी सोडवणं अवघड गेलं असणार.. हरकत नाही, प्रसिद्धीच्या झोताला एकदिवस अंधार ग्रासतोच.. कवाडं तेवढी नजरेची उघडी ठेवून राहा.. या अंधाराला चिरत येणार प्रतिष्ठेचा गंध गर्वाची नवीन कथा लिहून जाणार असतो.. तेव्हा तुझी कथा आणखीन खुलून दरवळेल.. शेवटी मात्र काही राहील तर ती फक्त.."तुझी कथा..!"
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३
No comments:
Post a Comment